Agriculture news in marathi Shab-e-Barat, Ambedkar Jayanti on pray at homeः Sharad Pawar | Agrowon

शब-ए-बारात, डॉ. आंबेडकर जयंतीला घरुनच प्रार्थना करा ःशरद पवार 

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 3 एप्रिल 2020

मुंबईः सध्या ‘कोरोना’ने सर्वत्र धुमाकूळ घातला असून सर्वांनी संचारबंदीचे नियम पाळा. सामाजिक अंतर ठेवा, असा सल्ला देत येणाऱ्या ‘शब-ए-बारात’ व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीवेळी घराबाहेर पडू नका, घरात राहूनच प्रार्थना करा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी गुरुवारी (ता. २) केले आहे. 

मुंबईः सध्या ‘कोरोना’ने सर्वत्र धुमाकूळ घातला असून सर्वांनी संचारबंदीचे नियम पाळा. सामाजिक अंतर ठेवा, असा सल्ला देत येणाऱ्या ‘शब-ए-बारात’ व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीवेळी घराबाहेर पडू नका, घरात राहूनच प्रार्थना करा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी गुरुवारी (ता. २) केले आहे. 

‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर श्री. पवार यांनी सोशल मीडियाद्वारे जनतेशी संवाद साधला. दिल्लीतील मरकजमध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये एक ‘कोरोना’चा रूग्ण होता. यामुळे जमातमधील अनेकांना ‘कोरोना’ची लागण झाली आहे. येणाऱ्या ८ व ९ एप्रिलच्या दरम्यानची रात्र ही शब-ए-बारात आहे. त्यावेळी मुस्लीम सामाजाची विशेष नमाज असते. पण, ‘कोरोना’चा फैलाव टाळण्यासाठी सर्वांनी घरात राहूनच नमाज अदा करावी. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीवेळी घराबाहेर पडून गर्दी करू नका. यामुळे ‘कोरोना’चा फैलाव वाढण्याची शक्यता आहे. घरात राहूनच या संकटापासून मुक्ती व्हावी, अशी प्रार्थना करण्याचे आवाहन श्री. पवार यांनी केले. 

दिल्लीच्या मरकजमध्ये देश-विदेशातून हजारो तबलिगी जमातचे लोक धार्मिक कार्यक्रमासाठी जमा झाले होते. हा कार्यक्रम लॉकडाऊनच्या पूर्वीच आयोजित करण्यात आला होता. पण, या ठिकाणी विदेशातूनही लोक आल्याने त्यातील कोणालातरी ‘कोरोना’ची लागण झाली होती. त्याद्वारे जमातमधील इतरांनाही त्याची लागण झाली. लॉकडाऊनपूर्वीच त्यातील काही जण आपापल्या घरी परतले होते. पण, मरकजमध्ये रुग्ण आढळल्याने देशभरात खळबळ माजली आहे. विविध राज्यातील लोक यामध्ये सहभागी असल्याने सर्व राज्यातील जिल्हा प्रशासनाने मरकजला जाऊन आलेल्यांनी समोर येत माहिती द्यावी, असे आवाहन केले आहे. त्यामुळे शब-ए-बारात व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीवेळी गर्दी न करता घरात राहूनच प्रार्थना करा व जे निजामुद्दीन येथे घडले ते घडू देऊ नका, असे आवाहन ही श्री. पवार यांनी सर्वांना केले आहे. 

गर्दी होणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन नको ः पवार 
तसेच संचारबंदीच्या काळातही अनेक जण रस्त्यावर फिरत आहेत. काही ठिकाणी सामाजिक अंतर ठेवले जात नाही. यामुळे आपल्याच जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पोलिस व प्रशासनाला सहकार्य करुन स्वतःची व परिवाराची काळजी घ्या. गर्दी होईल अशा कार्यक्रमांचे आयोजन टाळा, असे आवाहनही श्री. पवार यांनी केले आहे.


इतर ताज्या घडामोडी
भाटी मिऱ्या समुद्रात नांगरलेली जहाज...चिपळूण, रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाचा जोरदार...
जीएम पिकांच्या मान्यतेसाठी केंद्राकडे...नागपूर: जागतिकस्तरावर जीएम पिकांच्या लागवडीस...
विविध मागण्यांसाठी रेशन दुकानदार ...नाशिक: राज्यातील स्वस्त धान्य दुकानदार व...
मका खरेदी तातडीने सुरू कराबुलडाणा ः मोताळा तालुक्‍यात मागील दहा दिवसांपासून...
शेतकऱ्यांना त्रास झाल्यास भाजप आंदोलन...अकोला ः शेतकऱ्यांना बी-बियाणे, कर्जपुरवठा तसेच...
सिंधुदुर्गात पाऊस सुरूच सिंधुदुर्ग: जिल्ह्यात तिसऱ्या दिवशीही...
जादा खरेदी दर, नापासच्या अधिक ...अकोला ः महाबीजने सोयाबीन वाणाच्या प्रमाणित...
ऊस उत्पादक केंद्राचे वैरी आहेत काय? कोल्हापूर: केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या...
अकोला जिल्हा परिषदेचा ७६ कोटींचा निधी...अकोला  ः ‘कोरोना’मुळे निर्माण झालेल्या...
हिंगोली जिल्ह्यात ५९ कोटींचे पीककर्ज...हिंगोली   ः हिंगोली जिल्ह्यातील विविध...
कापूस, सोयाबीन उत्पादक विमा...गडचिरोली: धान उत्पादक ३४ हजार शेतकऱ्यांना सुमारे...
नांदेडमध्ये ४७ कोटी ४७ लाखांचे पीक कर्ज...नांदेड : नांदेड जिल्ह्यातील बॅंकांनी...
जालन्यात पाच हजार टन खते एकाच दिवशी...जालना  : जिल्ह्यात एकाच दिवशी पाच हजार...
कर्जमुक्‍ती योजनेची प्रक्रिया ३०...भंडारा ः शासनाने जाहीर केलेल्या महात्मा ज्योतिराव...
जयपूरमध्ये वीज पडून लाखो रुपयांच्या...नाशिक : पूर्वमोसमी पाऊस सुरू झाल्यानंतर बागलाण...
बुलडाणा जिल्ह्यात १५ तारखेपर्यंत...बुलडाणा  : यंदा जिल्ह्यात मॉन्सूनपूर्व पाऊस...
भाजीपाल्याची थेट खरेदी विक्री व्यवस्था...पुणे ः कोरोना टाळेबंदीमध्ये शहरातील विविध भागात...
सातारा जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरीसातारा ः जिल्ह्यात सोमवारी सर्वदूर पावसाने हजेरी...
कापूस खरेदीसाठी शेतकऱ्यांचा रास्तारोकोयवतमाळ ः महागाव तालुक्‍यातील गुंज येथील...
पुणे जिल्ह्यात पीककर्ज वितरणात...पुणे ः लाॅकडाऊनच्या काळात होरपळून निघालेल्या...