agriculture news in marathi sham matare tells the thrilling incident of relatives drowning in flood | Page 4 ||| Agrowon

बुडताना दिसले अन् काही क्षणांत दिसेनासे झाले...

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 17 सप्टेंबर 2021

वरुड तालुक्यातील झुंज धबधबा येथे मंगळवारीसकाळी दहा वाजताच्या सुमारास नाव उलटून अकरा जण बुडाल्याच्या दुर्घटनेतील घटना घडली होती. वर्धा नदीच्या पात्रात डोळ्यांसमोर बेपत्ता होण्याने श्याम मटरे हादरून गेले होते. त्यांनी हा थरार कथन केला... 

वरुड, जि. अमरावती : डोळ्यांसमोर सारे बुडताना दिसत होते आणि... आणि काही क्षणांत सारेच दिसेनासे झाले. झुंज धबधबा येथे मंगळवारी (ता. १४)   बचावलेल्या श्याम मटरे यांनी हा सारा थरार अनुभवला. भावाचे निधन, त्यांच्या दशक्रियेचा कार्यक्रम अन् त्या वेळी कुटुंबातील अकरा सदस्यांचे वर्धा नदीच्या पात्रात डोळ्यांसमोर बेपत्ता होण्याने श्याम मटरे हादरून गेले होते. या वेळी त्यांनी हा थरार कथन केला... 

वरुड तालुक्यातील बेनोडा शहीद पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या झुंज धबधबा येथे मंगळवारी (ता.१४) सकाळी दहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली होती. या घटनेच्या वेळी १३ जण नावेत होते. त्यातील दोघे पोहत बाहेर आले, तर ९ मृतदेह  सापडले होते. मात्र अन्य २ जण अद्यापही बेपत्ता आहेत. पाण्यात पडल्यावर पोहत काठावर आलेल्या श्याम मटरे यांनी गुरुवारी (ता.१६) त्यांच्या डोळ्यासमोर जे घडले त्याची माहिती दिली. 

ते म्हणाले, ‘‘मोठ्या भावाचे निधन झाल्याने त्यांची राख शिरविण्यासाठी आम्ही परिवारातील सदस्य नावेत बसून जात होतो. काही अंतरावर आम्ही राख शिरविली, त्यानंतर परतीच्या प्रवासाला निघालो असता नदीचे पाणी अचानक वाढले व नाव अनियंत्रित होऊन उलटली. मी जावयाचा हात पकडला होता. त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा हात सुटला.

समोर नारायण मटरे हे पाण्यात बुडत असलेल्या दोन वर्षीय चिमुकलीला वाचविण्याचा प्रयत्न करीत होते. परंतु त्यांचा दम पुरला नाही व ते डोळ्यांसमोरच मुलीसह बुडाले. काही क्षणांतच काय होत आहे याचा थांगपत्ता लागत नव्हता. डोळ्यांसमोर सारे बुडताना दिसत होते, आणि काही क्षणांत सारे दिसेनासे झाले.’’ स्वतः पाहिलेल्या या घटनेने श्याम मटरे पूर्णपणे हादरून गेले आहेत. प्रत्येक क्षण त्यांच्या नजरेसमोर येताच त्यांचा जीव कासावीस होतो. त्यांचे जावई, बहीण तसेच कुटुंबातील अन्य सदस्य दिसेनासे झाल्याने श्याम मटरे यांची नजर अजूनसुद्धा वर्धा नदीच्या पात्रावर स्थिरावली होती..!


इतर ताज्या घडामोडी
नांदेड जिल्ह्यात पीकविमा परतावा आजपासून...नांदेड : पंतप्रधान पीकविमा योजनेत सहभागी...
परभणी जिल्ह्यात खतांची मागणी वाढलीपरभणी ः परभणी जिल्ह्यात शनिवार (ता.६) अखेर पर्यंत...
पुणे जिल्ह्यात ढगांमुळे शेतकरी धास्तावलेपुणे ः परतीच्या पावसाने फळबागा व शेतीला मोठा फटका...
नगर जिल्ह्यात साडेपाच हजार शेतकऱ्यांना...नगर ः राज्य सरकारच्या धोरणानुसार महात्मा जोतिराव...
एकरकमी ‘एफआरपी’साठी ‘बळिराजा’च्या...सांगली : ‘एकरकमी एफआरपी मिळालीच पाहिजे’, ‘या...
सरकारने कोंबड्या जगविण्यासाठी शेतकरी...यवतमाळ : केंद्र सरकारने कोंबड्यांना खाद्य...
अंजीर बाग एकदम ‘हेल्दी’ आहे......सोमेश्‍वरनगर, जि. पुणे : ‘एकाही पानावर स्पॉट नाही...
विजेअभावी पिकांना पाणी देण्यास अडचणी नाशिक : अतिवृष्टीमुळे शेतमालाचे नुकसान झाले,...
जिल्हा बॅंकेवर बिनविरोध निवडीचा खडसेंचा...जळगाव ः जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या...
केळी पिकासाठी ३६ हजार रुपये परतावा द्या...जळगाव : पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा...
बार्शी बाजार समिती सौरऊर्जेवरसोलापूर ः बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीत ९६...
द्राक्षबागेतील सद्यपरिस्थितीतील रोगांचा...बहुतांश द्राक्ष बागांमध्ये सध्या फळछाटणी पूर्ण...
धनत्रयोदशीला जळगावात ३० किलो सोने विक्रीजळगाव : जळगावची केळी व अस्सल सोन्यासाठी सुवर्ण...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष पट्ट्याला...सांगली : श्रीलंका, तमिळनाडू किनाऱ्यालगतच्या...
नांदेड जिल्ह्यात आचारसंहितेने...नांदेड : जिल्ह्यातील साडेआठ लाख नुकसानग्रस्तांना...
अकोला जिल्ह्याची पैसेवारी ५३ पैसेअकोला : जिल्ह्यात या वर्षी झालेला अनेकदा...
सांगली जिल्हा बँक जागावाटपात महविकास...सांगली ः जिल्हा मध्यवर्ती बॅकेच्या निवडणुकीसाठी...
रत्नागिरी तालुक्यात भाताच्या लोंबीत...रत्नागिरी : फुलोऱ्या‍च्यावेळी पडलेल्या मुसळधार...
देगलूर-बिलोलीची निवडणूक ‘महाविकास’च्या...नांदेड : देगलूर - बिलोली विधानसभा निवडणुकीत...
ऊसबिलातून वीजबिल कपातीच्या आदेशाची...नगर : शेतकऱ्यांच्या ऊसबिलातून साखर कारखान्यांनी...