agriculture news in Marathi, Sharad Pawar says, history will made by Rayat contribution, Maharashtra | Agrowon

रयतच्या योगदानातून इतिहास घडेल ः शरद पवार
टीम अॅग्रोवन
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

सातारा: त्यागाचा विचार तत्कालीन पिढीत घडविण्यात अण्णा यशस्वी झाले. त्यामुळे रयतचे विद्यार्थी सर्वच क्षेत्रांत यशस्वी होत असल्याचे दिसत आहे. आता आधुनिक काळात संशोधनाची भावना नव्या पिढीत रुजली पाहिजे, यासाठी विज्ञान परिषदेच्या माध्यमातून काम सुरू आहे. वैज्ञानिक क्षेत्रात देशाने प्रगती करताना चांद्रयान ९८ टक्के यशस्वी केले आहे. भविष्यात भारताचा तिरंगा घेऊन मनुष्य चंद्रावर उतरेल. त्यामध्ये रयतेचा विद्यार्थी सहभागी असेल. रयतच्या योगदानातून नवा इतिहास घडेल, असा विश्‍वास रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केला.

सातारा: त्यागाचा विचार तत्कालीन पिढीत घडविण्यात अण्णा यशस्वी झाले. त्यामुळे रयतचे विद्यार्थी सर्वच क्षेत्रांत यशस्वी होत असल्याचे दिसत आहे. आता आधुनिक काळात संशोधनाची भावना नव्या पिढीत रुजली पाहिजे, यासाठी विज्ञान परिषदेच्या माध्यमातून काम सुरू आहे. वैज्ञानिक क्षेत्रात देशाने प्रगती करताना चांद्रयान ९८ टक्के यशस्वी केले आहे. भविष्यात भारताचा तिरंगा घेऊन मनुष्य चंद्रावर उतरेल. त्यामध्ये रयतेचा विद्यार्थी सहभागी असेल. रयतच्या योगदानातून नवा इतिहास घडेल, असा विश्‍वास रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केला.

रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंती दिनानिमित्त रविवारी साताऱ्यात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी संस्थेचे कार्याध्यक्ष अनिल पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. भगीरथ शिंदे, माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, संस्था सचिव प्राचार्य डॉ. भाऊसाहेब कराळे, सहसचिव प्रा. डॉ. विजयसिंह सावंत, वैभव नायकवडी, अरुण आंधळे, 
विलास महाडिक यांची प्रमुख उपस्थित होती.

प्रारंभी कर्मवीर अण्णांच्या समाधीस पुष्पचक्र वाहून आदरांजली वाहण्यात आली. श्री. पवार म्हणाले, त्या काळी त्यागाचा विचार त्या काळच्या पिढीत उतरविण्यात अण्णा यशस्वी झाले. अनेक क्षेत्रांत आज रयतचे विद्यार्थी झाल्याचे पाहायला मिळते. सध्याचा काळ आधुनिकतेचा आहे. त्या आधारे संशोधनाची भावना सध्याच्या पिढीत रुजविला पाहिजे, यासाठी विज्ञान परिषदेच्या माध्यमातून हे काम होत आहे.

शास्त्रीय दृष्टिकोन नवीन पिढीत कसा येईल. वैज्ञानिक दृष्टिकोनातून कसे पुढे गेले पाहिजे, यावर काम सुरू आहे. त्यामध्ये सर्वसामान्य कुटुंबातील मुले विज्ञान परिषदेत काम करत आहेत. यातून वैज्ञानिक दृष्टिकोन असलेली पिढी तयार होणार आहे. सर्वच क्षेत्रात कर्तृत्व दाखविताना देशाला अभिमान वाटावे, असे विद्यार्थी या संस्थेच्या माध्यमातून घडत आहेत. 

‘‘सध्या चांद्रयान मोहीम ९८ टक्के यशस्वी झाली. यामध्ये सामान्य कुटुंबातून येऊन शास्त्रज्ञ झालेल्या विद्यार्थ्यांनी योगदान दिले. त्यामुळे जगाच्या वैज्ञानिक क्षेत्रात भारताचे नाव पहिल्या पाच देशांत पोचले आहे. नव्या पिढीत वैज्ञानिक दृष्टी संस्थेच्या माध्यमातून देत राष्ट्रहितासाठी कर्तृत्ववान पिढी तयार करण्याचे काम या संस्थेतून होत असताना, आपल्याला पुढे जायचे आहे. त्यामुळे स्वस्थ बसून चालणार नाही,’’ असा सल्लाही त्यांनी दिला.

अध्यक्षीय भाषणात अनिल पाटील यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली. प्रा. डॉ. भाऊसाहेब कराळे यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्य डॉ. विजयसिंह सावंत यांनी आभार मानेल.

इतर ताज्या घडामोडी
एकात्मिक कीड नियंत्रणासाठी स्वयंचलित...किडीच्या एकात्मिक नियंत्रणासाठी विविध प्रकारच्या...
दिंडोरी, नाशिक भागांत डाऊनीचा...नाशिक   : जिल्ह्यात दिंडोरी, नाशिक...
इंदापुरात १२०० एकर द्राक्ष बागा उद्‌...भवानीनगर, जि. पुणे  : इंदापूर तालुक्‍यातील...
सांगली जिल्ह्यात २० टक्के क्षेत्रावर...सांगली  ः गेल्या आठवड्यात झालेला पाऊस,...
पुणे जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरीपुणे : जिल्ह्याच्या सर्वच भागांत दोन-तीन...
अमेरिकेमध्ये कपाशीवर विषाणुजन्य ब्ल्यू...अमेरिकेमध्ये कपाशीवर प्रथमच विषाणूजन्य ब्ल्यू...
नगर जिल्ह्यात अजूनही १४२ टॅंकर सुरूचनगर ः पावसाळा संपला असला तरी अजूनही जिल्ह्यातील...
पावसामुळे लांबला कापसाचा हंगामराळेगाव, जि. यवतमाळ ः अति पावसामुळे कापसाचा हंगाम...
जळगाव, पुणे जिल्ह्यात ईव्हीएम, ...जळगाव  ः जिल्ह्यात सोमवारी मतदानाच्या दिवशी...
सोलापूर जिल्ह्यात पावसाचा पहिल्यांदाच...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात गेल्या दोन...
कोयनेसह पाच धरणांतून विसर्गसातारा  ः जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत...
जिल्हा बँकांबाबत अनास्कर यांनी ...पुणे  : राज्यातील शेतकऱ्यांच्या घामाच्या...
कपाशीवरील दहिया रोगाचे एकात्मिक...कपाशीचे पीक हे साधारणतः सहा महिने किंवा...
गुलटेकडीत गाजर, पावट्याच्या दरात सुधारणापुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
कृषी सल्लाकापूस अवस्था ः फुले उमलणे ते बोंडे धरणे फुलकिडे...
जळगावात केळी दरात सुधारणा; आवक रोडावलीजळगाव ः केळीची आवक गेल्या आठवड्यात रोडावलेलीच...
कळमणा बाजारात नव्या सोयाबीनची आवक वाढलीनागपूर : जुन्यानंतर आता हंगामातील नव्या सोयाबीनची...
नाशिकमध्ये हिरवी मिरची १२०० ते २५००...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
मराठवाड्यातील ३७१ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/ परभणी ः मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील...
पुणे जिल्ह्यात संततधार पाऊसपुणे : पुणे जिल्ह्यात सर्वदूर शनिवारपासून (ता. १९...