agriculture news in Marathi Sharad pawar elected as president of Rayat Maharashtra | Agrowon

‘रयत’च्या अध्यक्षपदी शरद पवार यांची निवड 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 29 जून 2020

आशिया खंडात सर्वांत मोठ्या असलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांची फेरनिवड करण्यात आली.

सातारा: आशिया खंडात सर्वांत मोठ्या असलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांची फेरनिवड करण्यात आली. सचिवपदी नवी मुंबई येथील कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजचे प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर यांची निवड करण्यात आली आहे. 

दरम्यान, उच्च शिक्षण सहसचिवपदी येथील धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. प्रतिभा गायकवाड यांची, तसेच माध्यमिक शिक्षण सहसचिवपदी नगर येथील संजय नागपुरे यांची निवड करण्यात आली आहे. या वेळी संस्थेच्या उपाध्यक्षपदी प्रा. डॉ. एन. डी. पाटील, गणपतराव देशमुख, जयश्री चौगुले, अरुण कडू पाटील, पी. जे. पाटील, आमदार चेतन तुपे यांची निवड करण्यात आली आहे. मॅनेजिंग कौन्सिल सदस्यांचीही निवड करण्यात आली आहे. 

रयत शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची आगामी तीन वर्षांसाठी निवड करण्याकरिता जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत संस्थेच्या जनरल बॉडीची शनिवारी सभा झाली. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची निवड दर तीन वर्षांनी केली जाते. या निवडी आजवर कर्मवीर पुण्यतिथी दिवशी म्हणजेच नऊ मे रोजी केल्या जात. यंदा कोरोनामुळे या निवडी पुढे ढकलण्यात आल्या होत्या.

सुरक्षित अंतराचे नियम पाळून जिल्हा परिषदेच्या सभागृहात सभा झाली. संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. अनिल पाटील यांच्यासह सर्व जनरल बॉडीचे सदस्य उपस्थित होते. सचिवपदासाठी अनेकांची नावे चर्चेत होती. मात्र, बैठकीत प्राचार्य डॉ. शिवणकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. 

निवड झालेले मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य पुढीलप्रमाणे : डॉ. अनिल पाटील, ॲड. भगीरथ शिंदे, दिलीप वळसे पाटील, अजित पवार, रामशेठ ठाकूर, ॲड. रवींद्र पवार, मीनाताई जगधने, डॉ. विश्वजित कदम, प्रभाकर देशमुख, दादाभाऊ कळमकर, बाबासाहेब भोस, मुमताजअली शेख, डॉ. यशवंत थोरात, रामचंद्र गायकवाड, कृष्णराव घाटगे, डॉ. भारत जाधव, डॉ. शिवलिंग मेनकुदळे, चंद्रकांत वाव्हळ, डॉ. भाऊसाहेब कराळे, विलास महाडीक, प्रिं. डॉ. गणेश ठाकूर, ॲन्थोनी ॲलेक्‍स डिसोझा, तुकाराम कन्हेरकर, प्रा. डॉ. काळूराम कानडे. 


इतर अॅग्रो विशेष
विक्री साखळी सक्षमीकरणाची सुवर्णसंधी शेतमालाचे उत्पादन घेणे हे काम फारच खर्चिक आणि...
कृषी व्यवसायासाठी 'स्मार्ट' संजीवनी  या पुढे वैयक्तिक शेती उत्पादने ही कालबाह्य...
गुणपत्रिकेवर कोविड १९ उल्लेख ...मुंबई: कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या...
सोयाबीन बियाणे नापासचे प्रमाण ६५ टक्केपरभणी: परभणी येथील कृषी विभागाच्या बीज...
‘पणन’च्या सुविधा केंद्रातून ६४८ टन...नाशिक: महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या भेंडी...
कृषी खाते म्हणते, पुरेशी खते उपलब्धपुणे: राज्यात खताची टंचाई नाही. मात्र, यंदा...
देशातून आत्तापर्यंत साखरेची ४८ लाख टन...कोल्हापूर: देशातून आत्तापर्यंत ४८ लाख ६९ हजार टन...
खत ‘आणीबाणी’ने शेतकरी त्रस्तपुणेः खरिपाची पेरणी झाल्यानंतर पिके बहारात असून...
खरेदी बंद; शेतकऱ्यांचा मका घरातच औरंगाबाद : आधारभूत किमतीने सुरु असलेली मका खरेदी...
धीरज कुमार यांनी कृषी आयुक्तपदाची...पुणे: राज्याच्या कृषी आयुक्तपदी धीरज कुमार यांची...
देशात खरिपाची पेरणी ५८० लाख हेक्टरवरपुणेः देशात आत्तापर्यंत खरिपाची ५८० लाख हेक्टरवर...
खरीप पिकांतील तण नियंत्रण व्यवस्थापनजगात सर्वांत जास्त वापर तणनाशकांचा (४३.६ टक्के)...
राज्याच्या कृषी आयुक्तपदी धीरज कुमार;...पुणे : राज्याच्या कृषी आयुक्तपदी धीरज कुमार यांची...
एचटीबीटी कपाशीची शेतकऱ्यांकडून पाहणीअकोला ः शेतकऱ्यांना तंत्रज्ञान स्वातंत्र्य मिळावे...
दुर्मीळ निलमणी आमरीचे सातपुड्यात...जळगाव ः जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगा या अनेक...
दूध पावडरला प्रतिकिलो ५० रुपये अनुदान...इस्लामपूर, जि. सांगली ः कोरोना सारख्या साथीत...
अकोला जिल्ह्यात सोयाबीन उगवणशक्तीबाबत...अकोला ः  सोयाबीन पिकाची पेरणी जुलैच्या...
अन्नधान्य पिकांच्या योजनांसाठी २७ कोटीपुणे: राज्यातील अन्नधान्य पिकांच्या योजनांसाठी...
ग्लायफोसेट वापराच्या मसुद्याविरुद्ध दाद...पुणे: केंद्र सरकारने ग्लायफोसेट तणनाशकाच्या...
सोयाबीन बियाणे कंपन्यांवर राज्यात ४६...औरंगाबाद ः सोयाबीनच्या बोगस बियाण्यामुळे पिकाची...