agriculture news in Marathi Sharad mill scheme for who does not have any document Maharashtra | Agrowon

कोणतेही कागदपत्र नसणाऱ्यांना शरद भोजन योजनेतून धान्य वाटप

टीम अॅग्रोवन
सोमवार, 27 एप्रिल 2020

कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी टाळेबंदी करण्यात आल्याने ग्रामीण भागात रोजंदारीवर काम करणारे अडकून पडले आहेत.

पुणे: कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी टाळेबंदी करण्यात आल्याने ग्रामीण भागात रोजंदारीवर काम करणारे अडकून पडले आहेत. या लोकांकडे रेशनिंगकार्ड व इतर कागदपत्र नसल्याने सार्वजनिक वितरण प्रणालीतून अन्नधान्य वितरणाचा लाभ घेता येत नाही. कोणतेही कागदपत्र नसणाऱ्या दुर्बल नागरिकांना शरद भोजन योजनेतून धान्य वाटप करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी दिली.   

कोरोना संसर्गाच्या काळात प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहे. संपूर्ण टाळेबंदीमुळे रोजंदारीवर काम करणारे लोक बेरोजगार झाले आहेत. शासनाकडून अन्न धान्याची व्यवस्था करण्यात आली असली, तरी रेशनिंगकार्ड तसेच कोणतेही कागदपत्र उपलब्ध नसणाऱ्या नागरिकांना सार्वजनिक वितरण प्रणालीतून लाभ मिळण्यास अडचणी येत आहेत.

भटके समाज, गावाबाहेरील, राज्याबाहेरील दुर्बल घटक, नागरिकांना अन्नधान्य पुरवणे गरजेचे आहे. अशा लोकांना जिल्हा परिषदेच्या शरद भोजन योजनेतून अन्नधान्य दिले जाणार आहे. भारतीय अन्नधान्य महामंडळ, सामाजिक संस्था, तसेच कंपन्यांच्या सीएसआर निधीतून ही योजना राबविण्यात येणार आहे. 

सार्वजनिक वितरण प्रणालीतून धान्य न मिळणाऱ्या, धान्य खरेदीची कुवत नसणाऱ्या, उदरनिर्वाहाचा प्रश्‍न गंभीर असणाऱ्या कुटुंबाने ग्रामपंचायतीकडे अर्ज दाखल करावा. कुटुंबातील कोणत्याही एका व्यक्तीच्या आधारकार्डाद्वारे पोष्टात खाते उघडून संबंधित कुटुंबाला प्रतिव्यक्ती ५ किलो धान्य दिले जाईल.

धान्य वितरण करताना दोन रुपये किलो दराने गहू, तीन रुपये किलो दराने तांदूळ उपलब्ध करून दिला जाईल. ही रक्कम ग्रामनिधीमध्ये जमा करण्यात येणार आहे. समाजकल्याण समितीच्या सभापती सारिका पानसरे यांनी हा ठराव मांडला. दत्तात्रय झुरुंगे यांनी ठरावास अनुमोदन दिले, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.

तृतीयपंथीय व कलाकारांनाही अन्नधान्य वाटप
टाळेबंदीच्या काळात कोणाचीही उपासमार होऊ नये म्हणून जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या शरद भोजन योजनेतून २०० तृतीयपंथीय आणि ५०० गरीब कलाकारांना जिल्हाधिकारी नवल किशोर राम, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते अन्नधान्य कीटचे वाटप करण्यात आले. मुंबईतील रुणवाल फाऊंडेशनचे सुभाष रुणवाल यांच्या सहकार्याने अन्नधान्य कीट पुण्यात उपलब्ध करून देण्यात आले. 
 


इतर अॅग्रो विशेष
बळीराजालाच बळी देण्याचा प्रकार?शेती क्षेत्रातील सुधारणाविषयक तीन वटहुकूम असोत...
नाशिकमध्ये कांदा निर्यातबंदीमुळे कामकाज...नाशिक : केंद्राच्या वाणिज्य मंत्रालयाने कांदा...
मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूचऔरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे...
बुलडाणा : नवीन सोयाबीनला चिखलीत ३८८१...बुलडाणा ः या हंगामात लागवड केलेल्या सोयाबीनची...
पावसाने पुन्हा दाणादाणपुणेः मराठवाड्यासह नाशिक, नगर, पुणे आणि...
फवारणी विषबाधाप्रकरण स्वित्झर्लंडच्या...यवतमाळ: यवतमाळ जिल्ह्यातील तीन शेतकऱ्यांनी २०१७...
अभूतपूर्व गदारोळात कृषी विधेयके मंजूरनवी दिल्ली: गगनभेदी घोषणा, धक्काबुक्की,...
‘आत्मा’चे पंचवार्षिक आराखडे रखडलेपुणे: शेतकऱ्यांपर्यंत कृषी विषयक योजना कशा...
‘पोकरा’ प्रकल्पातील वैयक्तिक लाभ...नांदेड : कोरोना (कोवीड -१९) संसर्गामुळे शासनाच्या...
मूग खरेदी एक ऑक्टोबरपासूनमुंबई: हमीभावाने मूग खरेदीच्या मान्यतेचा प्रस्ताव...
मराठवाड्यात वादळी पावसाची शक्यतापुणे ः राज्यात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार...
मुसळधार पावसाचा तडाखापुणे ः  मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही...
कुटुंबातील सदस्याला शेतकरी अपघात विमा...पुणे ः गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा...
मैत्रीची अन्नधान्य व्यापारातील भागीदारी...आडगाव (जि. नाशिक) येथील गोरक्ष लभडे आणि संदीप...
मराठवाड्यात मुसळधारेचा अंदाजपुणे ः विदर्भ आणि तेलंगणा दरम्यान चक्राकार...
बचत गटांच्या उत्पादनांची माहिती एका...मुंबई: महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कार्यरत...
पंजाब, हरियानात कृषी विधेयके...नवी दिल्लीः लोकसभेत मंजूर झालेल्या कृषी...
यांत्रिकीकरण अभियानाच्या अर्ज...पुणे:  राज्यात चालू वर्षीही कृषी...
मराठवाड्यात पावसाचा जोर कायमऔरंगाबाद : मराठवाड्यात शनिवारी (ता. १९)...
राज्यात ठिकठिकाणी जोरदार सरीपुणे ः राज्यात तुरळक ठिकाणी होत असलेल्या पावसाचा...