agriculture news in marathi, sharad pawar says government ignore farmers sucide,beed, maharashtra | Agrowon

शेतकरी आत्महत्यांकडे पहायला सरकारला वेळ नाही ः पवार
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 2 ऑक्टोबर 2018

आम्ही सत्तेत असताना ७१ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी केली. बीड जिल्ह्यात गारपिटीने मोसंबीचे नुकसान झाल्याचे पाहून आठ दिवसांत मदत दिली. सध्या दुष्काळी स्थिती असून बीडसारखा दुष्काळ असेल तर १०० टक्के कर्जमाफीची गरज आहे. पण, या सरकारला शेतकऱ्यांचे दुखणे दिसत नाही.
- शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस.

बीड   ः शेतकरी हा देशाचा कणा आहे. कर्जबाजारीपणातून शेतकरी आत्महत्या होत आहेत. खते, बियाणे, मुलांच्या शिक्षणासाठी काढलेल्या कर्जफेडीच्या चिंतेतून शेतकरी जीवन संपवत आहेत. उद्योगपतींनी बँकांचे बुडविलेले ८१ हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाझर फुटला. मात्र, शेतकरी आत्महत्यांकडे डोकून पाहायला सरकारला वेळ नाही, ​असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचा विजयी संकल्प मेळावा सोमवारी (ता. १) झाला. या वेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार जयदत्त क्षीरसागर, बाबासाहेब पाटील, सतीश चव्हाण, विक्रम काळे, रामराव वडकुते, शिवाजीराव पंडित, प्रकाश सोळंके, अमरसिंह पंडित या वेळी उपस्थित होते.

मराठा, मुस्लिम, धनगर, लिंगायत आरक्षणाबाबत सरकार टोलवाटोलवी करीत आहे. राफेलमधून देशाची लूट झाल्याचा गंभीर आरोप करत, ६५० कोटी रुपयांचे विमान १६५० कोटींना का घेतले याचे स्पष्टीकरण द्यावे, चौकशीला सामोरे जावे, खरेदीची कागदपत्रे सादर करावीत, संसदेत उत्तर द्यावे, असे आवाहन श्री. पवार यांनी केले. राफेलबाबत आपण कोणाचेही समर्थन केलेले नाही, असा खुलासा करीत, पुरावे नसल्याने वैयक्तिक आरोप करणार नाही, असे म्हणालो होतो, असे श्री. पवार यांनी सांगितले. पंतप्रधान फक्त मन की बात ऐकवतात. पण बेरोजगार, गृहिणी, अल्पसंख्याक, शेतकऱ्यांचे दुखणे ऐकायला त्यांचे कान बहिरे झाले आहेत. मुस्लिम समाजातील गरिबी, शिक्षणाचा अभाव अशा समस्यांकडे लक्ष देण्याऐवजी धर्माच्या मुद्द्यात सरकार हस्तक्षेप करत आहे, असे श्री. पवार म्हणाले.

या वेळी जयंत पाटील, धनंजय मुंडे, जयदत्त क्षीरसागर, प्रकाश सोळंके, बजरंग सोनवणे, राजेंद्र जगताप, सय्यद सलिम, बाळासाहेब आजबे, अक्षय मुंदडा यांची भाषणे झाली. प्रास्ताविक संदीप क्षीरसागर यांनी केले.
 

इतर ताज्या घडामोडी
राज्यात हिरव्या मिरचीला १८०० ते ४०००...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे -भाजीपाला...
अकोल्यात कृषी सहायकांचे पदोन्नतीच्या...अकोला  ः अमरावती विभागातील कृषी सहायकांच्या...
सांगलीच्या पूर्व भागातील अग्रणी कोरडीठाकसांगली  ः  सांगली जिल्ह्याच्या चार...
सातारा जिल्ह्यातील ‘मराठवाडी’च्या...ढेबेवाडी, जि. सातारा : गेल्या काही...
नगर जिल्ह्यात चार महसूल मंडळांत पावसाची...नगर : जिल्ह्यामध्ये गेल्या आठ दिवसांपासून पावसाने...
हलक्या सरींना सुकलेल्या पिकांना...उस्मानाबाद/ लातूर  : मराठवाड्यातील औरंगाबाद...
‘पोकरा’तील शेतकऱ्यांनाही मिळणार सूक्ष्म...अकोला  ः राज्यात दुष्काळाच्या झळा सहन...
राज ठाकरे यांची दिवसभर चौकशीमुंबई ः कोहिनूर मिल कर्ज प्रकरणातील अनियमिततेबाबत...
मागासवर्गीय शेतकऱ्यांना विहिरींसाठी ३७४...पुणे  : राज्यातील मागास गटातील शेतकऱ्यांना...
एचटी कापूस वाण परवानगीची बियाणे...नागपूर ः शेतकऱ्यांकडून अवैधरीत्या तणाला सहनशील (...
वांग्यावरील शेंडा व फळे पोखरणाऱ्या...वांगी पिकामध्ये येणाऱ्या शेंडा व फळे पोखरणारी...
पूरस्थितीतील द्राक्ष बागेचे व्यवस्थापनसां गली, कोल्हापूर व कर्नाटक शेजारील काही भागांत...
अकोल्यातील प्रकल्पात अत्यल्पच साठाअकोला : यंदाच्या पावसाळ्याचे सुमारे अडीच महिने...
सांगलीत गूळ ३३०० ते ४४०० रुपये...सांगली : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी...
अकोला जिल्ह्यात ६० हजार हेक्टर क्षेत्र...अकोला ः यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात असमतोल...
सिंधुदुर्गात कालव, जिताडा मस्त्यबीज...मुंबई : राज्यात सागरी उत्पादनवाढीस...
ठिबकला ८० टक्के अनुदान; आंदोलनाला...भोसे, जि. सोलापूर : राज्य शासनाने कोरडवाहू...
मांडाखळीत संत्रा बागांत फळगळपरभणी : कमी पाण्यामुळे जमिनीमध्ये ओलाव्याची...
रश्‍मी बागल यांचा शिवसेनेत प्रवेशसोलापूर : जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसची...
माशांच्या पाच नव्या जातींचा घेतला शोध अरुणाचल प्रदेश राज्यातील इटानगर येथील राजीव गांधी...