agriculture news in marathi seventy seven lakh compensation distributed in Amravati District for Bogus soyabean seed affected farmers | Agrowon

अमरावती जिल्ह्यात निकृष्ट बियाणे प्रकरणी ७७ लाखांची भरपाई

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 19 नोव्हेंबर 2020

अमरावती जिल्ह्यात निकृष्ट सोयाबीन बियाण्यांच्या प्रकरणात अद्यापपर्यंत कंपन्यांद्वारे ८६७ सोयाबीन बॅग व ७७ लाख रुपयांची भरपाई शेतकऱ्यांना देण्यात आली.

अमरावती : निकृष्ट दर्जाच्या बियाण्यांमुळे जिल्ह्यात शेतकऱ्यांना उगवण विषयक समस्येचा सामना करावा लागला होता. या प्रकरणात अद्यापपर्यंत कंपन्यांद्वारे ८६७ सोयाबीन बॅग व ७७ लाख रुपयांची भरपाई शेतकऱ्यांना देण्यात आली.

खरीप हंगामाच्या सुरवातीला शेतकऱ्यांना सोयाबीनच्या निकृष्ट दर्जाच्या बियाण्यांचा पुरवठा झाला. त्यामुळे अमरावतीसह राज्याच्या अनेक भागात शेतकऱ्यांच्या बियाणे संदर्भाने लाखो तक्रारी झाल्या. एकट्या अमरावती जिल्ह्यात ४७३२ शेतकऱ्यांनी सुमारे पन्नास हजार हेक्‍टरवरील बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी कृषी विभागाकडे केल्या.

शासनाच्या आदेशानुसार कृषी विभागाने या तक्रारींची नोंद घेत पंचनाम्याची कारवाई केली. यातील ३०४८ तक्रारी मध्ये तथ्य आढळून आले. त्याच्या परिणामी कृषी विभागाने कंपन्यांशी संपर्क साधत त्यांना शेतकऱ्यांना परतावा करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार कंपन्यांकडून ८६७ बॅग ७७ लाख रुपयांची भरपाई शेतकऱ्यांना देण्यात आल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. जिल्ह्यात एकूण ७३ बियाणे कंपन्यांविरोधात शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या होत्या.
 
अठरा कंपन्यांविरुद्ध कारवाई
बियाणे नियम १९६८ मधील २३ (ए) (२) या तरतुदीनुसार कृषी विभागाने १८ बियाणे कंपनीविरुद्ध कायदेशीर कारवाईचा मार्ग अवलंबिला आहे. सुरवातीला शेतकऱ्यांनी बियाणे उगवण विषयक तक्रारी केल्यानंतर भरपाई देण्यात यावी की कारवाई करावी अशी संभ्रमावस्था होती. त्यानंतर शासनाकडून कारवाईचे निर्देश देण्यात आले.

प्रतिक्रिया...
महाबीज कडून २८.७७ लाख रुपये व ३२७ बॅग बियाणे परतावा देण्यात आला. खासगी कंपन्यांकडून ५४० बॅग व ४८.२४ लाखाची भरपाई देण्यात आली. भरपाई नाकारणाऱ्या अठरा प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
-विजय चवाळे,
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.

तक्रारी : ४७३२
भरपाई प्राप्त शेतकरी : ११७९
भरपाईपासून वंचित : ३५५३
बियाणे दोष प्रकरणे : ३०४८ 


इतर ताज्या घडामोडी
ट्रायकोडर्मा वापरण्याच्या पद्धतीट्रायकोडर्मा ही उपयुक्त बुरशी असून, ती रोपांच्या...
जनावरांचे पावसाळ्यातील व्यवस्थापनपावसाळ्यात होणाऱ्या वातावरणातील अचानक बदलामुळे...
खानदेशात अत्यल्प पेरणीजळगाव ः खानदेशात या महिन्यात अपवाद वगळता हवा तसा...
नांदेडमध्ये सोयाबीनचे क्षेत्र वाढण्याची...नांदेड : जिल्ह्यात यंदा चार लाख हेक्टरवर...
परभणीत १२.६४ टक्के पेरणीपरभणी ः जिल्ह्यात यंदाच्या (२०२१) खरीप हंगामात...
देशात वीज पडून दरवर्षी दोन हजार...पुणे : हरिताच्छादन कमी झाल्याने होणारी तापमान वाढ...
कांदा उत्पादक शेतकऱ्याचा प्रामणिकपणानाशिक : जगात प्रामाणिकपणा लोप पावत चालला असल्याची...
अन्नद्रव्यांवरून खतांचे व्यवस्थापन...गेवराई, जि. बीड : जमिनीतील उपलब्ध...
आंबेओहळ प्रकल्पात  ३० टक्के पाणीसाठाकोल्हापूर : आजरा तालुक्यात असलेल्या आंबेओहळ...
वनौषधी पानपिंपरीचे दर वाढल्याने...अकोला ः जिल्ह्यात सातपुड्याच्या पायथ्याशी अकोट,...
नुकसान टाळण्यासाठी  मिश्र पिकांवर भरराळेगाव, जि. यवतमाळ : गेल्या वर्षी कपाशीवर आलेली...
यवतमाळमध्ये अनधिकृत खतांचा साठा जप्तयवतमाळ : परवान्यात नसतानाही खतांचा अनधिकृतपणे...
सांगली जिल्ह्यात खरिपाची २५ टक्के...सांगली : जिल्ह्यात खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्र २...
सूक्ष्म खाद्य उन्नयन योजनेसाठी अर्ज...वाशीम : जिल्ह्यात २०२०-२१ ते २०२४-२५ या...
पुण्याचा पर्यटन विकास आराखडा तयार करा पुणे : जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी सविस्तर...
प्रताप सरनाईकांचे ठाकरेंना पत्र; ...मुंबई : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी...
काळानुरूप बदल स्वीकारा : नितीन गडकरीवर्धा : बाजार समित्यांनी केवळ शेतमाल खरेदी विक्री...
संत्रा आयात शुल्कप्रकरणी बांगलादेशशी...अमरावती : नागपुरी संत्र्याचा सर्वात मोठा आयातदार...
मॅग्नेट ः फलोत्पादन पिकांसाठी एकात्मिक...राज्यातील कृषी हवामान विभागनिहाय फळे, भाजीपाला व...
शेतीवरील आर्थिक ताण कमी करण्यासाठी...हरितक्रांतीनंतर काही दशकांमध्ये विपरीत परिणाम...