शरद भोजन योजनेतून निराधार, दिव्यांगांना जेवण

पुणे : ‘कोरोना’चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्यात निराधार असलेल्या दिव्यांग, गरोदर माता, दुर्धर आजार असलेल्या व्यक्ती आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या दोन वेळच्या मोफत जेवणाची सोय करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या ‘शरद भोजन योजने’तून आत्तापर्यंत जिल्ह्यातील ३५२ लाभार्थ्यांनी लाभ घेतल्याची माहिती समाज कल्याण विभागाच्या सभापती सारिका पानसरे यांनी दिली.
Sharad Meal Scheme from provide meal for the disabled

‘कोरोना’ विषाणूच्या संसर्गामुळे निराधार असलेले दिव्यांग, गरोदर माता, दुर्धर आजार असलेल्या व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक या व्यक्तींसाठी घरी जाऊन कोणी जेवण करायला तयार नाही. या निराधार व्यक्तींची दोन वेळच्या जेवणाची सोय व्हावी, निराधारांच्या पोषणाचा प्रश्‍न संपेल आणि अंगणवाडी मदतनीस यांनाही आर्थिक स्वरूपाची मदत होईल, या उद्देशाने शरद भोजन योजना राबविण्यात येत आहे. 

अंगणवाडी मदतनीस यांच्यामार्फत निराधार व्यक्तींच्या जेवणाची व्यवस्था करणे व अन्न पुरवठा करणे यासाठी प्रतिथाळी ५० रुपये दर ठरविण्यात आला आहे. दोन वेळचे जेवणाकरता अंगणवाडी मदतनिसांच्या खात्यावर १०० रुपये प्रतिदिन, प्रतिव्यक्ती या प्रमाणे अनुदान जमा करण्याची योजना ‘कोरोना’ संसर्ग कालावधीत जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणार आहे. 

एप्रिल महिन्यापासून सुरू करण्यात आलेल्या योजनेतून सोमवारपर्यंत (ता. १३) जिल्ह्यातील २३२ निराधार दिव्यांग आणि १२० निराधार ज्येष्ठ नागरिक अशा एकूण ३५२ लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. या लाभार्थ्यांच्या संख्येत आणखी वाढ होणार असल्याचे समाजकल्याण अधिकारी प्रवीण कोरंगटीवार यांनी सांगितले. तालुकानिहाय निराधार दिव्यांग लाभार्थ्यांची संख्या (कंसात निराधार ज्येष्ठ नागरिक) : आंबेगाव २४ (१०), बारामती १४, भोर ५० (४५), दौंड ८ (५६), हवेली ९७, इंदापूर १३ (९), जुन्नर २, खेड ११, मावळ ६, मुळशी २, पुरंदर ५.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com