agriculture news in Marathi, Sharad Pawar says, disparity should not be in MSc admissions, maharashtra | Agrowon

कृषी ‘एमएस्सी’ प्रवेशात भेदभाव नको: शरद पवार

टीम अॅग्रोवन
सोमवार, 19 ऑगस्ट 2019

पुणे  : गुणवत्ता यादीत असूनही पदव्युत्तर (एमएस्सी) अभ्यासक्रमासाठी प्रवेश नाकारल्याने अडचणीत आलेल्या विद्यार्थ्यांच्या मदतीला अखेर माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार धावून आले आहेत. त्यांनी थेट भारतीय कृषी संशोधन परिषदे(आयसीएआर)ला पत्र लिहून ‘खासगी किंवा सरकारी असा भेदभाव न करता गुणवत्ताधारकांना त्वरीत न्याय द्या,’ अशी मागणी केली आहे. 

पुणे  : गुणवत्ता यादीत असूनही पदव्युत्तर (एमएस्सी) अभ्यासक्रमासाठी प्रवेश नाकारल्याने अडचणीत आलेल्या विद्यार्थ्यांच्या मदतीला अखेर माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार धावून आले आहेत. त्यांनी थेट भारतीय कृषी संशोधन परिषदे(आयसीएआर)ला पत्र लिहून ‘खासगी किंवा सरकारी असा भेदभाव न करता गुणवत्ताधारकांना त्वरीत न्याय द्या,’ अशी मागणी केली आहे. 

विनाअनुदानित कृषी संस्थांच्या पदवीधर विद्यार्थ्यांना केवळ बिगर अधिस्वीकृतीधारक महाविद्यालयात शिकल्याचा ठपका ठेवत ‘एमएस्सी’ला प्रवेश नाकारला गेला आहे. त्यामुळे काही विद्यार्थी दिल्लीत थांबून आपल्या भवितव्याचा गुंता सोडविण्याचा प्रयत्न करीत आहेत. 

‘ॲग्रोवन’मधून या बाबत वृत्त प्रकाशित झाल्यानंतर बारामती ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. नीलेश नलावडे यांनी दिल्लीत असलेल्या श्री. पवार यांना माहिती दिली. त्यानंतर श्री. पवार यांनी थेट आयसीएआरचे महासंचालक डॉ. त्रिलोचन महापात्रा यांना व्यक्तिगत पत्र लिहिले. 

‘यूजीसीची मान्यता असलेल्या विद्यापीठांमधील महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आयसीएआरच्या सीईटीमध्ये टॉपर ठरूनही एमएस्सीला प्रवेश दिला जात नसल्याचे मला समजले आहे. हा गंभीर विषय आहे,’ असे या पत्रात म्हटले आहे. 

“राज्यातील १५० खासगी विनाअनुदानित महाविद्यालयांना महाराष्ट्र कृषी विद्यापीठ कायदा व महाराष्ट्र शिक्षण व संशोधन परिषदेने मान्यता दिलेली आहे. त्यामुळे सात हजार ८९० विद्यार्थी कृषी पदवीचे शिक्षण दरवर्षी घेतात. गुणवत्तेच्या जोरावर आयसीएआरच्या सीईटीमध्ये उत्तीर्ण होत आयसीएआरच्या कोट्यातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करण्याचा ध्याय या विद्यार्थ्यांनी घेतलेला असतो. अगदी मागील वर्षीपर्यंत कोणताही भेदभाव न करता विद्यार्थ्यांना असे प्रवेश दिले जात होते,” असे श्री. पवार यांचे म्हणणे आहे. 

पत्रात केला पुरी समितीचा उल्लेख
खासगी पदवी महाविद्यालयाला अधिस्वीकृती नसल्याचे कारण देत आयसीएआरने अशा विद्यार्थ्यांना एमएस्सी व पीएचडीसाठी प्रवेशाला अपात्र ठरविले. मुळात खासगी महाविद्यालयांच्या मूल्यांकनासाठी माजी कुलगुरू डॉ. एस. एन. पुरी यांची समितीदेखील कार्यरत आहे. त्यामुळे गुणवंत विद्यार्थ्यांची पात्रता असूनही प्रवेश नाकारले जात असल्याचे पाहून मला आश्चर्य वाटते, असेही श्री. पवार यांनी नमूद केले आहे.


इतर बातम्या
कर्जमुक्तीत रत्नागिरी जिल्ह्यातील २३४...रत्नागिरी ः महात्मा जोतीराव फुले शेतकरी...
नगर जिल्ह्यात मिळणार डिजिटल स्वाक्षरीचा...नगर  ः ऑनलाइन सात-बारा संगणकीकरणाच्या...
पुणे जिल्ह्यात कर्जमुक्ती योजनेच्या...पुणे  ः जिल्ह्यात महात्मा जोतिराव फुले...
नाशिक  : चांदोरी,सोंनाबे येथे...नाशिक  : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी...
कर्जमुक्ती योजनेतील लाभार्थ्यांचा...नगर  ः  सायेब, मागच्या काळात...
सांगलीच्या ५९६ शेतकऱ्यांचा...सांगली ः महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
भंडारा जिल्ह्यात ३५ हजार शेतकरी...भंडारा ः राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त...
टेंभू उपसा सिंचन योजनेचे १९ पंप सुरूसांगली  ः टेंभू उपसा सिंचन योजनेचे १९५०...
नगर, नाशिकच्या शेतकऱ्यांची ८८ कोटींवर...नगर  ः नगर, नाशिक जिल्ह्यांतील पंधरा...
कृषी विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा...पुणे  ः कृषी विभागाच्या वतीने चौथ्या वार्षिक...
कर्जमाफीची पहिली यादी जाहीर; ६८...मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री...
उस्मानाबादेतील कर्जमुक्तीच्या याद्या...उस्मानाबाद : महात्मा जोतिराव फुले शेतकरी...
मराठवाड्यातील कोरड्या पडणाऱ्या...औरंगाबाद : मराठवाड्यात पुन्हा एकदा उन्हाच्या...
राज्यात उन्हाचा चटका कायम पुणे : राज्याच्या हवामानात वेगाने बदल होत आहेत....
‘पीएम-किसान’ योजनेत शेतकऱ्यांना ५१ हजार...नवी दिल्ली: केंद्र सरकारने गेल्या वर्षी पंतप्रधान...
शेतकरी कर्जमाफीवरून विरोधकांचा गदारोळ मुंबई: शेतकरी कर्जमाफीबाबत सरकारने एकही आश्वासन...
कृषी शिक्षणाचा खर्चही आता लाखाबाहेर पुणे : राज्यातील खासगी कृषी शिक्षण संस्थांच्या...
'तीन लाखांपर्यंतचे पीककर्ज माफ व्हावे...गेल्या पाच-दहा वर्षांपासून अस्मानी आणि सुलतानी...
कर्जमाफीची पहिली यादी आज होणार जाहीर :...मुंबई : आमचे सरकार हे केवळ घोषणा करणारे नाही तर...
जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थी वर्गात...जळगाव : जिल्हा परिषद शाळांमधील...