agriculture news in marathi seventy seven percent Sugarcane FRP payed to Farmers | Agrowon

राज्यात एफआरपीचे ७७ टक्के वितरण

ॲग्रोवन वृत्तसेवा
सोमवार, 25 जानेवारी 2021

साखर कारखान्यांकडे लक्षावधी टन साखर पडून असल्याने आर्थिक ताण असतानाही आतापर्यंत ७७ टक्के एफआरपी अदा केली आहे. त्यामुळे सात हजार कोटींपेक्षा जास्त रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली आहे.   
 

पुणे : साखर कारखान्यांकडे लक्षावधी टन साखर पडून असल्याने आर्थिक ताण असतानाही आतापर्यंत ७७ टक्के एफआरपी अदा केली आहे. त्यामुळे सात हजार कोटींपेक्षा जास्त रक्कम राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली आहे.   

राज्यातील १८२ साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांकडून ४२२ लाख २३ हजार टन ऊस डिसेंबरअखेर खरेदी केला होता. एफआरपी कायद्यानुसार शेतकऱ्यांना १४ दिवसांच्या आत ९ हजार १४८ कोटी रुपये देणे बंधनकारक होते. आर्थिक ताण असून कारखान्यांनी १५ जानेवारीपर्यंत यातील सात हजार ११८ कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले आहेत.

एफआरपीचे वितरण बघता ११५ कारखान्यांनी दोन हजार कोटींपेक्षा जास्त रक्कम थकवली आहे. ही रक्कम देय एफआरपीच्या २२ ते २३ टक्क्यांच्या आसपास आहे. ६७ कारखान्यांनी मात्र १०० टक्के एफआरपी दिली आहे, अशी माहिती साखर आयुक्तालयाच्या सूत्रांनी दिली. 

गेल्या हंगामात याच कालावधीपर्यंत १३६ कारखान्यांनी अवघे दोन हजार ९६० कोटी रुपये शेतकऱ्यांना एफआरपीपोटी दिले होते. म्हणजेच यंदा कारखान्यांनी आतापर्यंत चार हजार कोटी रुपये गेल्या हंगामापेक्षा जादा दिलेले आहेत. गेल्या हंगामात याच कालावधीपर्यंत राज्यातील ८८ कारखान्यांनी ९६९ कोटी रुपयांची एफआरपी थकवले होते. यंदा ही संख्या वाढली आहे. 

गेल्या वर्षीचे ३४३ कोटी थकीत
मागील हंगामातील एफआरपीचे ३४३ कोटी रुपये मात्र अजूनही शेतकऱ्यांना देण्यात आलेले नाहीत. ही रक्कम व्याजासह शेतकऱ्यांना देणे बंधनकारक राहील. गेल्या हंगामात देखील जुन्या थकीत एफआरपीचा आकडा ३८४ कोटींच्या आसपास होता. यंदा तो ४० कोटी रुपयांनी कमी दिसतो आहे.

दृष्टिक्षेपात साखर हंगाम

  • १८२ साखर कारखान्यांकडून ४२२ लाख २३ हजार टन ऊसगाळप
  • १५ जानेवारीपर्यंत यातील सात हजार ११८ कोटी वितरीत
  • ११५ कारखान्यांनी दोन हजार कोटींपेक्षा जास्त रक्कम थकवली 
  • ६७ कारखान्यांनी १०० टक्के एफआरपी दिली

इतर अॅग्रो विशेष
विक्रमी उत्पादनाचे करा योग्य नियोजनवर्ष २०२०-२१ च्या हंगामात देशात अन्नधान्याचे...
दावा अन् वास्तवशेतकरी सन्मान निधी योजनेच्या दोन वर्षपूर्तीच्या...
थंडीचा प्रभाव घटण्यास प्रारंभ पुणे ः अरबी समुद्राच्या परिसरात चक्रीय स्थिती...
केंद्र सरकारकडून ‘पीजीआर’ला मान्यता पुणे : शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या जैव उत्तेजकांना...
बत्तीसशे चौरस फुटांपर्यंतच्या ...मुंबई : राज्यातील ग्रामीण भागातील सुमारे ३,२००...
स्वच्छता, पायाभूत सुविधांमध्ये...पिण्याचे पाणी, वीज, रस्ते यांसारख्या पायाभूत...
एकत्र या अन् ठरवा भावसातारा जिल्ह्यातील एका शेतकऱ्याला कोबीला...
अद्ययावत ‘मंडी’चे स्वप्न!दिल्लीच्या सीमारेषेवर पाच ठिकाणी गेले ९२ दिवस...
राज्यात ७ कोटी ९७ लाख क्विंटल साखरेचे...नगर ः राज्यात यंदाही उसाचे जोरदार गाळप सुरू आहे....
‘लम्पी स्कीन’मुळे दूध उत्पादनाला...नगर ः ‘लम्पी स्कीन’ आजाराचा प्रादुर्भाव झालेल्या...
राज्यात चार नवे कृषी संशोधन प्रकल्पपुणे : राज्यातील कृषी शिक्षण व संशोधनाला चालना...
वंचित शेतकऱ्यांसाठी राज्यांनी पुढाकार...पुणे : ‘‘आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून देशातील...
राज्यात थंडीत किंचित वाढपुणे ः कोकण व मध्य महाराष्ट्रात आकाश निरभ्र...
रत्नागिरी हापूस पोहोचला लंडनलारत्नागिरी ः लंडनस्थित भोसले एंटरप्रायझेस यूके आणि...
रब्बी ज्वारीचा हुरडा वाण विकसितपरभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील...
डोंगरगावात फळपीक केंद्रित प्रयोगशील...नगर जिल्ह्यात अकोले तालुक्यातील डोंगरगाव येथील...
आगाप नियोजनातून आंब्याला उच्चांकी दरकोकणातील काही आंबा बागायतदार आगाप (हंगामपूर्व)...
५० वर्षांच्या वृक्षाचे पर्यावरणीय मूल्य...साधारणतः आपण कुठल्याही वस्तूचे मूल्यमापन विविध...
कोकणात ढगाळ वातावरण पुणे ः अरबी समुद्राच्या आग्नेय भागात चक्रिय...
उन्हाळ कांद्याची बाजारात ‘एन्ट्री’ नाशिक : जिल्ह्यात रब्बी हंगामातील आगाप उन्हाळ...