सध्याचे राज्यकर्ते नादान; आव्हानांचा कालखंड : पवार

सध्याचे राज्यकर्ते नादान; आव्हानांचा कालखंड : पवार
सध्याचे राज्यकर्ते नादान; आव्हानांचा कालखंड : पवार

पुणे : विद्यमान सरकारएवढी नादान राज्यकर्त्याची भूमिका यापूर्वी कधीही पाहिलेली नाही. सध्या आव्हानांचा कालखंड असून, राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य जनतेच्या मागे समर्थपणे उभे राहावे, असे आवाहन राष्ट्रवादी काॅंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी येथे केले. राष्ट्रवादी काॅँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक आणि पक्षाची सर्वसाधारण सभा रविवारी (ता. २९) येथे झाली. यावेळी प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील यांची निवड करण्यात आली, तर राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविराेध निवड झाल्याचे पक्षाचे महासचिव डी. पी. त्रिपाठी यांनी जाहीर केले.  श्री. पवार म्हणाले, ‘‘ज्या तरुणाईने भाजपला मतदान करत सत्तेत आणले, त्या तरुणाईसह समाजात नैराश्‍य आले आहे. तरुणाईला ‍यातून बाहेर काढण्यासाठी त्यांच्यात विश्वास निर्माण करण्याची काळजी राष्ट्रवादी काॅँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना घ्यावी लागणार आहे.’’ ‘‘आघाडी सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी देताना ७१ हजार काेटी थेट त्यांच्या बॅंक खात्यांवर जमा केले. तर माेदी सरकारने उद्याेगपतींना लाभ मिळावा म्हणून ८६ हजार काेटी बॅंकांना दिले आहेत. यामुळे हे सरकार सर्वसामान्यांचे नाही, तर उद्याेगपतींना अडचणीतून बाहेर काढणारे सरकार आहे,’’ अशी टीकाही श्री. पवार यांनी केली.  ‘‘आगामी निवडणुकांमध्ये मतदान मशिनवर विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. यासाठी मतदान अगाेदर प्रत्येक मशिनचा डेमाे घेण्यासाठी आग्रहाने भांडावे लागणार आहे. तर प्रत्येक बुथवर प्रभावी कार्यकर्त्यांचा संच बनवावा लागणार आहे,’’ असेही पवार म्हणाले.   जयंत पाटील म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांच्या आत्महत्या हाेत असताना सरकारच्या पापण्यांना पाणीदेखील दिसत नाही. यामुळे शेतकरी आणि सर्वसामान्यांचा सरकारवर विश्वास राहिलेले नाही. मध्यमवर्गीय महागाईमुळे त्रस्त आहेत. शेती प्रश्नांबराेबरच मध्यमवर्गीयांच्या प्रश्नांसाठी हल्लाबाेलच्या माध्यामातून राष्ट्रवादीने रस्त्यावर संघर्ष केला. विविध क्षेत्रांत क्रमांक एकचे राज्य अधाेगतीकडे चालले असून, सर्वसमान्यांमध्ये अस्वस्थता आहे. न्यायव्यवस्थेवरदेखील शंका उपस्थित केली जात आहे.’’ ‘‘सरकारने युवकांचा विश्वासघात केला. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य नागरिकांपर्यंत जाण्याची गरज आहे. सत्तांतराची ताकद शरद पवार आणि राष्ट्रवादीतच असून, समविचारी पक्षांसाेबत जाण्याचा आमचा विचार आहे. यासाठी मित्रपक्ष आम्हाला समजून घेतील. राष्ट्रवादी पक्षात परफाॅर्म काउंट झाला पाहिजे तरच पक्षाला पुढील ५०-१०० वर्ष काेणी हलवू शकणार नाही. प्रत्येक वाॅर्ड कमिटी स्थापन करण्यात येणार असून, वाॅर रूम स्थापन करून, तेथून चाैकशी हाेणार आहे. माहितीत खाेट आढळली तर पक्ष तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही. यासाठी निष्ठेने आणि प्रामाणिकपणे काम करावे,’’ असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. यावेळी डी. पी. त्रिपाठी, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे, अजित पवार, सुनील तटकरे आदींनी मनाेगत व्यक्त केली.  रास्त कारण असल्याशिवाय आम्ही भूमिका घेणार नाही. पाेटनिवडणुकांमध्ये आम्ही यापूर्वी जिंकलेली जागा आम्हीच लढणार आहे. रडीचा डाव आम्हाला पसंत नाही, मित्रपक्षाने जे करायचंय ते सरळ करावं. - शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com