agriculture news in Marathi Shanmukhan Nathan working on nimb planting Maharashtra | Agrowon

शण्मुख नाथन झटतोय निंब वृक्ष वाढीसाठी

टीम अॅग्रोवन
सोमवार, 13 जुलै 2020

वृक्ष संवर्धन, पर्यावरणाच्या उद्देशाने झपाटलेला अंदमान निकोबारचा मूळ रहिवासी असलेला शण्मुख नाथन नावाचा ध्येयवेडा अकोला जिल्ह्यात निंब वृक्ष वाढीसाठी दिवसरात्र झटतो आहे.

अकोला ः वृक्ष संवर्धन, पर्यावरणाच्या उद्देशाने झपाटलेला अंदमान निकोबारचा मूळ रहिवासी असलेला शण्मुख नाथन नावाचा ध्येयवेडा अकोला जिल्ह्यात निंब वृक्ष वाढीसाठी दिवसरात्र झटतो आहे. त्याने सुरु केलेल्या या उपक्रमाला जिल्हा प्रशासनानेही सहकार्य दिले असून शुक्रवारी (ता. १०) जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उपस्थित राहत अकोला ते अकोट या ४२ किलोमीटर रेल्वे मार्गाच्या दुतर्फा निंब बीज रोवण्याला सुरुवात केली.

नाथन यांच्या भारत वृक्ष क्रांती मिशन संस्थेमार्फत जिल्ह्यात निंबवृक्ष लागवड व सीडबॉल रोपण अभियान सुरु करण्यात आले. याचे उद्घाटन नायगाव येथे जिल्हाधिकारी पापळकर यांनी केले. अकोला जिल्हा व शहराला पर्यावरणदृष्ट्या अत्यंत लाभदायक असलेल्या या अभियानात प्रत्येक अकोलेकरांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पापळकर यांनी यावेळी केले. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, तहसीलदार विजय लोखंडे तसेच भारत वृक्ष क्रांती मिशनचे शण्मुख नाथन यांची उपस्थिती होती.

अकोला ते अकोट हा नवीने ब्रॉडगेज रेल्वेमार्ग तयार झाला आहे. या रेल्वेमार्गाच्या दुतर्फा हे बीजारोपण करण्यात येणार आहे. नाथन यांनी संपूर्ण उन्हाळाभर निंबोळी गोळा केली. त्यापासून बी व माती एकत्र करीत त्याचे हजारोच्या संख्येत बॉल तयार केले. आता नाथन हे सीडबॉल सर्वत्र टाकत आहेत. त्यांच्या या उपक्रमाला अकोला जिल्ह्यातील पर्यावरण प्रेमींकडून साथ मिळत आहे. प्रशासनाच्यावतीने पापळकर यांनी आवाहन करीत नागरिकांनी उघड्या असलेल्या जागांवर निंब बिया टाकण्याचे आवाहन केले. 

अकोला पॅटर्न म्हणून ओळख
नाथन यांनी भारत वृक्ष क्रांती मिशन अंतर्गत सन २०१५ पासून अकोला जिल्ह्यात एक विद्यार्थी एक वृक्ष, एक जन्म एक वृक्ष ही वृक्षारोपणाची मोहीम राबविली. या मोहिमेला ‘अकोला पॅटर्न’ म्हणून ओळख मिळाली. त्यानंतर आता वृक्ष रोपणाचा एक भाग म्हणून संपूर्ण अकोला जिल्ह्यातील प्रत्येक गावात निंबाच्या झाडाचे बिजांचे रोपण करण्याचा मिशनने प्रयत्न सुरु केला आहे. या उपक्रमाअंतर्गत अकोला जिल्ह्यात निंबाच्या झाडाच्या बिया गोळा करुन आपआपल्या शेताच्या बांधावर ७ ते १० फूट अंतरावर दोन इंचाचे खड्डे करुन त्यात बिया रोपण केले जात आहे. अकोला वासियांना उन्हाळ्यात जास्त तापमानाचा सामना करावा लागतो. जर जिल्ह्यात निंबाच्या झाडांचे मोठ्या प्रमाणात रोपण झाल्यास त्यामुळे वातावरण थंड होऊन उन्हाळ्यामध्ये तापमान कमी होण्यास मदत होईल. 


इतर अॅग्रो विशेष
अभियान नको, योजना हवीकेंद्र सरकारने आत्मनिर्भर योजनेंतर्गत शेतमाल...
इर्व्हिनिया रॉट रोगाची केळी पिकात समस्या जळगाव ः जिल्ह्यात केळी पिकात...
`पोकरा`मधून शेतमजुरांना प्रशिक्षण द्याऔरंगाबाद: नानाजी देशमुख कृषी संजीवनी...
ऑगस्टमध्ये प्रथमच भरले सीना धरण नगर: दुष्काळी कर्जत, श्रीगोंदा आणि आष्टी...
कोल्हापूर : जनावरे बाजारातील...कोल्हापूर: `कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनमुळे...
साखर निर्यातवाढीसाठी केंद्राची ‘रॅपिड अ...कोल्हापूर: देशातून जास्तीत जास्त साखर निर्यात...
परभणीत सोळा हजार शेतकऱ्यांचे आधार...परभणी ः महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
सोयाबीन बियाणेप्रकरणात शेतकऱ्यांना एक...अमरावती : विभागातील पाच जिल्ह्यांत सोयाबीन बियाणे...
‘ई-नाम’, शीतसाखळी बळकट करण्याची गरज;...पुणे: चीनशी व्यापारी संबंध डळमळीत झाल्यानंतर...
‘सिट्रस नेट’वर केवळ दोनशे शेतकऱ्यांची...नागपूर : प्रशासकीय यंत्रणांच्या उदासीनतेमुळे ‘...
मका खरेदी केंद्रांवर शेतकरी ठाण मांडून औरंगाबाद: हमीभावाने खरेदीसाठी ३१ जुलैपर्यंत...
पावसाचा जोर वाढण्याची शक्यता  पुणे ः  बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे...
भाजीपाला शेतीतून अर्थकारणाला गतीडोंगरगाव (ता.जि.अकोला) शिवारातील योगेश नागापुरे...
राज्यात धरणांमध्ये ३८ टक्के साठापुणे : मॉन्सूनचा पाऊस सुरू झाल्यानंतर जून...
जुलैअखेर पावसाने सरासरी गाठलीपुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) हंगामाची...
सांगली जिल्ह्यात २६ हजार हेक्टरने ऊस...सांगली : जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यासह अन्य...
मुगावर काय फवारायचे?अकोला ः कडधान्य वर्गीय पिकांपैकी एक प्रमुख...
कीडनाशकांवरील बंदी- शेतकऱ्यांसाठी तारक...केंद्रीय कृषी मंत्रालयाने २७ कीडनाशकांवर बंदी...
दूध दर आंदोलनाचा राज्यभर एल्गारपुणे: दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती व...
पीकविमा नोंदणीत महाराष्ट्राची आघाडीपुणे: डिजिटल तंत्राचा वापर करून पंतप्रधान पीकविमा...