Sharad Pawar
Sharad Pawar

शरद पवार यांनी घेतली राज्यपालांची भेट 

गेल्या सहा महिन्यांपासून महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचे केंद्रबिंदू ठरत असलेल्या राजभवनावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार सोमवारी (ता.२५) गेले होते.

मुंबई: गेल्या सहा महिन्यांपासून महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचे केंद्रबिंदू ठरत असलेल्या राजभवनावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार सोमवारी (ता.२५) गेले होते. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची सदिच्छा भेट घेतल्याची माहिती यावेळी माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादीचे दिग्गज नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिली.  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सकाळी राजभवनावर जाऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी प्रफुल्ल पटेलही त्यांच्यासोबत होते. भगतसिंह कोश्यारी यांची राज्यपालपदी नेमणूक झाल्यानंतर शरद पवार यांच्यासोबत ही पहिलीच सदिच्छा भेट होती.  शरद पवार राज्यपालांच्या भेटीला गेल्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली होती. कोश्यारी, पवार आणि पटेल यांच्यामध्ये सुमारे अर्धा तास चर्चा झाली. “कोश्यारींनी चहासाठी बोलावले होते. ही केवळ सदिच्छा भेट होती, भेटीमागे राजकीय निष्कर्ष काढण्याची गरज नाही, कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही” अशी माहिती प्रफुल्ल पटेल यांनी राजभवनातून निघताना दिली.  उद्धव ठाकरे यांची विधानपरिषदेच्या आमदारपदी वर्णी लागल्याने महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. विधीमंडळाच्या कोणत्याही एका सभागृहात मुख्यमंत्र्यांची वर्णी लागेपर्यंत तिन्ही पक्षातील नेत्यांचा जीव टांगणीला लागला होता. दरम्यानच्या काळात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजभवनातील फेऱ्या वाढल्याने ठाकरे सरकारची धाकधूक वाढली होती. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com