agriculture news in marathi Sharad Pawar meets Fig grower Farmer Deepak Jagtap Family | Page 4 ||| Agrowon

अंजीर बाग एकदम ‘हेल्दी’ आहे...पवारांच्या प्रशस्तीने भारावले जगताप कुटुंबिये..!

संतोष शेंडकर 
सोमवार, 8 नोव्हेंबर 2021

अंजीर बाग एकदम ‘हेल्दी’ आहे,’ अशा शब्दांत दस्तुरखुद्द माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी अंजिराच्या बागेचे कौतुक केले आणि जगताप कुटुंबीय अक्षरशः भारावून गेले.

सोमेश्‍वरनगर, जि. पुणे : ‘एकाही पानावर स्पॉट नाही आणि करपाही दिसत नाही. छाटणीची पद्धतही चांगली आहे. अंजीर बाग एकदम ‘हेल्दी’ आहे,’ अशा शब्दांत दस्तुरखुद्द माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी अंजिराच्या बागेचे कौतुक केले आणि जगताप कुटुंबीय अक्षरशः भारावून गेले. पवार यांनी सव्वा तास या अंजीर बागेत घालविला. जगतापांचे अख्खे कुटुंब बागेत राबते याचे कौतुक करत अन्य शेतकऱ्यांना मार्गदर्शन करा, असा वडीलकीचा सल्लाही दिला. 

निंबूतनजीक जगतापवस्ती (ता. बारामती) येथील दीपक विनायक जगताप यांनी डोंगर फोडून अंजिराची बाग केली आहे. चुका सुधारत सुधारत एक एकरावरील अंजीर आता साडेसहा एकर केली आहे. जगताप यांना सासवडमध्ये पवार यांच्याच हस्ते अखिल महाराष्ट्र अंजीररत्न पुरस्कार मिळाला होता. पुरंदर ही अंजिराची खाण असताना बारामती अंजीर आले कसे? असे कुतूहल पवार यांनी व्यक्त केले होते. जगतापांनी मग पवारांना अंजिराची भेट दिली होती. 

दरम्यान, रोहन सतीश उरसळ काही दिवसांपूर्वी या बागेची पवार यांना छायाचित्रे पाठविली होती. यामुळे ऐन दिवाळीच्या धामधुमीत पवार यांनी बंधू प्रतापराव पवार यांच्यासह अचानक जगताप यांच्या अंजीर बागेस भेट दिली आणि समाधानही व्यक्त केले. भेटीप्रसंगी पवार यांचे सहकारी बी. जी. काकडे, संभाजी होळकर, पुरुषोत्तम जगताप, राजवर्धन शिंदे, प्रमोद काकडे, रोहन उरसळ, अभिजित काकडे, ऋषिकेष गायकवाड, महेश काकडे, कांचन निगडे उपस्थित होते. 

बागेच्या निरोगीपणाचे रहस्य पवार यांनी विचारल्यावर रासायनिक आणि सेंद्रिय खतांचा समतोल करतो शिवाय जिवामृतही देतो अशी माहिती दीपक जगताप यांनी दिली. पवार यांच्या अंजीरच का लावलं? कसं वाढवलं? फळांची संख्या इतकी कशी मिळविली? विविध प्रश्‍नांवर जगताप यांनी, संत्रा, डाळिंब, मोसंबी, अंजीर या चारही फळांची एकरभर लागवड करून त्यात अंजीर चांगली करू शकतो, चुकांमधून शिकत गेलो. तसा अभ्यास केल्याचे जगताप यांनी सांगितले. एकेका फांदीवर तीस-चाळीस फळे पाहून पवार यांनी बाग हेल्दी असल्याचे प्रशस्तिपत्रक दिले. 

सायेब, तुमचं पाय लागलं; लई कमावलं... 
‘साहेबांशी कसं बोलायचं याचं जाम टेन्शन आलं होतं. पण साहेबांनी इतकं आपलंसं केलं, की सव्वा तास कसा गेला कळलंच नाही,’ अशा भावना दीपक जगताप यांनी व्यक्त केल्या. पवार यांनी ‘शेतात कसा आला’ असा प्रश्‍न केल्यावर जगताप यांनी ‘आईने गोडी लावली’ असे उत्तर दिले. यावर सुमन जगताप यांनी हात जोडून, ‘सायेब तुमचं पाय लागलं हेच आमचं भाग्य. तुम्ही आला लई कमावलं,’ अशा शब्दांत पवार यांचे आभार मानले. 


इतर ताज्या घडामोडी
कवठेमहांकाळ तालुक्यात पिकाचे पंचनामे...घाटनांद्रे, जि. सांगली ः कवठेमहांकाळ तालुक्यात...
पुणे जिल्ह्यातील १ हजार शेतकरी होणार...पुणे ः जिल्ह्यात १ हजार शेतकरी कृषी निर्यातदार...
आजरा तालुक्यात यंदा ३०० हेक्टरवर रब्बी...आजरा, जि. कोल्हापूर आजरा तालुक्यात जमिनीला वापसा...
नांदेड जिल्ह्यात अवकाळीचा दोन हजार...नांदेड : जिल्ह्यात २९ डिसेंबर रोजी झालेल्या...
शेतकऱ्यांना तंत्रज्ञान स्वातंत्र्य...यवतमाळ : शेतकऱ्यांना तंत्रज्ञान स्वातंत्र्य...
अनुकूल स्थिती होताच शर्यतींना परवानगी ः...पुणे ः ‘‘राज्यात कोविडमुळे काही भागांमध्ये...
मोदी म्हणाले, शेतकरी माझ्यासाठी मेलेत...चंडीगड ः मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे...
रब्बी पीक हानीबाबत पूर्वसूचना दाखल करापुणे ः राज्यात खरिपानंतर आता रब्बी हंगामातील...
थंडी कमी, तापमानात वाढपुणे : राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ...
सिंधुदुर्गात ऊसतोड रखडलीसिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यातील ऊसशेती तोडणी अभावी...
कळमनामध्ये सोयाबीनची आवक मंदावलीनागपूर ः दरातील तेजीच्या अपेक्षेने कळमना...
नाशिकमध्ये डाळिंबाची आवक घटली; दर स्थिरनाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या...
जालन्यात तुरीची सर्वाधिक आवकजालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
‘महाबीज’च्या बीजोत्पादकांना मिळणार एकच...अकोला ः राज्यातील शेतकऱ्यांना वर्षानुवर्षे...
नगरला वांगी, फ्लॉवरच्या दरात सुधारणा...नगर, ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
चोपडा साखर कारखाना कर्मचाऱ्यांचे धरणे...चोपडा, जि.जळगाव : चोपडा साखर कारखान्याचे काही...
पुष्प संशोधन संचालनालयाचे कार्यालय,...पुणे ः भारतीय कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेच्या...
हुलगे हुलगे-पावन पुलगे..! वेळा...नांदेड : सोलापूर, मराठवाडा, कर्नाटकच्या सीमेवरील...
पशुरोगांच्या निदान, उपचारात नव...अकोला ः कोरोनासारख्या साथीच्या आजाराच्या पार्श्‍...
कापडावर वाढीव जिएसटीला तुर्तास स्थगिती...कापडावरचा जीएसटी (GST) वाढवण्याचा निर्णय...