शेतकरी सन्मान निधी योजनेच्या दोन वर्षपूर्तीच्या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या
अॅग्रो विशेष
‘पोकरा’ अनुदानातून अनेक घटक वगळले
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातून (पोकरा) राज्यात हरितगृहांकरिता वाटल्या जाणाऱ्या अनुदानाचा गैरवापर होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
पुणे : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातून (पोकरा) राज्यात हरितगृहांकरिता वाटल्या जाणाऱ्या अनुदानाचा गैरवापर होत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे अनुदानातून आठ घटक वगळण्यात आले आहेत.
‘पोकरा’चे प्रकल्प संचालक विकासचंद्र रस्तोगी यांनी राज्यातील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना संरक्षित शेतीच्या घटकांसाठी दिल्या जाणाऱ्या अनुदानित घटकांबाबत दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. पूर्वसंमती दिलेल्या शेतकऱ्यांनी अशा घटकांची आता खरेदी केली असल्यास अनुदानासाठी ते पात्र ठरतील. तशा सूचना ‘पोकरा’ने उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.
एटीपी सिंगल आणि डबल पिस्टन पंप हा एकमेव घटक आता ऐच्छिक ठेवण्यात आला आहे. शेडनेटमधील ट्रायलायसिंग सिस्टीममधील ‘क्रॉप क्लिप्स’देखील अनुदानातून वगळण्यात आली आहे. जीआय वायरला प्रति वर्ग मीटर कमाल २३ रुपये आणि ट्रायलायसिंग ट्विनला तीन रुपयांपर्यंत अनुदान मिळणार आहे.
‘पोकरा’ प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, मोनोनेटचे आयुष्यमान हे टेपनेटपेक्षा जास्त आहे. त्यामुळे अनुदानासाठी शेडनेटला वापरली जाणारी शेडिंग नेट किंवा इनसेक्ट नेट ही मोनोनेट प्रकारातील गृहीत धरणे बंधनकारक राहील. शेडनेटमधील हवावहन करणारे पंखेदेखील अनुदानातून वगळण्यात आले आहेत.
शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीनुसार कोणत्याही नोंदणीकृत सेवा पुरवठादाराकडून हरितगृहाचे किंवा शेडनेटगृहाचे काम करण्यास मुभा देण्यात आली आहे. मात्र वापरले जाणारे साहित्य हे तांत्रिक निकष, दर्जा व आराखडे हे भारतीय मानांकन संस्थेची (बीआयएस) मानक बाळगणारी असतील, असेही ‘पोकरा’चे म्हणणे आहे.
या घटकांना वगळले
ऐच्छिक घटकांच्या नावाखाली अनुदान काढून हे घटक इतरत्र हलविले जात असल्याचा संशय होता. त्यामुळे आता अनुदानयोग्य घटकांच्या यादीतून टेन्शिओमीटर, लक्स मीटर, पीएच मीटर, ईसी मीटर, डिजिटल थर्मोमीटर प्लस हायग्रोमीटर, वेट-ड्राय बल्ब थर्मोमीटर, गटूर पंप, सेल्फ अॅक्टिंग डायएफ्रन पिस्टन पंप वगळण्यात आले आहेत.
- 1 of 670
- ››