agriculture news in marathi, sharad pawar explain strategy of his party, baramati, maharashtra | Agrowon

आम्ही विरोधात बसावे असाच जनतेचा कौल : शरद पवार

टीम अॅग्रोवन
रविवार, 27 ऑक्टोबर 2019

बारामती शहर, जि. पुणे  ः राज्यातील जनतेने आम्ही विरोधात बसावे असाच कौल दिलेला आहे, त्यामुळे वेगळ्या प्रस्तावावर चर्चा करण्यात अर्थ नाही. यापुढील काळात काँग्रेस आणि राष्ट्रवादी हातात हात घालून काम करेल, असे राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष  शरद पवार यांनी सांगितले.

बारामती शहर, जि. पुणे  ः राज्यातील जनतेने आम्ही विरोधात बसावे असाच कौल दिलेला आहे, त्यामुळे वेगळ्या प्रस्तावावर चर्चा करण्यात अर्थ नाही. यापुढील काळात काँग्रेस आणि राष्ट्रवादी हातात हात घालून काम करेल, असे राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष  शरद पवार यांनी सांगितले.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी शनिवारी (ता. २६) बारामतीतील गोविंद बागेत श्री. पवार यांची भेट घेतल्यानंतर श्री. पवार व बाळासाहेब थोरात माध्यमांशी बोलत होते. बाळासाहेब थोरात यांनी ही दिवाळीच्या निमित्ताने सदिच्छा भेट आहे. आम्ही शिवसेनेला कुठलाही प्रस्ताव दिला नाही. शिवसेनेने आम्हाला प्रस्ताव दिला तर त्या संदर्भात आम्ही दिल्लीशी चर्चा करून याबाबतचा निर्णय घेऊ. मात्र, शिवसेनेकडूनदेखील आम्हाला कोणताही प्रस्ताव अद्याप आलेला नाही असे श्री. थोरात यांनी सांगितले. 

शरद पवार यांनीही या वेळी सत्ता स्थापन करणे किंवा तिसरा पर्याय निर्माण करणे याचा प्रश्नच निर्माण होत नाही असे सांगत जनतेने विरोधी पक्षात बसण्याचा कौल दिलेला आहे तो मी स्वीकारलेला आहे; मात्र भविष्यात जनतेच्या प्रश्नांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी हातात हात घालून काम करेल असा विश्वास व्यक्त केला.

दरम्यान, विरोधी पक्षनेतेपदाच्या संदर्भातदेखील काही चर्चा झालेली नाही. दिवाळीनंतर काँग्रेस व राष्ट्रवादी एकत्र बसून सर्वच विषयांवर निर्णय घेतील, असे बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, बुधवारी (ता. ३०) दुपारी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बोलावली असल्याचे श्री. पवार यांनी सांगितले. खासदार सुप्रिया सुळे व नवनिर्वाचित आमदार रोहित पवार या वेळी उपस्थित होते.


इतर ताज्या घडामोडी
मधमाशीला हानिकारक कीटकनाशके टाळा : आर....‌अंबाजोगाई : ‘‘शेतकऱ्यांनी मधमाश्यांच्या जाती...
परभणी जिल्ह्यात साडेसहा हजारांवर...परभणी : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात...
सोलापूर : कांदा लिलाव बंद पाडण्याचा डाव...सोलापूर : सोलापूर बाजार समितीमध्ये गेल्या काही...
कोल्हापूर : शेती, घरांच्या नुकसानीसाठी...कोल्हापूर : जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि...
विज्ञान, अध्यात्माच्या ताकदीने देश विश्...कुंडल, जि. सांगली :  ज्ञान, विज्ञान, संगणक व...
संत्र्याचे विपणनाचे जाळे विणण्याची गरज...अमरावती  ः सांघिक तत्त्वावर संत्रा...
फडणवीसांविरोधात पक्षांतर्गत नाराजांची...मुंबई ः भाजपवर विरोधी पक्षात बसण्याची नामुष्की...
कृषी पदवीधर तरूणांनी समाजासाठी काम...नगर : ‘‘देशात प्रामाणिकपणे काम केलेले अनेक शेतकरी...
फडणवीस सरकारची ३१० कोटींची हमी रद्द...मुंबई ः शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र...
आचारसंहितेपूर्वीच्या निर्णयांची...मुंबई ः विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू...
पुणे जिल्ह्यात भातकाढणी अंतिम टप्प्यातपुणे ः पावसाने उघडीप दिल्यानंतर शेतकऱ्यांनी...
पश्‍चिम महाराष्ट्रात...पुणे ः पश्‍चिम महाराष्ट्रातील अतिवृष्टी आणि...
सातारा जिल्ह्यातील सर्व शेतकरी संघटना...कऱ्हाड, जि. सातारा ः राजकीय पक्षांचा आदर्श घेऊन...
नगर जिल्ह्यात रोजगार हमीच्या कामावर सात...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये आता रोजगार हमी योजनेच्या...
चंद्रशेखर भडसावळे यांना मार्टचा ‘फादर...खडकवासला, जि. पुणे : कृषी पर्यटन संकल्पनेचे...
देशी कापूस संशोधन केंद्राचा उद्या...परभणी: वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाच्या...
गांडूळखत अर्क निर्मितीसेंद्रिय शेतीमध्ये गांडुळे व गाडूळखताचे मोठे...
राज्यात काकडीला ५०० ते २००० रुपये दरअकोला येथील बाजारात गुरुवारी (ता. ५) काकडीची...
मंत्रिमंडळाचा विस्तार २१ डिसेंबरनंतरचमुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार २१...
केंद्राने कांदा साठवणूक मर्यादा ५०...नाशिक : गेल्या सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस...