agriculture news in Marathi Sharad pawar says schemes not reach to backward classes in fadnwis government Maharashtra | Agrowon

मागासवर्गीयांपर्यंत फडणवीस सरकारच्या योजना पोचल्याच नाहीत ः शरद पवार

टीम अॅग्रोवन
रविवार, 26 जानेवारी 2020

मुंबई: राज्यात गत सरकारच्या कार्यकाळात मागासवर्गीयांना दुय्यम वागणूक दिली गेली. गेल्या पाच वर्षांत सरकारच्या अनेक योजना मागासवर्गीयांपर्यंत पोचल्याच नाहीत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी (ता. २४) येथे केला.

मुंबई: राज्यात गत सरकारच्या कार्यकाळात मागासवर्गीयांना दुय्यम वागणूक दिली गेली. गेल्या पाच वर्षांत सरकारच्या अनेक योजना मागासवर्गीयांपर्यंत पोचल्याच नाहीत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी (ता. २४) येथे केला.

राज्यातील सत्तेत सहभागी झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने विविध समाज घटकांना जोडून पक्ष बळकटीचे प्रयत्न चालवले आहेत. अल्पसंख्याक विभागाच्या पाठोपाठ राष्ट्रवादीने सामाजिक न्याय विभागाची बैठक घेतली. या बैठकीत बोलताना पवार यांनी ज्या समाज घटकांवर अन्याय होतो त्यांच्या पाठिशी उभे राहून त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम आपण करावे, असे आवाहन पवार यांनी केले.

केंद्रातील सरकारचे मागासवर्गीय समाजाकडे लक्ष नाही. ज्यांच्या हातात देशाची सत्ता आहे ते ठरावीक समाजाचा विचार करून निर्णय घेत आहेत, असा आरोपही पवार यांनी भाजपचे नाव न घेता केला. राज्यात आज तीन पक्षांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळे मागासवर्गीय समाजाच्या परिवर्तनासाठी आपण काम केले पाहिजे, असे पवार म्हणाले.

आपल्या पक्षाने लहान घटाकांना न्याय देण्यासाठी सामाजिक न्याय आणि अल्पसंख्याक विकास खात्याची जबाबदारी स्वत:कडे घेतली आहे. त्यामुळे राज्यातील सर्व लहान घटकांना शिक्षण, आरोग्य सुविधा, महिला सुरक्षा अशा गोष्टीत बळकटी मिळवून देण्याचा प्रयत्न होईल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

पुढील वर्षी इंदू मिलमध्ये बाबासाहेबांची जयंती
दरम्यान, पुढील वर्षी म्हणजे १४ एप्रिल २०२१ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती इंदू मिलमधील आंतरराष्ट्रीय स्मारकात साजरी होईल, अशी घोषणा सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी यावेळी केली. 


इतर ताज्या घडामोडी
हुंडी चिठ्ठी, मायक्रो फायनान्स...अकोला  ः जिल्ह्यात हुंडी चिठ्ठी तसेच मायक्रो...
नाशिक येथे तीनदिवसीय पुष्पोत्सवाला...नाशिक  : प्रत्येकाच्या हक्काची तीन झाडं हवी...
न्हावी परिसरात मका पिकावर लष्करी अळीचा...न्हावी, जि. जळगाव ः न्हावीसह परिसरात मक्‍याची...
पोल्ट्री उद्योगाला हवा मदतीचा हातपुणे: बाजारभावातील नरमाईमुळे पोल्ट्री उद्योग...
हापूस निर्यातीसाठी निर्यातीसाठी पणन...रत्नागिरी ः निर्यातीत हापूसचा टक्का घसरत असून तो...
नीरा देवधर, गुंजवणीतून समन्यायी पाणीवाटपमुंबई ः नीरा देवघर व गुंजवणी धरणांचे कालवे...
तापमानवाढीचा धोका वेळीच ओळखावा लागेल:...औरंगाबाद: निसर्गाच्या दोलायमानतेत मानवी...
नगरमधील नऊ तालुक्यांत तेलबियांची पेरणीच...नगर ः तेलबियांची (गळीत धान्य) पेरणी वाढावी यासाठी...
सातारा जिल्ह्यात ५५ लाख क्विंटल...सातारा : जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या गाळपाची...
निर्यातबंदीमुळे कांदा फुगवटा;...पुणे: कांद्यावरील संपूर्ण निर्यातबंदी तातडीने...
खानदेशात कांदा लागवड १४ हजार हेक्‍टरवरजळगाव  ः खानदेशात रब्बी हंगामातील कांदा...
‘कर्जमुक्ती योजनेसाठी येणाऱ्या...अकोला  ः  महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी...
द्राक्षपट्ट्यासह आदिवासी भागात खुलली...नाशिक  : स्ट्रॉबेरी लागवडीसाठी महाबळेश्वरची...
सांगलीत हळदीच्या उत्पादनात घटसांगली : जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात आलेला महापूर...
चांद्यात फ्लॉवरच्या निकृष्ट...नगर : तेलंगण राज्यातील एका बियाणे कंपनीचे...
'थेट जनतेतून सरपंच निवडीचा निर्णय कायम...सोलापूर  ः राज्य सरकारने थेट जनतेतून सरपंच...
औरंगाबाद जिल्ह्यातील टंचाई...औरंगाबाद : जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईचे...
लातूर विभागातील दोन हजार हेक्टरवर फळबाग...नांदेड : कृषीच्या लातूर विभागांतर्गतच्या परभणी,...
अकोला बाजार समितीचे गरजूंना पाठबळअकोला ः कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पुढाकाराने...
उशिराच्या गव्हाला वाढत्या तापमानाचा...जळगाव  ः खानदेशात गहू पिकाची स्थिती...