Agriculture news in Marathi, Sharad Pawar to review crop loss in Vidarbha | Agrowon

शरद पवार करणार विदर्भातील पीक नुकसानीची पाहणी 

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

नागपूर ः राज्यात सत्तास्थापनेचे गुऱ्हाळ सुरू असतानाच त्यातून वेळ काढत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे गुरुवार (ता. १४) पासून दोन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर येत आहेत. पावसामुळे बाधित संत्रा, सोयाबीन आणि धान शिवाराला भेट देत शेतकऱ्यांशी ते संवाद साधणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

नागपूर ः राज्यात सत्तास्थापनेचे गुऱ्हाळ सुरू असतानाच त्यातून वेळ काढत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे गुरुवार (ता. १४) पासून दोन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर येत आहेत. पावसामुळे बाधित संत्रा, सोयाबीन आणि धान शिवाराला भेट देत शेतकऱ्यांशी ते संवाद साधणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

मॉन्सूनोत्तर पावसामुळे विदर्भात सर्वदूर नुकसान झाले. अंबिया बहारातील संत्र्याची गळ होत सुमारे ४०० कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मृग बहारातील संत्रा फळांचा आकारही बाधित झाल्याने त्याचे परिणाम येत्या काळात अनुभवता येणार आहेत. त्यासोबतच सोयाबीन, कपाशी, ज्वारी, भाजीपाला पिकांचेही नुकसान झाले. या शेतकऱ्यांना भावनिक आधार देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गुरुवारी (ता. १४) विदर्भ दौऱ्यावर येत आहेत. 

काटोल, नरखेड भागातील संत्रा बागांची पाहणी ते करतील. त्यासोबतच नागपूर व लगतच्या काही जिल्ह्यांमध्ये नुकसानग्रस्त धान उत्पादकांशी देखील ते संवाद साधणार आहेत. शुक्रवारी (ता. १५) नागपुरातील एका महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले. 

विदर्भातील नेत्यांची उदासीनता 
स्थानिक लोकप्रतिनिधींकडून पीकनुकसानीची पाहणी त्या-त्या जिल्ह्यात करण्यात आली. परंतु महत्त्वाची पदे असलेल्या विदर्भातील भाजप नेत्यांनी मात्र शेतकऱ्यांकडे पाठ फिरविली आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकोला जिल्ह्यात पीक नुकसान पाहणी केली. संत्रापट्ट्यात मात्र भाजपचा एकही नेता फिरकला नाही. 
 


इतर ताज्या घडामोडी
कोल्हापुरात पुष्प प्रदर्शनास प्रारंभकोल्हापूर  : गार्डन्स क्लब आणि कोल्हापूर...
कळवण येथे शेतकरी संघटनेचे निर्बंधमुक्ती...नाशिक  : शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी...
नुकसानीमुळे पीककर्जाकडे शेतकऱ्यांचा कल पुणे ः अतिपावसामुळे खरीप पिकांचे नुकसान...
सटाणा शहरात कचऱ्यापासून होणार...नाशिक : सटाणा शहराने स्वच्छतेच्या बाबतीत...
पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी आज...पुणे ः पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदासाठी...
औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांत कापूस...औरंगाबाद : आधी दुष्काळाचा ताण, त्यानंतर...
पुणे जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या...पुणे ः जिल्ह्यात पुढील वर्षी जुलै ते डिसेंबर २०२०...
काळ्या ज्वारीमुळे शासकीय खरेदीला ब्रेकअमरावती  ः अचलपूर खरेदी विक्री संघाला ज्वारी...
मराठवाड्यातील १४ लाख ५५ हजार हेक्‍टरवर...उस्मानाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत १४ लाख...
अकोल्यात सोयाबीन पोचले ४१०० पर्यंतअकोला ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनला...
माकडांच्या उच्छादामुळे बोराच्या बागेचे...मानोरा जि. वाशीम ः तालुक्यातील  कारखेडा...
वाळवा तालुक्‍यात द्राक्ष उलाढालीत सात...वाळवा, जि. सांगली : अतिवृष्टीने द्राक्षशेतीचे...
कोल्हापूर जिल्ह्यात बँकांना २५००...कोल्हापूर : ‘‘जिल्ह्यात सर्वच बॅंकांना २ हजार ४३०...
कांदा साठवणूक निर्बंधाचा फेरविचार करानाशिक : गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात...
नांदेड विभागातील १ लाख ८५ हजार टन उसाचे...नांदेड : चार जिल्ह्यांतील ८ कारखान्यांनी यंदाच्या...
चुकीच्या तापमान नोंदीमुळे रत्नागिरीतील...रत्नागिरी  : जिल्ह्यात आंबा, काजू पिकांसाठी...
जागते रहो... कांदाचोरांचा अजून सुळसुळाट...फलटण शहर, जि. सातारा   ः सध्या...
सांगली जिल्ह्यात हळद पिकावर कंदकुज,...सांगली  ः महापूर आणि अतिवृष्टीमुळे कंदकुज...
ओला दुष्काळ जाहीर न केल्यास आंदोलन करू...कोल्हापूर   ः दक्षिण महाराष्ट्रात ओला...
खानदेश, मराठवाडा, विदर्भातील काही...पुणे  ः राज्यातील काही भागांत ढगाळ हवामान...