पुराव्यांत शरद पवारांचे नाव नाही ः अण्णा हजारे

पुराव्यांत शरद पवारांचे नाव नाही ः अण्णा हजारे
पुराव्यांत शरद पवारांचे नाव नाही ः अण्णा हजारे

राळेगणसिद्धी, जि. नगर ः ‘‘शिखर घोटाळ्याबाबत मी दिलेल्या पुराव्यांमध्ये शरद पवार यांचे नाव नाही, हे सत्य आहे. जे सत्य आहे ते सत्य आहे. खोटे आरोप करणे मला आवडत नाही,’’ असे स्पष्टीकरण ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिले. पुराव्यात नाव नसताना ते आलेच कसे, असा प्रश्‍न त्यांनी या वेळी उपस्थित केला. 

शिखर बॅंक घोटाळ्याबाबत ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नाव आले आणि गुन्हा दाखल केला. याबाबत गुरुवारी (ता. २६) ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन हा खुलासा केला. राज्यातील शिखर बॅंक गैरव्यवहारप्रकरणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी तक्रार केली होती. या प्रकरणी शरद पवार, नेते अजित पवार यांच्यासह ७० जणांवर ‘ईडी’ने गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे राज्यासह देशात खळबळ उडाली. या पार्श्‍वभूमीवर अण्णांनी केलेला खुलासा महत्त्वपूर्ण मानला जातो. 

हजारे म्हणाले, ‘‘माझ्याकडे आलेल्या पुराव्यांनुसार शरद पवार यांचा या प्रकरणात कुठलाही संबंध नाही. मात्र, अजित पवार व इतरांची नावे या प्रकरणात आहेत. ‘ईडी’ने शरद पवार यांचे नाव कसे काय घेतले, हे मला माहिती नाही. नाव कसे आले, हे चौकशीच्या पुढील टप्प्यात सिद्ध होईल. सहकारी साखर कारखान्यांसाठी बॅंकेतून कोट्यवधी रुपयांचे कर्ज घेतले गेले. मात्र, त्यानंतर कारखान्यांनी बॅंकांना पैसे परत दिले नाही. त्यामुळे बॅंकांनी कारखान्यांवर जप्ती आणली. बॅंकांनी हे कारखाने कवडीमोलाने खासगी कंपन्यांना विकले. कारखाने आजारी पडले की पाडले गेले, या व्यवहारातच मला शंका आहे,’’ असे अण्णा हजारे म्हणाले. 

‘‘सीआयडीचे अधिकारी जय जाधव यांनी या प्रकरणाची चौकशी न करता दोन ओळींत या प्रकरणात कोणतेही तथ्य नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे मला या प्रकरणात अधिकाऱ्यांचेदेखील हात असल्याची शंका येत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना लेखी पत्राद्वारे त्यांच्याही चौकशीची मागणी करणार आहे,’’ असेही हजारे यांनी पत्रकारांना सांगितले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com