नगर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट

पावसाअभावी पिकांना फटका
पावसाअभावी पिकांना फटका

नगर  ः जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी फक्त ६५.५५ टक्के पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी याच काळात १२४. ४९ टक्के पाऊस झाला होता. अजून किमान ५० टक्के पावसाची गरज आहे; मात्र तशी शक्‍यता दिसत नसल्याने जिल्ह्यावर तीव्र दुष्काळाचे सावट आहे. खरीप हंगाम तर गेलाच; पण रब्बीही संकटात आहे. धरणांत पाणीसाठा कमी असल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न बिकट होणार आहे. त्याचबरोबर दुग्धव्यवसायही संकटात आहे. ऐन पावसाळ्यात ४२ गावे, १५० वाड्या-वस्त्यांवर ३९ टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे.

या वर्षी पुरेसा पाऊस न झाल्याने खरीप पिकांची उगवण योग्य झाली नाही. पुढे पावसात मोठा खंड पडल्याने पिकांची वाढ पूर्ण खुंटली. मूग, उडीद, कापूस, सोयाबीन, बाजरी, वाटाणा या पिकांना याचा मोठा फटका बसला. जिल्ह्यात खरिपाची पाच लाख ६० हजार ३१३ हेक्‍टरवर पेरणी झाली होती. पावसाअभावी उत्पादन ६० ते ७० टक्के घटण्याची शक्‍यता आहे. ऊस व फळांच्या उत्पादनातही मोठी घट होणार आहे. पाऊस नसल्याने रोग व किडींचा प्रार्दुभाव झाला आहे.

सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून रब्बीची पेरणी सुरू होते. पाऊस नसल्याने अद्याप पेरण्यांना सुरवातही झालेली नाही. जिल्ह्यात रब्बीचे सहा लाख ६७ हजार २६० हेक्‍टर क्षेत्र आहे. रब्बीसाठी ८० हजार ५९५ क्विंटल बियाणे मागविण्यात आले आहे. जिल्ह्यात दूधव्यवसायाने शेतकऱ्यांना तारले आहे; पण तीव्र पाणीटंचाईमुळे या व्यवसायावरही संकट घोंघावत आहे.

जिल्ह्यातील तीन लाख ३० हजार ३९० शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी अर्ज केले होते. त्यापैकी दोन लाख ५५ हजार ८२५ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला. ही रक्कम ९१७ कोटी ९४ लाख रुपये आहे. शेतीसाठी विविध योजनांतर्गत देण्यात आलेले दोन हजार ७६३ कोटी ४७ लाख रुपयांचे कर्ज थकीत आहे. दुष्काळी स्थितीमुळे ही थकबाकी अधिक वाढण्याची शक्‍यता आहे.

गेल्या वर्षी या काळात धरणे १०० टक्के भरली होती. या वर्षी भंडारदरा व निळवंडे वगळता सर्व धरणांत अतिशय कमी पाणी आहे. त्याचा विपरीत परिणाम रब्बी, तसेच ऊस व फळबागांवर होणार आहे. ३१ ऑक्‍टोबरला होणाऱ्या नियोजन बैठकीत पाणीवाटपाचे आरक्षण जाहीर केले जाते. पाऊस नसल्यामुळे कारखानदारी व वीजनिर्मिती, शेती, नागरी पाणीपुरवठा योजना अडचणीत आल्या आहेत.  

प्रमुख धरणांमधील पाणीसाठा (कंसात टक्केवारी)
भंडारदरा ११,०३९ (१००)
मुळा १९,५०७ (७४.९३)
निळवंडे ६९८२ (८२.६६)
आढळा ६०६ (५६.७०)
मांडओहोळ ६०.७२ (१४.६४)
घाटशिळ पारगाव

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com