agriculture news in marathi sex sorted semen new technology in animal husbandry | Agrowon

सेक्स सॉर्टेड सीमेन : पशुपालनातील नवीन तंत्रज्ञान

डॉ. विनोद शेंडे
गुरुवार, 14 मे 2020

गाई विताना अधिक प्रमाणात कालवडीचा जन्म व्हावा यासाठी सेक्स सॉर्टेड सिमेनचा वापर फायदेशीर ठरतो.सध्याच्या स्थितीत भारतामध्ये विभिन्न प्रकारच्या जातींच्या वळुंच्या (सहिवाल, गीर, एचएफ, जर्सी, संकरित गाई, मुऱ्हा, जाफराबादी, इत्यादी) सेक्स सॉर्टेड रेत मात्रा उपलब्ध आहेत.
 

गाई विताना अधिक प्रमाणात कालवडीचा जन्म व्हावा यासाठी सेक्स सॉर्टेड सिमेनचा वापर फायदेशीर ठरतो.सध्याच्या स्थितीत भारतामध्ये विभिन्न प्रकारच्या जातींच्या वळुंच्या (सहिवाल, गीर, एचएफ, जर्सी, संकरित गाई, मुऱ्हा, जाफराबादी, इत्यादी) सेक्स सॉर्टेड रेत मात्रा उपलब्ध आहेत.

बहुतांश पशुपालक दूध उत्पादनासाठी गाईंपासून कालवडीच्या जन्माची अपेक्षा करतात.या सर्व बाबी लक्षात घेता गाई विताना अधिक प्रमाणात कालवडीचा जन्म व्हावा यासाठी लिंग निर्धारित किंवा सेक्स सॉर्टेड सिमेनचा अत्यंत उपयोग होऊ शकतो. लिंग निर्धारित रेत मात्रांचा कृत्रिम रेतनासाठी वापर करून जास्तीत जास्त प्रमाणात कालवडींचा जन्म शक्य आहे. सध्याच्या स्थितीत भारतामध्ये विभिन्न प्रकारच्या जातींच्या वळूंच्या (सहिवाल, गीर, एचएफ, जर्सी, संकरित गाई, मुऱ्हा, जाफराबादी, इत्यादी) सेक्स सॉर्टेड रेत मात्रा उपलब्ध आहेत.

असे आहे तंत्रज्ञान

 • विज्ञानानुसार वळूंच्या विर्यामध्ये एक्स (X) आणि वाय (Y) या दोन प्रकारच्या विशिष्ट गुणसूत्रे असणारे शुक्राणू आढळतात. याउलट मादी पशूंमध्ये स्त्रीबिजात एक्स एक्स ( XX ) प्रकारच्या गुणसूत्रांचे प्रमाण असते.
 • गर्भ धारणेच्या वेळी वळूच्या वीर्यामधील एक्स गुणसूत्र स्त्रीबिजामधील एक्स गुणसूत्रासोबत मिळतो तेव्हा त्यापासून कालवडी जन्मास येतात आणि याउलट वाय गुणसूत्र असलेले शुक्राणू स्त्रीबिजामधील एक्स गुणसूत्राबरोबर मिसळते, त्यापासून नर वासरू जन्मास येते.
 • लिंग निर्धारित रेतमात्रा उत्पादनासाठी उच्च आनुवंशिकता असलेल्या वळूपासून प्राप्त झालेल्या वीर्यातील एक्स आणि वाय गुणसूत्रे असलेले शुक्राणू वेगळे करण्याची आवश्यकता असते. असे तंत्रज्ञान विकसित झाले आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने लिंग निर्धारित वीर्याची संकल्पना पुढे आली आहे.
 • पशूंमध्ये संभावित इच्छेनुसार नर वासरू आणि कालवड जन्मास आणण्याचे तंत्रज्ञान अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया यासारख्या विकसित राष्ट्रांमध्ये वापरले जाते.

सेक्स सॉर्टेड सीमेनचे फायदे

 • पारंपरिक कृत्रिम रेतन पद्धतीद्वारे दुधाळ जनावरांमध्ये गर्भधारणेच्यावेळी नर व मादी जन्माची जवळपास ५०:५० टक्के एवढी संभावना असते. याउलट सेक्स सॉर्टेड सीमेन रेतमात्रेचे कृत्रिम रेतन करतेवेळी उपयोग केला तर पशूंमध्ये ९० टक्के इतक्या शुद्धतेच्या कालवडीचा (मादी) जन्म होऊ शकतो.
 • सेक्स सॉर्टेड सीमेनचा वापर केल्यामुळे उच्च गुणवत्ता, आनुवंशिकता आणि उत्पादन क्षमता असलेल्या कालवडी जन्मास येतात. त्यामुळे डेअरी फार्म मधील दूध उत्पादनात वाढ होऊ शकते.
 • पारंपारिक कृत्रिम रेतनाद्वारे नर वासरू जन्मास आल्यावर त्याच्या संगोपनाचा खर्च वाढतो. मात्र जर सेक्स सॉर्टेड सीमेनचा वापर करून जर नर वासरे जन्मास आल्यावर त्याची नर वळू संगोपन केंद्र किंवा गोठीत रेत प्रयोगशाळा यांना विक्री करू शकतो. कारण हे उच्च गुणवत्ता आणि आनुवंशिकता असलेले वासरू असते. त्यापासून चांगला मोबदला मिळू शकतो.
 • नर वासरांचा शारीरिक बांधा हा मादी वासरांच्या तुलनेत अधिक असतो. त्यामुळे विण्याच्या वेळी कष्टप्रसूतीची शक्यता असते. सेक्स सॉर्टेड सीमेनचा वापर करून मादी वासरांना जन्मास आणून कष्टप्रसूतीची शक्यता कमीत कमी करता येते.
 • सेक्स सॉर्टेड सीमेनचा वापर अधिक प्रमाणात केल्यामुळे गोठ्यात मादी वासरांचा जन्म होऊन दुधाळ पिढी गोठ्यामध्येच तयार होते.
 • पशुपालकाजवळ वर्षभर अधिक दूध देणाऱ्या गायी उपलब्ध झाल्यामुळे नियमित पैसे मिळतात.

