agriculture news in Marathi, Sharad Pawar says, make initiative for change govt., Maharashtra | Agrowon

दडपशाही थांबविण्यासाठी सत्ता परिवर्तन हवे : शरद पवार

टीम अॅग्रोवन
सोमवार, 14 ऑक्टोबर 2019

नगर ः ‘‘महाराष्ट्र राज्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची असून, लोकसभेत निकाल वेगळा लागला, पण विधानसभेत वेगळा निकाल लागतोय. असं कित्येकवेळा घडलेलं आहे, या वेळी तसंच घडणार आहे. राज्यातील दडपशाही थांबवण्यासाठी राज्यात बदल घडवायचा असून अकोल्यात तर बदल करून पक्षांतर करणाऱ्यांना घरी बसवा आणि धडा शिकवा’’ असे आवाहन ‘राष्ट्रवादी’चे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. राज्यात महिलांसह कोणीच सुरक्षित नसल्याचा आरोप या वेळी पवारांनी केला.  

नगर ः ‘‘महाराष्ट्र राज्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची असून, लोकसभेत निकाल वेगळा लागला, पण विधानसभेत वेगळा निकाल लागतोय. असं कित्येकवेळा घडलेलं आहे, या वेळी तसंच घडणार आहे. राज्यातील दडपशाही थांबवण्यासाठी राज्यात बदल घडवायचा असून अकोल्यात तर बदल करून पक्षांतर करणाऱ्यांना घरी बसवा आणि धडा शिकवा’’ असे आवाहन ‘राष्ट्रवादी’चे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. राज्यात महिलांसह कोणीच सुरक्षित नसल्याचा आरोप या वेळी पवारांनी केला.  

अकोले (जि. नगर) येथे रविवारी (ता.१३) ‘राष्ट्रवादी’चे उमेदवार किरण लहामटे यांच्या प्रचारासाठी शरद पवार यांची सभा झाली. अध्यक्षस्थानी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष दशरथ सावंत होते. उमेदवार किरण लहामटे यांच्यासह किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, अशोक भांगरे, सुनिता भांगरे, बाजीराव दराडे, कारभारी उगल, मारुती मेंगाळे, आबासाहेब थोरात यांची उपस्थिती होती.  

श्री. पवार म्हणाले, ‘‘जवानांनी पाकिस्तावर कारवाई केल्याचा अभिमान आहे. मात्र त्यात शौर्य दाखवले जवानांनी आणि श्रेय घेतायेत मोदी. इंदिरा गांधी पंतप्रधान असतानाही पाकिस्तावर हल्ले झाले होते. त्यांनीही एतिहासिक काम केलं, पण त्याचे श्रेय कधी घेतले नाही. अनेक राज्यांत लोकसभेला आणि विधानसभेला वेगवेगळा निकाल लागलेला आहे. महाराष्ट्रात तेच घडवायचे आहे. राज्यातील अनेक भागांत उद्योगधंदे उभारले, हजारो हातांना काम दिले. अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले, किती बाबी सांगू? याची काहीही माहिती नसलेले अमित शहा विचारतात काय केले? सत्तेचा गैरवापर ठिकठिकाणी केला जातोय. कुठेही काही झालेय की दडपशाही होत आहे. आता राज्यात बदल केल्याशिवाय गत्यंतर नाही.’’

अकोल्यात तर बदल करून पक्षांतर करणाऱ्यांना घरी बसवा. पाच वर्षात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या केलेलं महाराष्ट्र राज्य आहे. कर्जमाफीची घोषणा फसवी. ३१ टक्के लोकांना दिली असेल तर ६९ टक्के लोकांचे काय? शेती आणि शेतकऱ्यांसाठी फार केल्याचे सांगत आहेत. कारखानदारीची अवस्था काय करून ठेवलीय. या साऱ्या बाबींचा विचार होणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.  

मोदी, शहा काय पर्यटनाला येत आहेत?
पवार म्हणाले, ‘‘मी कुस्ती परिषदेत काम केले आहे. मला सगळ्या बाबी आहेत. कुस्ती आम्ही पैलावानांशी करत असतो. मुख्यमंत्र्यांनी याची नोंद घ्यावी. येथे लढाई दिसत नाही, फक्त भाजपचा विचार मान्य केला एवढेच त्यांना दिसत असतील आणि विरोधक शिल्लक नसल्याचे वाटत असेल तर पंतप्रधान, गृहमंत्री यांची सभा कशासाठी? भंडारदरा पाहायला येतात काय, त्यांना पराभवाची जाणीव झाली आहे.’’


इतर ताज्या घडामोडी
सिंधुदुर्गात पूरस्थिती, जनजीवन विस्कळीत सिंधुदुर्ग ः जिल्ह्यात गेल्या दोन ते तीन...
माजी मंत्री अनिल राठोड यांचे निधननगर, : नगर शहराचे माजी आमदार, तत्कालीन युती...
माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील...लातूर : काँग्रेसचे जेष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री...
परभणी जिल्ह्यात तीन लाख ७२ हजार हेक्टर...परभणी : ‘‘पंतप्रधान पिकविमा योजनेअंतर्गंत...
लातूर विभागात विम्याचे २१ लाख हेक्टर...उस्मानाबाद : लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी,...
'रासाका' लवकर सुरू करा, शेतकऱ्यांची...नाशिक  : गेल्या काही दिवसांपासून निफाड...
खानदेशात कांदा रोपवाटिकांची स्थिती बिकट...जळगाव : खानदेशात कांदा रोपवाटिकांची स्थिती बिकट...
यावल, रावेरमध्ये मका पिकावर लष्करी अळी...जळगाव : यावल तालुक्यातील किनगाव, डांभुर्णी,...
नाशिक जिल्ह्यात लाल कांद्याच्या तुरळक...नाशिक : जिल्ह्यात खरीप हंगामातील कांदा लागवडीचा...
सोलापूर जिल्ह्यात सोयाबीनच्या निकृष्ट...सोलापूर : जिल्ह्यात सोयाबीनच्या निकृष्ठ...
अकोले तालुक्‍यात भात लागवडी रखडल्यानगर : जिल्ह्यातील अकोले तालुक्‍याच्या उत्तर...
गोंदियाची पीक कर्ज वाटपात आघाडीगोंदिया : पीक कर्ज वाटपात जिल्ह्याने आघाडी घेत...
जुन्नर, नारायणगावात टोमॅटोचे दर टिकूनपुणे ः जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
प्रतिबंधित कीटकनाशकांची विक्री करू नकाअकोला ः पिकांवर कीटकनाशक फवारणी करताना होणाऱ्या...
माळशिरस, करमाळ्यात मक्याची ३० हजार...सोलापूर  ः अकलूज कृषी उत्पन्न बाजार समिती...
रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊसरत्नागिरी : जिल्ह्यात वेगवान वाऱ्यासह पडणाऱ्या...
चंद्रपूर कृषी विभाग देणार रानभाज्यांची...गोंडपिपरी, जि. चंद्रपूर ः अळू, काटवल, सूरण, टरोटा...
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाला सुरुवातकोल्हापूर : जिल्ह्यात सोमवारी सायंकाळपासून...
असे होते ग्लायफोसेट तणनाशकाचे निसर्गात...केंद्र सरकारकडून नुकताच मसुदा आदेश प्रसिध्द...
जळगावात गवार २००० ते ४२०० रुपये...जळगाव  ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...