नगर जिल्ह्यात वृक्षलागवडीसाठी घेतले सत्तर लाख खड्डे

नगर जिल्ह्यात वृक्षलागवडीसाठी घेतले सत्तर लाख खड्डे
नगर जिल्ह्यात वृक्षलागवडीसाठी घेतले सत्तर लाख खड्डे

नगर ः राज्य सरकारतर्फे विविध विभागांसह लोकसहभागातून राज्यात ५० कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यासाठी चार टप्पे तयार करण्यात आले असून, त्यातील तीन टप्पे पूर्ण झाले आहेत. चौथ्या टप्प्यात वृक्षलागवडीसाठी वनविभागासह सर्वांनीच कंबर कसली आहे. राज्यात ३३ कोटी रोपे लावायची असून, त्यासाठी नगर जिल्ह्याला एक कोटी १७ लाखांचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. त्यासाठी जिल्ह्यात ७० लाख ३४ हजार ८७९ खड्डे घेण्यात आले आहेत.

वैश्‍विक उष्णतेमध्ये होणारी वाढ, हवामानातील बदल यांबाबत उपाययोजना करण्यासाठी राज्य सरकारने हे वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे. सन २०१६ पासून वृक्षलागवड मोहिमेस सुरवात झाली आहे. राज्यात आतापर्यंत १९ कोटी वृक्षलागवड झाली आहे. ही लागवड करताना प्रत्येक जिल्ह्याला उद्दिष्ट देण्यात आले होते. ते सर्वांकडून पूर्ण झाले आहे. आता नव्याने राज्याला ३३ कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट असून, त्याचेही जिल्हानिहाय नियोजन देण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील वन विभाग नगर, संगमनेर उपविभागीय वनाधिकारी, सामाजिक वनीकरण, वन्यजीव विभाग, तसेच इतर शासकीय व निमशासकीय कार्यालयांना एक कोटी १७ लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट आहे. त्यानुसार वन विभाग व सामाजिक वनीकरणाने वृक्ष तयार केले आहेत. 

सध्या वन विभागाकडे दीड कोटी रोपे तयार आहेत. यामध्ये सुमारे एक कोटी वृक्ष यंदा तयार करण्यात आले असून, मागील वर्षातील ५० लाख वृक्ष शिल्लक आहेत. नगर वन विभागाच्या २१ आणि संगमनेर उपविभागात येणाऱ्या ११ रोपवाटिकांमध्ये, तसेच सामाजिक वनीकरणाच्या रोपवाटिकांमध्ये ही रोपे तयार करण्यात आली आहेत. नगर विभागात १३०६.३२ हेक्‍टर क्षेत्रावर १७ लाख ३२ हजार, संगमनेर उपविभागात २२५४.३१ हेक्‍टर क्षेत्रावर साडेबावीस लाख वृक्षलागवड केली जाणार आहे. सामाजिक वनीकरण विभागाला २१ लाखांचे उद्दिष्ट आहे. वृक्षलागवडीस एक जुलैपासून सुरवात होणार असून, ३० सप्टेंबरपर्यंत ही लागवड होणार आहे. 

मागील वर्षीची ९४ हजार रोपे शिल्लक भिंगार नर्सरीमध्ये एक लाख ५२ हजार ८२०, शेंडी नर्सरीमध्ये एक लाख २५ हजार, तर मागील वर्षीची शिल्लक ९४ हजार ६३८ अशी एकूण तीन लाख ५२ हजार ४५८ रोपे तयार आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com