सिंधुदुर्गात भातपिकांचे अतोनात नुकसान

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हयात मुसळधार पाऊस सुरू आहे. बुधवारी रात्री एक वाजल्यापासून संततधार सुरू आहे. पावसामुळे अनेक भागात पुरस्थिती निर्माण झाली आहे.
Severe damage to paddy crop in Sindhudurg
Severe damage to paddy crop in Sindhudurg

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हयात मुसळधार पाऊस सुरू आहे. बुधवारी रात्री एक वाजल्यापासून संततधार सुरू आहे. पावसामुळे अनेक भागात पुरस्थिती निर्माण झाली आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे भातपीकाचे मोठे नुकसान झाले आहे. समुद्रातही वादळीवारे वाहत असल्यामुळे शेकडो मच्छीमार नौकांनी किनाऱ्याला आश्रय घेतला आहे.

जिल्ह्यात मागील चार, पाच दिवसांपासून पाऊस सुरूच आहे. परंतु बुधवारी रात्री एक वाजल्यापासून जिल्ह्यात संततधार सुरू झाली आहे. अखंडपणे पावसाच्या सरी कोसळत आहेत. उत्तरेकडील वैभववाडी, कणकवली या तालुक्यात तर पावसाने कहरच केला आहे. १२ तासांहून अधिक काळ सतत पाऊस पडत आहे. त्यामुळे नदीनाल्यांच्या पाणीपातळीत प्रचंड वाढ झाली आहे. काही भागातील मुख्यरस्त्यांवर पाणी आले. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक १२४ मि.मी पावसाची नोंद झाली. 

पावसामुळे भातपीकांचे अतोनात नुकसान होत आहे. काही ठिकाणी पुराचे पाणी भातपीक शिरल्यामुळे पीक भुईसपाट झाले आहे. पिकाला कोंब फुटले आहेत. भातपीक परिपक्व झाले आहे. काही शेतकऱ्यांनी फक्त दोन ते तीन दिवसच कापणी केली आहे. त्यामुळे ९० टक्के भातकापणी अजुनही शिल्लक आहे. पावसामुळे कापणी करायची कशी, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. दरम्यान गुरूवारी दुपारी दीड वाजल्यानंतर पावसाचा जोर काहिसा  ओसरला.

कारीवडे परिसराला धक्का

कारीवडे, ओटवणे, चराठा आणि माडखोल (ता. सावंतवाडी) परिसराला बुधवारी रात्री ८ वाजुन ५३ मिनिटांनी धक्का बसला. अनेकांनी हा धक्का अनुभवला. परंतु, तो नेमका कशामुळे बसला, हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. हा भुकंपाचा धक्का नव्हता, असे तिलारी प्रकल्पाचे उपअभियंता बाळासाहेब अजगेकर यांनी सांगितले. 

भातपीक परिपक्व आहे. दोन दिवसच कापणी केली. मात्र, पावसामुळे कापणी करता येत नाही. परिपक्व झालेल्या भातांचा दाणा गळून पडू लागला आहे. तर, काही पिकांना कोंब फुटले आहेत. - सत्यवान पाटील, शेतकरी, खांबाळे, ता. वैभववाडी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com