वाइन उद्योगाला अडचणीतून मुक्त करणार ः शरद पवार

sharad pawar
sharad pawar

नाशिक : वाइन उद्योगाला मागील काही दिवसांपासून हलाखीचे दिवस आले आहेत. वाइन उद्योग व द्राक्ष उत्पादकांच्या हितासाठी लवकरच वाइन उद्योजकांना अडचणीतून मुक्त करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार, दिलीप वळसे पाटील आणि नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यासह वाइन उद्योजकांची बैठक घेण्यात येईल, असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले. विंचूर (ता. निफाड) येथील वाइन पार्कमध्ये शुक्रवारी (ता. १७) रोजी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते वाइन ग्रेप्सच्या क्रशिंगचा प्रारंभ करण्यात आला. या वेळी अन्न नागरीपुरवठा आणि ग्राहक संरक्षणमंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, आमदार दिलीप बनकर, भारतीय द्राक्ष प्रक्रिया मंडळाचे माजी अध्यक्ष जगदीश होळकर, प्रादेशिक अधिकारी हेमांगी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.  या वेळी बोलताना श्री. पवार म्हणाले, की वाइन उद्योग आणि द्राक्ष उत्पादकांच्या विकासासाठी मार्केटिंगसाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. वाइननिर्मितीसाठी परदेशी वाण असल्यास शेतकऱ्यांचा विकास होईल. यासाठी नवीन वाण आयात करण्याचा प्रयत्न केले जातील. त्यामुळे वाइन विकसित होऊन शेतकऱ्यांच्या द्राक्षांना मागणी वाढेल. ज्या वाणाच्या वाइनला मागणी आहे, त्याच वाणांची लागवड करण्यासाठी शेतकरी पसंती देईल. यासाठी वाइन उद्योगातील प्रतिनिधींनीही पुढाकार घेऊन त्यांच्या समस्या सोडवून घ्याव्यात, असे पवार यांनी सांगितले. या वेळी जगदीश होळकर यांनी प्रास्ताविक करताना वाइन उद्योगातील समस्या मांडल्या. तसेच द्राक्ष उत्पादकांना अवकाळी पावसाचा फटका बसल्याचे निदर्शनास आणून दिले. या वेळी जिल्ह्यातील वाइन क्षेत्रातील उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com