मराठवाड्यात २५ दिवसांत ७१ शेतकऱ्यांच्या आत्महत्या 

मराठवाड्यात २५ दिवसांत ७१ शेतकऱ्यांच्या आत्महत्या 
मराठवाड्यात २५ दिवसांत ७१ शेतकऱ्यांच्या आत्महत्या 

औरंगाबाद - दुष्काळामुळे मराठवाड्यात मे महिन्यातील २५ दिवसांत तब्बल ७१ शेतकऱ्यांनी आपले जीवन संपविले आहे. यात एकट्या औरंगाबाद जिल्ह्यातील तब्बल ४१ दुष्काळ पीडित शेतकऱ्यांचा समावेश आहे.  शेतकरी आत्महत्येचा थांबण्याऐवजी वाढत आहेत. या वर्षात जानेवारीपासून आतापर्यंत 326 वर शेतकरी आत्महत्येचा आकडा पोचला आहे. सततची नापिकी, काबाड कष्ट करूनही शेती पिकवत असताना होणारे नुकसान, कर्जमाफीचा घोळ तसेच सावकारीपाशात अडकलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. मागील वर्षी कपाशीवरील शेंदरी बोंडअळीचा प्रादूर्भाव आणि गारपिटीमुळे हातचे पीक गेले. शिवाय दुसऱ्या वर्षी पुन्हा दुष्काळाचे संकट समोर उभे ठाकले. अन्य विभागाच्या तुलनेत मराठवाड्याच्या चार जिल्ह्यांत अत्यल्प पाऊस झाला. खरिपाची पीकही आले नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला. औरंगाबाद, नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात तुलनेत कमी पाऊस झाला असून, या जिल्ह्यांसह मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत शेतकरी आत्महत्या करीत आहेत. शेतीचे उत्पादन घटल्यामुळे शेतकऱ्यांना दैनंदिन गरजा भागविणेही कठीण झाले आहे. अनेक शेतकरी पोट भरण्यासाठी स्थलांतर करीत आहेत.  यंदा मार्चअखरेपर्यंत १९८, ३० एप्रिलपर्यंत २५५ शेतकरी आत्महत्या झाल्या होत्या. मे महिन्याच्या २६ तारखेपर्यंत हा आकडा ३२६ वर पोचला. म्हणजे मे महिन्यात ७१ शेतकऱ्यांनी जीवन संपविले आहे. ३२६ आत्महत्यांपैकी २१४ आत्महत्या पात्र ठरवण्यात आल्या; तर ६९ अपात्र ठरवल्या. तसेच ४३ प्रकरणे अद्यापही चौकशीसाठी प्रलंबित आहेत.  --  प्रशासन कुठे आहे?  बळीराजा आपले जीवन संपवत असताना प्रशासनाकडून हे थांबविण्यासाठी काय प्रयत्न सुरू आहेत, असा सवाल यानिमित्त उपस्थित केला जात आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर कुठलाही राजकीय प्रश्‍न फारसे पोटतिडकीने मांडलेले बघायला मिळालेले नाहीत. जे सर्वांसाठी अन्नधान्यांची निर्मिती करतो, नेमके त्याच्याकडेच प्रशासन, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष होत असल्यानेच आत्महत्येसारखे पाऊल उचलले जात असल्याचे शेतकरी कुटुंबातील अनेक जण बोलून दाखवत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com