Agriculture news in Marathi Sharad Pawar and Nitin Gadkari have been conferred the degree of 'Doctor of Science' | Agrowon

शरद पवार, नितीन गडकरी यांना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ पदवी

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 26 ऑक्टोबर 2021

महात्मा फुले कृषी विद्यापीठातर्फे माजी केंद्रीय कृषिमंत्री व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय रस्ते वाहतूक विकासमंत्री नितीन गडकरी यांना यंदा ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ पदवी दिली जाणार आहे.

नगर ः महात्मा फुले कृषी विद्यापीठातर्फे माजी केंद्रीय कृषिमंत्री व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय रस्ते वाहतूक विकासमंत्री नितीन गडकरी यांना यंदा ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ पदवी दिली जाणार आहे. गुरुवारी (ता. २८) विद्यापीठात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते ३५ व्या पदवीदान समारंभात पवार, गडकरी यांना सन्मानित करण्यात येणार आहे. 

महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा ३५ वा पदवीदान समारंभ गुरुवारी (ता. २८) सकाळी अकरा वाजता कृषी विद्यापीठाच्या डॉ. नानासाहेब पवार सभागृहामध्ये ऑनलाइन व ऑनलाइन पद्धतीने होत आहे. समारंभाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल व महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी असतील. कृषिमंत्री दादा भुसे, उदयपूर येथील महाराणा प्रताप कृषी व तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नरेंद्र सिंह राठोड यांच्यासह विद्यापीठ कार्यकारी व विद्यापरिषदेचे सदस्य उपस्थित असतील. 

यावेळी माजी केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरद पवार आणि रस्ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कृषी क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल ‘‘मानद डॉक्टर ऑफ सायन्स’’ पदवी देऊन सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांनी दिली.


इतर बातम्या
किमान तापमानात घट होण्याची शक्यतापुणे : राज्यात पावसाने उघडिप दिल्यानंतर किमान...
‘महाडीबीटी’च्या कामात अडथळाअकोला ः कृषी खात्याच्या विविध योजनांचा लाभ...
कृषी निविष्ठा केंद्रांचे परवाने आता...पुणे ः राज्यातील कृषी सेवा केंद्रांना परवान्याची...
आयातीमुळे कडधान्य दर दबावातपुणे ः तुरीचा हंगाम पुढील काही दिवसांत सुरू होईल...
...तर द्राक्षाचे नुकसान टळले असतेनाशिक : गेल्या तीन वर्षांपासून कसमादे भागातील...
साहित्य संमेलनाचे अनुदान शेतकरी,...नाशिक : वामनदादा कर्डक जन्मशताब्दी साहित्यनगरी...
देशी वाणाने सकस उत्पादन ः राहीबाई पोपेरेसांगली : पारंपरिक बियाणाला रासायनिक खताच्या...
वीज पुरवठा सुरळीत न केल्यास  ढोरा...शेवगाव, जि. नगर : महावितरणने थकीत वीज बिलासाठी...
सहा हजार शेतकऱ्यांना नवीन पीककर्ज परभणी ः जिल्ह्यात यंदाच्या (२०२१-२२) रब्बी...
मॉन्सूनोत्तर पावसाचा सांगलीत  १२ हजार...सांगली : अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील द्राक्ष,...
शिवरायांच्या स्वराज्यापासून महात्मा...कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी...
मराठवाड्यात आंब्यावर संकटाचे ढगऔरंगाबाद : यंदा आंब्यावर संकटाचे ढग कायम आहेत....
उचंगी प्रकल्पग्रस्तांचे शंभर टक्के...   कोल्हापूर : आजरा तालुक्यातील उचंगी...
श्रीरामपुरात बिबट्याचे चार तास...श्रीरामपूर, जि. नगर ः श्रीरामपूर शहरातील मोरगे...
शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करू :...सांगली ः गेल्या काही दिवसापांसून संपूर्ण राज्यात...
क्षारपड जमीन सुधारण्यासाठी  केंद्राचे...कोल्हापूर : क्षारपड जमीन सुधारणा योजनेस केंद्र...
पावसामुळे द्राक्ष बागांचे  दोन हजार...पुणे ः जिल्‍ह्यात गेल्या आठवड्यात १ आणि २ डिसेंबर...
खानदेशात पुन्हा ढगाळ वातावरण कायम जळगाव ः  खानदेशात पावसाळी व ढगाळ वातावरण...
चाळीसगाव (जि.जळगाव) : अवकाळी पावसामुळे...चाळीसगाव, जि.जळगाव : चाळीसगाव, पाचोरा, भडगाव आदी...
जळगावः अॅग्रोवन व आयसीएल कंपनीतर्फे...जळगाव ः ॲग्रोवन आणि आयसीएल कंपनीच्या संयुक्त...