agriculture news in marathi, sharad pawar says skill base programme will start in rayat organization, satara, maharashtra | Agrowon

कौशल्यावर आधारित उपक्रम ‘रयत’मध्ये सुरू करणार ः पवार
टीम अॅग्रोवन
रविवार, 23 सप्टेंबर 2018

‘रयत’मध्ये शेती क्षेत्राबाबतही काम केले जात आहे. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या शेती उपयुक्त अवजारांना पुरस्कार मिळाले आहेत. शेतीशी निगडित असणारा घटक मोठा आहे. संस्थेस अनेक शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या आहेत, त्या शेतकऱ्यांच्या विकासाची जबाबदारी आपली आहे.
- शरद पवार, अध्यक्ष, रयत शिक्षण संस्था.

सातारा  ः केवळ पुस्तकी नव्हे तर कौशल्यावर आधारित शिक्षण गरजेचे आहे, म्हणूनच रयत शिक्षण संस्थेच्या या शतकमहोत्सवी वर्षात गरजेवर आधारीत उपक्रम संस्थेत सुरू करण्यात येणार आहेत. नजीकच्या काळात त्यासाठी २५० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे, अशी माहिती रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी दिली.

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त शनिवारी (ता. २२) कर्मवीर समाधी परिसरात आयोजित कार्यक्रमात श्री. पवार बोलत होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर उपस्थित होते. कार्यक्रमास माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, ज्येष्ठ विचारवंत डॉ. प्रा. एन. डी. पाटील, आमदार शशिकांत शिंदे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. अनिल पाटील, उपाध्यक्ष ॲड. भगिरथ शिंदे, सचिव प्राचार्य डॉ. भाऊसाहेब कराळे आदी मान्यवर उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले, की संस्था शंभराव्या वर्षात पदार्पण करत आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सर्वसामान्यांची मुले शिक्षणाच्या प्रवाहात यावीत यासाठी संस्था सुरू केली. गेली ९९ वर्षे हे कार्य सुरू आहे. त्यामुळेच आज चार लाख ५८ हजार मुले संस्थेत शिक्षण घेत असून त्यामध्ये ५० टक्के मुली आहेत. शताब्दीचा फक्त सोहळा करायचा नाही तर महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवायचे आहेत. ‘इनोव्हेशन’च्या दृष्टीने कार्यक्रम सुरू केले जाणार आहेत. आज कौशल्यावर आधारीत शिक्षणाची गरज आहे, म्हणूनच टाटा कन्सलटन्सीची चार केंद्रे संस्थेत उभारण्यात येणार आहेत.

उद्योगांपासून ते शेतीक्षेत्रापर्यंत तसेच कमवा आणि शिका योजनेबाबत कर्मवीर भाऊराव पाटील यांनी त्याकाळी व्यक्त केलेले विचार आणि राबविलेली धोरणेच आता नव्या रुपात मांडली जात आहेत, असे सांगून डॉ. करमळकर म्हणाले, की आजही ७७ टक्के विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहात आहेत. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याची गरज आहे. अभ्यासक्रमातून विद्यार्थी स्वावलंबी झाला पाहिजे. या वेळी डॉ. विजयसिंह सावंत यांनी आभार मानले.
 

इतर ताज्या घडामोडी
औरंगाबादेत फ्लॉवर १८०० ते ३००० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
सांगली जिल्हा दुष्काळाच्या छायेतसांगली : पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी लोटला...
मराठवाड्यातील २६६ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/नांदेड ः मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांतील ६३...
पावसाच्या आगमनाने नाशिकमधील शेतकरी...नाशिक : जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने...
पशुसंवर्धन विकासासाठी ७०० कोटींचा निधी...कोल्हापूर  : राज्यातील पशुसंवर्धन विकासाला...
मराठवाड्यातील पावणेनऊ लाखांवर शेतकरी...औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील...
विद्यार्थी, शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’...बुलडाणा  : जिल्ह्यातील शेतकरी अनेक समस्यांना...
बारामतीत मुसळधार पाऊसपुणे  : जिल्ह्याच्या कोरडवाहू भागात असलेल्या...
नगर जिल्ह्यातील सहा महसूल मंडळांत...नगर : जिल्ह्यातील ३५ महसूल मंडळांत शनिवारी जोरदार...
कोणत्याही तंत्रज्ञानाचा डोळस स्वीकार...औरंगाबाद   : कोणत्याही तंत्रज्ञानाचा...
विधानसभा निवडणुकीत महायुतीने  २२० जागा...मुंबई  : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीने...
सोलापूर जिल्ह्यात १७ हजार हेक्टर...सोलापूर ः गेल्या दोन वर्षांपासून सोलापूर जिल्हा...
नाशिक जिल्ह्यातील ४१ हजार हेक्टरवरील...नाशिक : जिल्ह्यात लष्करी अळीचा प्रादुर्भाव...
मराठवाड्यात ४१ हजार हेक्टरवरील मक्यावर...औरंगाबाद : अमेरिकन लष्करी अळीने औरंगाबाद व जालना...
सांगली जिल्ह्यात अमेरिकन लष्करी अळीने...सांगली ः जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी अळीचा...
लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने नगर...नगर   ः गेल्या वर्षभरात दुष्काळाशी...
मोताळा, देऊळगावराजा तालुक्यात शंभर...बुलडाणा : खरिपात विदर्भात मका उत्पादनात...
साताऱ्यात अकराशे हेक्टरवरील मका पिकावर...सातारा : जिल्ह्यातील पूर्व भागात दुष्काळाची...
इंदापूर तालुक्यात अडीचशे हेक्टरवर...पुणे   ः गेल्या काही दिवसांपासून...
गुलटेकडीत टोमॅटोचे आवकेसह दरही वाढलेपुणे ः गेल्या आठ दिवसांत पावसाने दिलेल्या...