agriculture news in marathi, sharad pawar discuss with chief minister on rehabilitation issues in flood affected area, mumbai, maharashtra | Agrowon

मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन शरद पवार यांनी मांडल्या पूरग्रस्तांच्या व्यथा

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 22 ऑगस्ट 2019

मुंबई  ः कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांतील पूरग्रस्त भागाचा दौरा करून पूरग्रस्तांच्या व्यथा जाणून घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्याशी पूरग्रस्तांच्या मदतीबाबत; तसेच पुनर्वसनासंदर्भात चर्चा केली.

मुंबई  ः कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांतील पूरग्रस्त भागाचा दौरा करून पूरग्रस्तांच्या व्यथा जाणून घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्याशी पूरग्रस्तांच्या मदतीबाबत; तसेच पुनर्वसनासंदर्भात चर्चा केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या भेटीतील चर्चेची माहिती दिली. महापुराचा तडाखा बसलेल्या नागरिकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी, नुकसानीची योग्य भरपाई करण्यासाठी, बाधितांच्या पुनर्वसनासाठी सरकारने युद्धपातळीवर प्रयत्न करावेत, अशी विनंती मुख्यमंत्र्यांना करण्यात आल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले. पूरग्रस्तांच्या मदतीबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले असून, त्यांनी काही मागण्या अंशत: मान्य केल्याचे श्री. पाटील म्हणाले.

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीने पूरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी सोमवारी काही निर्णय जाहीर केले. मात्र. या निर्णयात आणखी शिथिलता आणण्याची गरज आहे. सरकारने पूरग्रस्त शेतकऱ्यांना एक हेक्टर मर्यादेपर्यंत पीककर्ज माफ करण्याची घोषणा केली आहे. सरकारने एक हेक्टरची मर्यादा न ठेवता शेतकऱ्यांचे सर्व पीककर्ज माफ करावे. पुरामुळे ज्या घरांना भेगा पडल्या अशी घरेसुद्धा नव्याने बांधून द्यावीत.

पुरात जनावरे वाहून गेल्याने शेतकऱ्यांना जनावरापोटी ७० ते ८० हजार रुपयांपर्यंत मदत करावी. फळपिकांना एक लाख रुपयांपर्यंत नुकसानभरपाई द्यावी, अशी राष्ट्रवादीची मागणी आहे. ऊस गाळप हंगाम सुरू होणार आहे. मात्र, पुरामुळे साखर उताऱ्यात घट येणार आहे. ही घट लक्षात घेऊन सरकारने शेतकऱ्यांना अनुदान द्यावे. महापुरामुळे साखर उद्योगासमोर मोठे संकट निर्माण झाले आहे. या संकटातून साखर कारखान्यांना बाहेर काढण्यासाठी सरकारने मदत करावी, अशी मागणी केल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले.


इतर ताज्या घडामोडी
चार हजार शेतकऱ्यांना र्दृष्टीदोष दूर...गोंडपिपरी, जि. चंद्रपूर : व्यवसाय करताना बेरीज-...
रेशीम उद्योगासाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे...औसा, जि. लातूर :  ‘‘रेशीम उद्योगाकडे...
सकाळी सौम्य थंडी तर दुपारी उष्ण हवामानमहाराष्ट्रावर आठवड्याच्या सुरुवातीला १०१४...
औरंगाबाद जिल्ह्यात विजेअभावी सिंचनाची...औरंगाबाद : पंधरवडा रात्री तर पंधरवडा दिवसा...
जीआय टॅगिंगयुक्त हापूसला दीड लाखापर्यंत...रत्नागिरी : ‘‘निर्यातीत हापूसचा टक्के घसरत असून...
कावपिंप्रीत चार वर्षांनंतर बहरली पिकेकावपिंप्री, जि. जळगाव : यंदा कावपिंप्रीसह...
नीरा-देवघरच्या पाणीवाटपावरुन पिलीवमध्ये...सोलापूर : राज्य सरकारने नीरा- देवघर धरणातील...
खानदेशात कांदा दरातील चढउतारामुळे...जळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
पूरक अन् प्रक्रिया उद्योगावर जर्मनीचा भरउत्तर जर्मनीतील सपाट भूप्रदेश आणि पूर्व...
जालन्यात कांदा २२०० ते २५०० रुपये...जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
गुणकारी डाळिंबडाळिंब हे अत्यंत गुणकारी फळ असून भारतात सर्वत्र...
हुंडी चिठ्ठी, मायक्रो फायनान्स...अकोला  ः जिल्ह्यात हुंडी चिठ्ठी तसेच मायक्रो...
नाशिक येथे तीनदिवसीय पुष्पोत्सवाला...नाशिक  : प्रत्येकाच्या हक्काची तीन झाडं हवी...
न्हावी परिसरात मका पिकावर लष्करी अळीचा...न्हावी, जि. जळगाव ः न्हावीसह परिसरात मक्‍याची...
पोल्ट्री उद्योगाला हवा मदतीचा हातपुणे: बाजारभावातील नरमाईमुळे पोल्ट्री उद्योग...
हापूस निर्यातीसाठी निर्यातीसाठी पणन...रत्नागिरी ः निर्यातीत हापूसचा टक्का घसरत असून तो...
नीरा देवधर, गुंजवणीतून समन्यायी पाणीवाटपमुंबई ः नीरा देवघर व गुंजवणी धरणांचे कालवे...
तापमानवाढीचा धोका वेळीच ओळखावा लागेल:...औरंगाबाद: निसर्गाच्या दोलायमानतेत मानवी...
नगरमधील नऊ तालुक्यांत तेलबियांची पेरणीच...नगर ः तेलबियांची (गळीत धान्य) पेरणी वाढावी यासाठी...
सातारा जिल्ह्यात ५५ लाख क्विंटल...सातारा : जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या गाळपाची...