agriculture news in Marathi, shahu sugar factories won first prize, Maharashtra | Agrowon

कागलचा शाहू कारखाना देशात सर्वोत्कृष्ट

टीम अॅग्रोवन
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

नवी दिल्ली : राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाच्या वतीने कारखान्यांना देण्यात येणारे देश पातळीवरील पुरस्कार जाहीर झाले आहेत. कागल (जि. कोल्हापूर) येथील श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याने देशात सर्वोत्कृष्ट कारखान्याचा बहुमान पटकाविला आहे. २१ पुरस्कारांपैकी १० पुरस्कार पटकावून महाराष्ट्राने देशात प्रथम क्रमांक मिळवला आहे. राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी ही माहिती दिली.

नवी दिल्ली : राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाच्या वतीने कारखान्यांना देण्यात येणारे देश पातळीवरील पुरस्कार जाहीर झाले आहेत. कागल (जि. कोल्हापूर) येथील श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याने देशात सर्वोत्कृष्ट कारखान्याचा बहुमान पटकाविला आहे. २१ पुरस्कारांपैकी १० पुरस्कार पटकावून महाराष्ट्राने देशात प्रथम क्रमांक मिळवला आहे. राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी ही माहिती दिली.

दिल्ली येथील एन. सी. यू. आय. सभागृहात २८ ऑगस्टला पारितोषिक वितरण सोहळा होणार आहे. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रामविलास पासवान, रावसाहेब दानवे आदींची या सोहळ्यास प्रमुख उपस्थिती असेल.
उत्तर प्रदेशने चार पुरस्कार मिळवून दुसरा क्रमांक मिळवला. हरियाणा, गुजरात व तमिळनाडू या राज्यातील सहकारी साखर कारखान्यांनी प्रत्येकी दोन पुरस्कार मिळवले असून मध्य प्रदेशने एक पुरस्कार पटकावून या वार्षिक पुरस्कार स्पर्धेत प्रथमच प्रवेश मिळवला आहे. 

विविध विभागांत यश मिळविलेल्या राज्यातील कारखान्यांमध्ये श्री दत्त (शिरोळ, कोल्हापूर), हुतात्मा किसन अहिर (वाळवा, सांगली), विघ्नहर जुन्नर, पुणे), श्री पांडुरंग (श्रीपूर, सोलापूर), विलास, लातूर, भाऊसाहेब थोरात कारखाना, (संगमनेर, नगर), जवाहर, (हुपरी, कागल), सदाशिवराव मंडलिक (हमीदवाडा, कोल्हापूर), आदींचा समावेश आहे. साखर उताऱ्यानुसार उच्च स्तर व निम्न स्तर या विभागात विविध प्रकारांमध्ये पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

राष्ट्रीय सहकारी साखर महासंघ ही देशभरातील सर्व २६२ सहकारी साखर कारखाने व ९ राज्य सहकारी साखर संघाची शिखर संस्था आहे. महासंघातर्फे सन १९८५ पासून दरवर्षी देशातील सहकारी साखर कारखान्यांच्या ऊस विकास; तांत्रिक क्षमता व आर्थिक व्यवस्थापन या क्षेत्रातील कामगिरीचे विश्‍लेषण करण्यात येते व केंद्र शासनाच्या प्रमुख संचालक (साखर) यांच्या अध्यक्षतेखालील तज्ज्ञांच्या समितीद्वारे गुणांक देऊन विजेते निश्‍चित करण्यात येतात.

यंदाच्या पुरस्कार योजनेत विक्रमी ९९ सहकारी साखर कारखान्यांनी सहभाग घेतला होता. त्यांची दोन गटात वर्गवारी करण्यात आली. सरासरी किमान १० टके साखर उतारा असणारे महाराष्ट्र, कर्नाटक व गुजरात यांचा एक गट व पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, तमिळनाडू या १० टक्क्‍यांपेक्षा कमी साखर उतारा असणाऱ्या राज्यांचा दुसरा गट तयार करून प्रत्येक गटातील विषयवार सर्वाधिक गुण मिळवलेल्या कारखान्यांना पारितोषिकांसाठी पात्र ठरविण्यात आले. या व्यतिरिक्त सर्वाधिक ऊस गाळप, सर्वाधिक साखर उतारा व सर्वाधिक साखर निर्यातीसाठीदेखील विजेते निश्‍चित करण्यात आले.