सेक्स सॉर्टेड सीमेन तंत्रज्ञान वापरताना 

 • सेक्स सॉर्टेड सीमेन मात्रांची किंमत सरासरी १२०० ते १८०० रुपये इतकी आहे. त्यामुळे काहीवेळा ही किंमत पशुपालकांना परवडत नाही.
 • सेक्स सॉर्टेड सीमेन प्रती रेतमात्रेमध्ये शुक्राणूची संख्या कमी असल्याने गर्भ धारणेचे प्रमाण कमी होण्याचे एक कारण आहे.
 • सेक्स सॉरटेड सीमेन मात्रेचे रेतन करतेवेळी प्रशिक्षित कुशल रेतकाची आवश्यकता असते.

संपर्क - डॉ. विनोद शेंडे, ९२८४५१०३४१
(वरिष्ठ संशोधन अधिकारी , बाएफ, उरुळीकांचन,जि.पुणे)


इतर कृषिपूरक
जनावरातील मिथेन वायू उत्सर्जन कमी...जनावरांनी खालेल्या चाऱ्यांवर कोठीपोटात जिवाणू,...
चारा टंचाईच्या काळातील पशुआहार...उन्हाळ्यामध्ये चाऱ्याची टंचाई भासत असते. त्याला...
शेळ्यांसाठी दशरथ घासदशरथ घास या चारा पिकाच्या लागवडीसाठी हलक्या ते...
दूध एक ‘पोषक आहार’१ जून हा जागतिक दूध दिवस म्हणून साजरा केला जातो....
कोंबड्यांमध्ये दिसते खनिजांची कमतरताकोंबड्यांच्या आहारातील खनिजे विविध प्रकारची...
जनावरांना द्या पुरेसे खनिज मिश्रणजनावरांच्या आहारात खनिज मिश्रणांचा पुरवठा...
शेळ्यांसाठी पौष्टिक चारा - शेवगा पालाशेळीपालन व्यवसायाचे यश हे मुख्यत्त्वे वापरलेल्या...
उष्णतेच्या लाटेत जनावरे सांभाळाजनावरे सावलीत, थंड ठिकाणी, खेळती हवा असणाऱ्या...
मत्स्यशेतीकरीता शेततळ्याची पूर्वतयारीयेत्या वर्षांत शेततळ्यामध्ये उत्तम मत्स्य उत्पादन...
जनावरांना चावणाऱ्या माशांवर नियंत्रण...लम्पी स्कीन डिसीज या आजाराच्या विषाणूचा प्रसार...
मधमाशांच्या संवर्धनासह व्यावसायिक...मधमाशांद्वारे वनस्पतीमध्ये होणारे परागीभवन व...
पशुपालक,पशुतज्ज्ञांनो आरोग्याची घ्या...जनावरांच्या गोठ्यात काम करणारे नियमित मजूर किंवा...
कासदाहाची लक्षणे ओळखा, उपचार करागाई, म्हशींना कासदाह होऊ नये यासाठी दररोज...
कृषी सलग्न व्यवसायासाठी ‘मुद्रा’मुद्रा योजनेत तीन प्रकार आहेत.  शिशू...
सेक्स सॉर्टेड सीमेन : पशुपालनातील नवीन...गाई विताना अधिक प्रमाणात कालवडीचा जन्म व्हावा...
मत्स्यपालनाची बायोफ्लॉक पद्धतीभारतामध्ये मत्स्यपालनाची बायोफ्लॉक पद्धती ही नवीन...
कलिंगडापासून बनवा जॅम,योगर्टकलिंगडामध्ये जीवनसत्त्व अ आणि क भरपूर प्रमाणात...
जनावरांच्या आहारात काटे विरहीत...काटे विरहीत निवडुंगांमध्ये शुष्कपदार्थ, प्रथिने,...
हायड्रोपोनिक्‍स तंत्राद्वारे चारा...हायड्रोपोनिक्स तंत्राद्वारे सात ते दहा दिवसांत...
जनावरांना खुराकासोबत द्या बायपास...जनावरांना चाराटंचाईच्या काळात हवी तेवढी प्रथिने...