अन्य पक्षांचा पाठिंबा मिळवून देण्याची जबाबदारी माझी : शरद पवार

कोल्हापुर
कोल्हापुर

कोल्हापूर  : राज्य शासन आरक्षणाबाबतचा निर्णय न्यायालयाकडे असल्याचे सांगत अाहे. आम्ही देशातील अनेक चांगल्या वकिलांशी चर्चा केली. लोकसभेत याची दुरुस्ती होऊ शकत असल्याचे वकील सांगतात. विद्यमान सरकारने लोकसभेला याबाबत सांगावे. राज्यसभेत मी सहभागी आहे. इथे संख्या कमी असली तरी अन्य पक्षांचा पाठिंबा मिळवून देण्याची जबाबदारी माझी राहील. या माध्यमातून राज्यसभेत दुरुस्ती होईल याची काळजी आम्ही घेऊ. आमच्या खासदारांनी याबाबत लोकसभेत भूमिका मांडली आहे, असे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी सांगितले.

कोल्हापूर दौऱ्यादरम्यान शनिवारी (ता.२८)  श्री. पवार यांनी मराठा आरक्षणासंदर्भात सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनास भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. तत्पुर्वी श्री. पवार यांनी सर्किट हाउस येथे पत्रकारांशी संवाद साधला.  आरक्षणाचा प्रश्‍न प्रलंबित ठेवण्याबरोबरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून आगीत तेल ओतणारी वक्तव्ये होत असल्यानेच आंदोलन पेटल्याचा आरोप यावेळी श्री. पवार यांनी केला. 

श्री. पवार म्हणाले, की राष्ट्रवादी-काॅंग्रेसचे सरकार असताना १६ टक्‍के आरक्षण जाहीर केले. त्यापद्धतीनेच नोकर भरतीची जाहिरातही देण्यात आली होती. मात्र, काही व्यक्‍ती न्यायालयात गेल्या आणि न्यायालयाने आरक्षणाचा हा निर्णय रद्द ठरवला.  दरम्यान निवडणुका, आचारसंहिता यामुळे सरकारला न्यायालयात जाता आले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र आज सत्तेवर असणाऱ्यांनी १०० दिवसांत मराठा आरक्षण देण्याची घोषणा केली होती. बारामतीत येऊन धनगर आरक्षण देणार असल्याचेही जाहीर केले. मात्र, चार वर्षे झाली तरी आरक्षणाचा प्रश्‍न शासनाने गांभीर्याने घेतला नसल्याने समाजात उद्रेक झाला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com