बुडताना दिसले अन् काही क्षणांत दिसेनासे झाले...

वरुड तालुक्यातीलझुंज धबधबा येथे मंगळवारीसकाळी दहा वाजताच्या सुमारास नाव उलटून अकरा जण बुडाल्याच्या दुर्घटनेतील घटना घडली होती. वर्धा नदीच्या पात्रात डोळ्यांसमोर बेपत्ता होण्याने श्याम मटरे हादरून गेले होते.त्यांनी हा थरार कथन केला...
बुडताना दिसले अन् काही क्षणांत दिसेनासे झाले...
बुडताना दिसले अन् काही क्षणांत दिसेनासे झाले...

वरुड, जि. अमरावती : डोळ्यांसमोर सारे बुडताना दिसत होते आणि... आणि काही क्षणांत सारेच दिसेनासे झाले. झुंज धबधबा येथे मंगळवारी (ता. १४)   बचावलेल्या श्याम मटरे यांनी हा सारा थरार अनुभवला. भावाचे निधन, त्यांच्या दशक्रियेचा कार्यक्रम अन् त्या वेळी कुटुंबातील अकरा सदस्यांचे वर्धा नदीच्या पात्रात डोळ्यांसमोर बेपत्ता होण्याने श्याम मटरे हादरून गेले होते. या वेळी त्यांनी हा थरार कथन केला...  वरुड तालुक्यातील बेनोडा शहीद पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या झुंज धबधबा येथे मंगळवारी (ता.१४) सकाळी दहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली होती. या घटनेच्या वेळी १३ जण नावेत होते. त्यातील दोघे पोहत बाहेर आले, तर ९ मृतदेह  सापडले होते. मात्र अन्य २ जण अद्यापही बेपत्ता आहेत. पाण्यात पडल्यावर पोहत काठावर आलेल्या श्याम मटरे यांनी गुरुवारी (ता.१६) त्यांच्या डोळ्यासमोर जे घडले त्याची माहिती दिली.  ते म्हणाले, ‘‘मोठ्या भावाचे निधन झाल्याने त्यांची राख शिरविण्यासाठी आम्ही परिवारातील सदस्य नावेत बसून जात होतो. काही अंतरावर आम्ही राख शिरविली, त्यानंतर परतीच्या प्रवासाला निघालो असता नदीचे पाणी अचानक वाढले व नाव अनियंत्रित होऊन उलटली. मी जावयाचा हात पकडला होता. त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा हात सुटला. समोर नारायण मटरे हे पाण्यात बुडत असलेल्या दोन वर्षीय चिमुकलीला वाचविण्याचा प्रयत्न करीत होते. परंतु त्यांचा दम पुरला नाही व ते डोळ्यांसमोरच मुलीसह बुडाले. काही क्षणांतच काय होत आहे याचा थांगपत्ता लागत नव्हता. डोळ्यांसमोर सारे बुडताना दिसत होते, आणि काही क्षणांत सारे दिसेनासे झाले.’’ स्वतः पाहिलेल्या या घटनेने श्याम मटरे पूर्णपणे हादरून गेले आहेत. प्रत्येक क्षण त्यांच्या नजरेसमोर येताच त्यांचा जीव कासावीस होतो. त्यांचे जावई, बहीण तसेच कुटुंबातील अन्य सदस्य दिसेनासे झाल्याने श्याम मटरे यांची नजर अजूनसुद्धा वर्धा नदीच्या पात्रावर स्थिरावली होती..!

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com