ज गामधील सर्वांत मोठी यशस्वी लोकशाही असलेला आपला देश आहे.
बातम्या
धो धो पावसात भिजत शरद पवारांचे साताऱ्यात घणाघाती भाषण
सातारा: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी (ता.१८) रात्री झालेल्या सभेत भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या लोकसभा पोटनिवडणुकीतील उमेदवाराची मुसळधार पावसात चांगलीच धुलाई केली. पवारांच्या प्रत्येक वाक्याला भरपावसातही उपस्थित तरूणायीने जोरदार प्रतिसाद दिला.
या सभेला प्रचंड गर्दी होती. सभेदरम्यान पाऊस सुरू होता, मात्र लोकांचा उत्साह किंचीतही कमी होत नव्हता, लोक राष्ट्रवादीच्या गाण्यांवर मनसोक्त नाचत होते.

पवार म्हणाले, माणसाने झालेल्या चुका मान्य करायला पाहिजेत. तशी चूक मी मान्य करतो. लोकसभेला विरोध असतानाही चुकीच्या माणसाला मी उमेदवारी दिली. मात्र आता ती चूक सुधारली आहे. सातारकर त्याप्रमाणे निर्णय करतील आणि महाराष्ट्रात चमत्कार घडवतील.
कोसळणाऱ्या मुसळधार पावसात माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी आपले भाषण सुरु ठेवले अन तब्बल सात ते दहा मिनिटांच्या भाषणातून पवारांनी कार्यकर्त्यांना उर्जा देत माझी चूक झाली पण आता नाही... लोकसभा पोटनिवडणुकीत श्रीनिवास पाटील आणि विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस - राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीच्या उमेदवारांना विजय करण्याचे आवाहन केले.
कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज (शुक्रवार) राष्ट्रवादीचे कॉंग्रेसचे सर्वेसर्वो शरद पवार यांची जिल्हा परिषद मैदानावर सभा आयोजिली होती. सभेचे प्रारंभी आमदार मकरंद पाटील, बाळासाहेब चव्हाण, शशिकांत शिंदे यांची भाषणे झाली. आमदारांचे भाषण सुरु असताना पावसाच्या सरी कोसळत होत्या. शिंदे यांचे भाषण सुरु झाल्यानंतर पाऊस वाढू लागला. संपुर्ण मैदान कार्यकर्त्यांनी खचाखच भरले होते. शिंदे यांचे जोशपुर्ण भाषणामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह वाढत होता. कार्यकर्ते खूर्च्या डोक्यावर तसेच उभे राहिले. काही मिनीटांतच शरद पवार यांचे सभास्थळी आगमन झाले.
व्यासपीठवरील कार्यकर्त्यांनी माईकवरुनच कोण आला रे कोण आला असे उच्चारत्ताच मोदी शहाचा बाप आला...पून्हा कोण आला रे आला...महाराष्ट्राचा बाप आला अशा घोषणा देण्यास प्रारंभ केला. त्यानंतर रामराजे नाईक - निंबाळकर यांचे भाषण झाले. त्यांनी ही उदयनराजे यांचे नाव न घेता आता समाधान वाटत आहे. निश्वास सोडल्याचे वक्तव्य करताच एकच जल्लोष झाला. त्यानंतर शरद पवार यांचे भाषण सुरु झाले. तेव्हा पाऊस वाढू लागला. मुसळधार पावसात पवार यांनी आपले भाषण सुरु ठेवून कार्यकर्त्यांना उर्जा दिली.
- 1 of 1500
- ››