Agriculture news in marathi; Sharad Pawar provided support to the affected farmers | Agrowon

नाशिक : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी शरद पवार थेट बांधावर

टीम अॅग्रोवन
शनिवार, 2 नोव्हेंबर 2019

नाशिक  : जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करण्यासाठी शरद पवार शुक्रवार (ता. १) नाशिक दौऱ्यावर आले होते. या वेळी इगतपुरी तालुक्यातील येथे भाताच्या नुकसानग्रस्त शेतात भेट देत असताना येथील महिला शेतकऱ्यांनी त्यांच्या व्यथा श्री. पवार यांच्यासमोर मांडल्या. या वेळी '' शेतकरी बांधवांनो....मी आलोय काळजी करू नका'' असे सांगत शरद पवारांनी त्यांना आधार दिला.

नाशिक  : जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करण्यासाठी शरद पवार शुक्रवार (ता. १) नाशिक दौऱ्यावर आले होते. या वेळी इगतपुरी तालुक्यातील येथे भाताच्या नुकसानग्रस्त शेतात भेट देत असताना येथील महिला शेतकऱ्यांनी त्यांच्या व्यथा श्री. पवार यांच्यासमोर मांडल्या. या वेळी '' शेतकरी बांधवांनो....मी आलोय काळजी करू नका'' असे सांगत शरद पवारांनी त्यांना आधार दिला.

नाशिक जिल्ह्यातील विविध ठिकाणी नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करण्यासाठी ते एकदिवसीय दौऱ्यावर आले होते. या वेळी सत्ताधारी भाजप सेना सत्तेत मश्गूल असल्याचा टोला लगावत पवार म्हणाले, ‘शेतकरी बांधवांनो,  तुमच्या हितासाठी दिवस रात्र काम सुरू असून मी बळिराजाला आधार देण्यासाठी फिरत आहे. लवकरच जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देण्यात येईल, असे सांगत शरद पवारांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धीर दिला.

 यानंतर त्यांनी नाशिक तालुक्यातील पिंपळद येथील जाधववाडी शिवारात रामचंद्र चुंबळे यांच्या द्राक्षशेतीला भेट दिली. या वेळी द्राक्ष उत्पादनांच्या अडचणीबाबत द्राक्ष उत्पादकांशी चर्चा केली. नाशिकहून-कळवण-सटाणा येथे जात असताना खेडगाव येथील बाळासाहेब बाबुराव दवंगे यांच्या १०० टक्के नुकसान झालेल्या द्राक्ष बागेची पवार यांनी पाहणी करून सदर शेतकऱ्यास आधार दिला.

शरद पवार द्राक्ष बागेत नुकसानीची पाहणी करताना..video

या वेळी कादवाचे चेअरमन श्रीराम शेटे, आमदार नरहरी झिरवाळ, दिलीप बनकर, मविप्र संचालक दत्तात्रेय पाटील, जिल्हा बॅँकेचे संचालक गणपतराव पाटील उपस्थित होते. पवार यांनी दवंगे या शेतकऱ्याला किती द्राक्ष बाग आहे, कधी छाटली, आता शिल्लक किती राहिली, पुढील वर्षासाठी कसे नियोजन करणार ही सर्व माहिती घेतली. उपस्थित सर्व शेतकऱ्यांना नैराश्य येऊ देऊ, नका असा सल्ला दिला.


इतर ताज्या घडामोडी
मोदी सरकारकडून शेतकऱ्यांच्या ह्रदयावर...नवी दिल्ली : कृषी सुधारणा कायद्यांविरोधात...
कृषी कायद्यांविरोधात सर्व आघाड्यांवर...चंडीगड ः केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना...
काळा पैसा बंद झाल्याने त्यांचा विरोध; ...नवी दिल्ली : ‘‘कृषी सुधारणा कायद्यांमुळे...
कृषी कायदे झुगारून लावा; काँग्रेसशासित...नवी दिल्ली   ः काँग्रेसशासित राज्यांनी...
नगर जिल्ह्यात पीक नुकसानीचे पंचनामे...नगर  ः महिनाभर सतत पाऊस पडल्याने जिल्ह्यातील...
पुणे विभागात एक लाख ३८ हजार हेक्टरवर...पुणे  ः यंदा वेळेवर पाऊस झाल्याने चारा...
पावसाचा नगरमधील १७ हजार कांदा...नगर  ः गेल्या महिनाभरात झालेल्या सततच्या...
नुकसानीबाबत परभणीतील सहा हजारांवर ...परभणी : अतिवृष्टी तसेच नाले, ओढे, नद्यांच्या...
 पावसाची विश्रांती; सिंधुदुर्गात भात...सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यात पावसाने विश्रांती...
पानपिंपरी, विड्याच्या पानाला...बुलडाणा  ः पानपिंपरी व विड्याचे पानमळे हे...
जत तालुक्यातील सात गावांमधील ...सांगली  ः जत तालुक्यातील सात गावांमधील...
अकोला जिल्ह्यात ८७ हजार हेक्टरवर हरभरा...अकोला  ः यंदा समाधानकारक पावसामुळे सर्वच...
ऊस वाहतूक दरात ५० टक्के वाढ द्या : ...कोल्हापूर : ऊस वाहतुकीच्या दरात ५० टक्के वाढ...
शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करा :...मुंबई : केंद्र सरकारने मंजूर केलेली कृषी...
कृषी विधेयकाआधीही शेतकरी स्वतः माल विकू...सोलापूर  ः केंद्र सरकारने आणलेल्या कृषी...
केंद्राची कृषी विधेयके शेतकरी-कामगार...पुणे : केंद्र सरकारने मंजूर केलेली कृषी, पणन आणि...
दक्षिण आशियात तापमानात किंचित वाढ...पुणे : दक्षिण आशियातील देशांत मॉन्सूनोत्तर...
आदर्श शेतकरी नाही, तर केवळ नोकरदार...चंद्रपूर : आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरस्कर्ते...
सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा...मुंबई : कोरोना संकटामुळे राज्यातील मुदत संपलेल्या...
जळगावात भरीताची वांगी १५०० ते २५००...जळगाव  ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...