सूड, दबावाचे राजकारण लोकशाहीसाठी घातक : शरद पवार

पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार
पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार

पुणे   ः सरकार ईडी आणि सीबीआयसारख्या यंत्रणांचा वापर विरोधी पक्षातील आमदारांना धमकाविण्यासाठी करत आहे. त्यातूनच पक्षांतर सुरू असून, हे सूड आणि दबावाचे राजकारण लोकशाहीसाठी घातक आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. 

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते भाजप, शिवसेनेमध्ये जात आहे. या पार्श्‍वभूमीवर श्री. पवार यांनी रविवारी (ता. २८) पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली.  

श्री. पवार म्हणाले, की सरकार ईडी आणि सीबीआयसारख्या यंत्रणांचा वापर विरोधी पक्षातील नेत्यांना धमकावण्यासाठी करत आहे. यातूनच चित्रा वाघ आणि हसन मुश्रीफ यांनाही सत्ताधाऱ्यांनी पक्षांतरासाठी धमकावले. मुश्रीम यांनी भारतीय जनता पक्षात जाण्यास नकार दिल्यानेच त्यांच्या घरावर छापे टाकण्यात आले. पक्षात येण्यास नकार देणाऱ्यांना आर्थिक अडचणीत आणले जात असून, त्यातून सोडविण्याच्या अटीवर पक्षांतर करून घेतले जात आहे. यासाठी मुख्यमंत्री स्वतः आमदारांना फोन करत आहेत. सत्तेतील काही नेत्यांना विरोधी पक्षातील आमदारांना धमकाविण्याची जबाबदारीदेखील देण्यात आली असून, पक्षांतरबंदीबाबतचे कायदे पायदळी तुडवले जात असल्याचा आरोप श्री. पवार यांनी सरकारवर केला.

‘काँग्रेस - राष्ट्रवादी प्रत्येकी १२० जागा लढणार’ लोकसभेप्रमाणे येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी करून लढणार असून, दोन्ही पक्षांकडून प्रत्येकी १२०-१२० अशा २४० जागांवर एकमत झाले आहे. उर्वरित ४८ जागा स्वाभिमानी पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (कवाडे गट) यांसारख्या समविचारी पक्षांना दिल्या जातील, असेही श्री. पवार यांनी या वेळी सांगितले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com