agriculture news in marathi, sharad pawar meet with chief minister, mumbai, maharashtra | Agrowon

पाऊस सुरू होईपर्यंत छावण्या, टँकर सुरू ठेवा ः शरद पवार

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 11 जून 2019

मुंबई :  राज्यातील दुष्काळप्रश्नी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत पाऊस सुरू होईपर्यंत जनावरांसाठीच्या चारा छावण्या बंद करू नका, तसेच पाणीपुरवठा करणारे टँकर सुरूच ठेवावेत, अशी मागणी करण्यात आली. यासंदर्भात सरकारने याआधीच निर्णय घेतल्याचे श्री. फडणवीस यांनी या वेळी सांगितले.

मुंबई :  राज्यातील दुष्काळप्रश्नी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत पाऊस सुरू होईपर्यंत जनावरांसाठीच्या चारा छावण्या बंद करू नका, तसेच पाणीपुरवठा करणारे टँकर सुरूच ठेवावेत, अशी मागणी करण्यात आली. यासंदर्भात सरकारने याआधीच निर्णय घेतल्याचे श्री. फडणवीस यांनी या वेळी सांगितले.

पावसाचे आगमन लांबल्याने ग्रामीण भागातील दुष्काळाची दाहकता वाढली आहे. लोकसभा निवडणूक संपल्यानंतर श्री. पवार यांनी दुष्काळग्रस्त गावांचा दौरा करून शेतकऱ्यांशी संवाद साधला होता. काही दिवसांपूर्वी श्री. पवार यांनी बारामती तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावांना भेट दिली होती. या पार्श्वभूमीवर श्री. पवार यांनी मुख्यमंत्र्यांची ‘सह्याद्री’ या शासकीय अतिथीगृहावर भेट घेतली. या भेटीत दुष्काळावर चर्चा झाली. या वेळी विधिमंडळ पक्षाचे नेते अजित पवार, बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे, आमदार दत्तात्रय भरणे तसेच मदत आणि पुनर्वसन, जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

बारामतीसह अनेक दुष्काळी भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. जोपर्यंत पाऊस सुरू होत नाही तोपर्यंत टँकरचा पाणीपुरवठा बंद करू नये, अशी मागणी बैठकीत करण्यात आली.

दरम्यान, पत्रकारांशी बोलताना अजित पवार यांनी बैठकीत बारामतीच्या पाण्याच्या मुद्दा उपस्थित करण्यात आल्याची माहिती दिली. दुष्काळग्रस्त तालुक्यांचे पाणी बारामतीला पळविले जात असल्याचा वाद पुढे आणू नये. पाण्याची पळवापळवी झालेली नाही. सध्या कुठल्याच धरणात पाणी नाही. पाण्याच्या संदर्भात कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय होतात. समितीचा जो निर्णय झाला आहे त्याप्रमाणे पाणी वाटप होणार, असेही पवार म्हणाले.

दरम्यान, राष्ट्रवादीचे १० आमदार वंचित बहुजन आघाडीच्या संपर्कात असल्याचा प्रकाश आंबेडकर यांचा दावा अजित पवार यांनी खोडून काढला. त्यांच्या दाव्याला काडीचाही आधार नाही. हा दावा खोटा आहे. आंबेडकर यांनी त्यांच्या संपर्कात असलेल्या एका तरी आमदाराचे नाव सांगावे, असे आव्हान श्री. पवार यांनी दिले.


इतर ताज्या घडामोडी
अकोले तालुक्यात भात लागवडीचे प्रमाण कमीचनगर  : अकोले तालुक्यात अद्यापपर्यंत जोरदार...
बियाणे उगवणीबाबत नगरमध्ये ७६८ तक्रारीनगर  ः सोयाबीन, बाजरीच्या निकृष्ट...
लोणावळा येथे सर्वाधिक पावसाची नोंदपुणे  ः पुणे जिल्ह्यातील बहुतांश भागात...
मुंबई, ठाण्यात पावसाचा जोरमुंबई  : मुंबई, ठाण्यासह कोकण किनारपट्टीत...
म्हैसाळ योजनेची दोन कोटींची पाणीपट्टी...सांगली  : म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे उन्हाळी...
रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा कमी जोररत्नागिरी  ः जिल्ह्यात शनिवारी (ता.४) जोरदार...
भिवापुरी मिरचीच्या उत्पादकता वाढीसाठी...नागपूर  : भौगोलिक मानांकन मिळालेल्या आणि...
आधुनिक कृषी तंत्रज्ञान बांधापर्यंत...यवतमाळ : कृषीविषयक तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार...
महागाव तालुक्यात अल्प पावसामुळे पिकांची...अंबोडा, जि. यवतमाळ  ः महागाव तालुक्यात...
भंडारदरा परिसरात आढळला घोयरा सरडा अकोले, जि. नगर ः घोयरा सरडा अर्थातच श्यामेलिएओन...
खरिपातील धानाला देणार २५०० रुपयांचा दर...भंडारा  ः केंद्र सरकारकडून धानाला हमीभाव...
नांदेड जिल्ह्यात ८० टक्के क्षेत्रावर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात खरीप हंगामात ६ लाख ८९५...
नांदेड जिल्ह्यात हरभऱ्याची सव्वा लाख...नांदेड ः किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...
पुण्यात भाजीपाल्याची आवक वाढली; दर स्थिरपुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
आर्क्टिक वनस्पती कर्ब शोषण्यापेक्षा...आर्क्टिक प्रदेशामध्ये वाढणाऱ्या उंच झाडे किंवा...
कोरडवाहू कपाशीचे लागवड नियोजनअयोग्य जमिनीवरील बीटी कपाशीची लागवड, लागवडीचे...
मराठवाड्यात पावसाचा जोर कमीऔरंगाबाद  : मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत...
बियाण्यांच्या अडीच हजारांवर तक्रारींची...बीड : उगवण न झाल्याने दुबार पेरणीचे संकट...
नांदेड जिल्ह्यासाठी खरीप पीकविमा योजना...नांदेड : जिल्ह्यात यंदासाठी (२०२०-२१) खरीप हंगाम...
सततच्या खंडित वीजपुरवठ्याने माळीनगर...माळीनगर, जि. सोलापूर : वारंवार खंडित...