विभाग  उच्च साखर उतारा गट  निम्न साखर उतारा गट
ऊस विकास  श्री दत्त साखर कारखाना शिरोळ, कोल्हापूर (प्रथम)  गंगा किसान मिल, मोरणा, उत्तर प्रदेश (प्रथम)
  पद्मभूषण क्रांतिवीर नागनाथआण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर वाळवा (द्वितीय) नवलसिंह मिल, बुऱ्हानपूर मध्य प्रदेश (द्वितीय)
तांत्रिक कार्यक्षमता  श्री विघ्नहर साखर कारखाना जुन्नर पुणे (प्रथम)   किसान सहकारी मिल सथीऑन, उत्तर प्रदेश (प्रथम)
  श्री पांडुरंग साखर कारखाना श्रीपूर सोलापूर (द्वितीय)   कॅथल को आपॅरेटीव्ह मिल, कैशल हरियाना (द्वितीय)
आर्थिक व्यवस्थापन  विलास सहकारी साखर कारखाना, लातूर (प्रथम)  सुब्रमण्यम को-ऑपरेटिव्ह शुगर मिल, धर्मपुरी, तमिळनाडू (प्रथम)
  सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना संगमनेर, नगर (द्वितीय)  कल्लाकुरीची को-ऑपरेटिव्ह शुगर मिल, विल्लूपुरम, तमिळनाडू (द्वितीय) शुगर मिल, विल्लूपुरम, तमिळनाडू (द्वितीय)
सर्वाधिक ऊस गाळप   जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना, हुपरी, कोल्हापूर   शहाबाद को-ऑपरेटिव्ह शुगर मिल-हरियाना
सर्वाधिक साखर उतारा  सदाशिवराव मंडलिक कागल तालुका सहकारी साखर कारखाना, हमीदवाडा कोल्हापूर  किसान सहकारी चिनी मिल, पोवायन, उत्तर प्रदेश
सर्वाधिक साखर निर्यात  श्री नर्मदा खंड उधोग सहकारी मंडळी, गुजरात (प्रथम)  कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखाना, इंदापूर, पुणे (द्वितीय)
उत्कृष्ट सहकारी साखर कारखाना सहकारी खांड उधोग मंडळी, गणदेवी, गुजरात किसान सहकारी चिनी मिल, स्नेहरोड, नजिबाबाद, उत्तर प्रदेश

 


इतर अॅग्रोमनी
संरक्षण सिद्धतेप्रमाणेच आरोग्य...सार्वजनिक आरोग्य आणि करोना सारख्या गंभीर साथी...
अनेक वर्षानंतर कापसाची विक्रमी खरेदीभारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) अनेक वर्षानंतर...
शेतीमालाचे फ्युचर्स व्यवहार सुरूकोरोनामुळे ‘एनसीडीइएक्स'ने २० एप्रिल च्या...
विमानसेवा बंदचा भाजीपाला निर्यातीला...पुणे : फेब्रुवारी ते मे या काळात युरोपीय...
वेळेवर करा कर्जाची परतफेडसुरवातीच्या काळात उत्पन्न सुरू होईपर्यंतचा...
मध निर्यातीत मोठी वाढनाशिक: भारतात उत्पादित होणाऱ्या नैसर्गिक मधाला...
शेतकरी उत्पादक कंपन्या ‘डिजिटल’ होणार;...पुणे : राज्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांना डिजिटल...
कुटुंबाच्या अर्थकारणात डाळिंबासह लिंबू...सात एकरांवरील डाळिंब हे मुख्य पीक असले तरी...
देशात साखर उत्पादनात ५७ लाख टनांनी घटकोल्हापूर: देशातील गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला...
राज्य अर्थसंकल्पातील महत्वाच्या तरतुदीकृषी   महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती...
'फिक्की'च्या राष्ट्रीय परिषदेत जैन...दिल्ली ः इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री...
ऊस, आले पिकासह जमिनीच्या विश्रांतीचे...कोल्हापूर जिल्ह्यातील शेडशाळ (ता. शिरोळ) येथील...
अन्नधान्याचे यंदा विक्रमी उत्पादन नवी दिल्ली: देशात यंदा खरीप हंगामात...
राज्यातील रेशीम बाजारात १० कोटींची...नागपूर ः राज्यात रेशीमकोष खरेदी बाजारपेठेला...
आर्थिक निर्णयांनी वाढवला प्रियंकाताईंचा...पती गौरव काकडे यांच्या आग्रहावरून पुणे शहरातील...
गेल्या वर्षीच्या साखर निर्यातीसाठी...कोल्हापूर : गेल्या वर्षीची (२०१८-१९) साखर निर्यात...
आंतरराष्ट्रीय डाळ परिषदेकडे उद्योजकांचे...पुणे  : जागतिक कडधान्य उत्पादन व बाजारपेठेला...
कच्च्या साखरेच्या दरात उच्चांकी वाढकोल्हापूर : जागतिक बाजारात कच्च्या साखरेच्या दरात...
साखरेच्या दुहेरी किमतीसाठी सूत्र तयार...नवी दिल्ली: साखरेचे घसरणारे दर स्थिर...
आंतरपिकांतून कुटुंबाचे अर्थकारण केले...माचले (ता. चोपडा, जि. जळगाव) येथील दीपक माणिक...