agriculture news in Marathi, Sharad Pawar says, Govt taking decision against farmer , Maharashtra | Agrowon

सरकार सातत्याने शेतकरी विरोधी भूमिका घेत आहेः शरद पवार
टीम अॅग्रोवन
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

नगर  ः दोन वेळचा घास भरवणाऱ्या शेतकऱ्यांबद्दल सरकारमध्ये अनास्था आहे. त्यामुळे काळ्या आईचे इमान न राखणाऱ्या भाजप सरकारला चले जाव म्हणण्याची वेळ आली आहे. भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांना ईडीची नोटीस आली होती. लफडी केली असतील, म्हणूनच ईडीचा ससेमिरा लागला. विकासाच्या नावाखाली सत्तेच्या लालसेपोटी पक्षबदल करणाऱ्यांचा जनता बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी दिला. 

नगर  ः दोन वेळचा घास भरवणाऱ्या शेतकऱ्यांबद्दल सरकारमध्ये अनास्था आहे. त्यामुळे काळ्या आईचे इमान न राखणाऱ्या भाजप सरकारला चले जाव म्हणण्याची वेळ आली आहे. भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांना ईडीची नोटीस आली होती. लफडी केली असतील, म्हणूनच ईडीचा ससेमिरा लागला. विकासाच्या नावाखाली सत्तेच्या लालसेपोटी पक्षबदल करणाऱ्यांचा जनता बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी दिला. 

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा शनिवारी मेळावा झाला. पक्षाचे निरीक्षक दिलीप वळसे, अंकुश काकडे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, आमदार अरुण जगताप, संग्राम जगताप, राहुल जगताप, प्रसाद तनपुरे, अविनाश आदिक, नरेंद्र घुले, डॉ. सर्जेराव निमसे, निर्मला मालपाणी आदी या वेळी उपस्थित होते. या वेळी पवार म्हणाले, की अधिकाऱ्यांना कानमंत्र देऊन सरकारने छावण्या बंद केल्या. शेतकऱ्यांविषयी अनास्था असलेले लोक सत्तेत बसले आहेत.

राज्यात दुष्काळ, महापुरासारखी संकटे असताना सत्ता द्या म्हणत गावभर हिंडत राहिले. उद्योगधंदे बंद पडत असल्याने हाताला काम नाही. ही स्थिती जर बदलायची असेल, तर सामूहिक शक्तीबरोबर घेऊन महाराष्ट्राचा चेहरा बदलूया. सरकारने कर्जमाफीचा शब्द पाळला नाही. मागील पाच वर्षांत १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. पदवीधर युवकांना नोकऱ्या नाहीत. नोकऱ्या नसल्याने लग्न होत नाही. मात्र, युतीचे सरकार बोलण्यातच पटाईत आहे. 

‘‘सत्ताधाऱ्यांनी उद्योगांच्या कर्जासाठी बॅंकांना ८७ हजार कोटींचा पुरवठा केला. देशाचे गृहमंत्री अमित शहा म्हणतात, उद्योगांना कर्ज देऊ, पण शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार नाही? दोन वेळचा घास भरवणाऱ्या शेतकऱ्यांनी तुमचे काय घोडे मारले आहे? काश्‍मीरमधील ३७० कलम रद्द केले, हे चांगले झाले. त्याबद्दल अभिनंदन...! मात्र, ३७१ कलम देशातील मिझोराम, नागालॅंड, हिमाचलसारख्या आठ राज्यांत लागू आहे. त्या कलमाचे काय? 

गडकोट किल्ले विकसित करण्यासाठी तेथे सरकारने हॉटेल, बार सुरू करण्याचा निर्णय घेतला. राज्यातील किल्ले हे स्वाभिमानाचा आणि संघर्षाचा इतिहास सांगणारे प्रतीक आहेत. ज्या किल्ल्यात स्वाभिमानासाठी तलवारी चमकल्या होत्या, तेथे आता हॉटेल, बार सुरू करून सरकार छमछम वाजवणार असल्याची टीका पवार यांनी केली. 

इतर ताज्या घडामोडी
एकात्मिक कीड नियंत्रणासाठी स्वयंचलित...किडीच्या एकात्मिक नियंत्रणासाठी विविध प्रकारच्या...
दिंडोरी, नाशिक भागांत डाऊनीचा...नाशिक   : जिल्ह्यात दिंडोरी, नाशिक...
इंदापुरात १२०० एकर द्राक्ष बागा उद्‌...भवानीनगर, जि. पुणे  : इंदापूर तालुक्‍यातील...
सांगली जिल्ह्यात २० टक्के क्षेत्रावर...सांगली  ः गेल्या आठवड्यात झालेला पाऊस,...
पुणे जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरीपुणे : जिल्ह्याच्या सर्वच भागांत दोन-तीन...
अमेरिकेमध्ये कपाशीवर विषाणुजन्य ब्ल्यू...अमेरिकेमध्ये कपाशीवर प्रथमच विषाणूजन्य ब्ल्यू...
नगर जिल्ह्यात अजूनही १४२ टॅंकर सुरूचनगर ः पावसाळा संपला असला तरी अजूनही जिल्ह्यातील...
पावसामुळे लांबला कापसाचा हंगामराळेगाव, जि. यवतमाळ ः अति पावसामुळे कापसाचा हंगाम...
जळगाव, पुणे जिल्ह्यात ईव्हीएम, ...जळगाव  ः जिल्ह्यात सोमवारी मतदानाच्या दिवशी...
सोलापूर जिल्ह्यात पावसाचा पहिल्यांदाच...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात गेल्या दोन...
कोयनेसह पाच धरणांतून विसर्गसातारा  ः जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत...
जिल्हा बँकांबाबत अनास्कर यांनी ...पुणे  : राज्यातील शेतकऱ्यांच्या घामाच्या...
कपाशीवरील दहिया रोगाचे एकात्मिक...कपाशीचे पीक हे साधारणतः सहा महिने किंवा...
गुलटेकडीत गाजर, पावट्याच्या दरात सुधारणापुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
कृषी सल्लाकापूस अवस्था ः फुले उमलणे ते बोंडे धरणे फुलकिडे...
जळगावात केळी दरात सुधारणा; आवक रोडावलीजळगाव ः केळीची आवक गेल्या आठवड्यात रोडावलेलीच...
कळमणा बाजारात नव्या सोयाबीनची आवक वाढलीनागपूर : जुन्यानंतर आता हंगामातील नव्या सोयाबीनची...
नाशिकमध्ये हिरवी मिरची १२०० ते २५००...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
मराठवाड्यातील ३७१ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/ परभणी ः मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील...
पुणे जिल्ह्यात संततधार पाऊसपुणे : पुणे जिल्ह्यात सर्वदूर शनिवारपासून (ता. १९...