राजकारण बाजूला ठेवून दुष्काळी स्थितीत काम करा : शरद पवार

राजकारण बाजूला ठेवून दुष्काळी स्थितीत काम करा : शरद पवार
राजकारण बाजूला ठेवून दुष्काळी स्थितीत काम करा : शरद पवार

चिखली, जि. बुलडाणा ः राज्यातील शेतकऱ्यांवर निसर्गाचा कोप झाल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परीस्थितीमध्ये सर्वसामान्यांच्या हितासाठी राजकारण बाजूला ठेवून काम करावे, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी शासनकर्त्यांना दिला.  चिखली येथे गुरुवारी (ता. २५) आयोजित माजी मंत्री भारत बोंद्रे यांच्या अमृतमहोत्सवी कृतज्ञता सोहळ्यात श्री. पवार बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे होते. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, खासदार प्रतापराव जाधव, आमदार सतीश चव्हाण, अमरसिंग पंडित, डॉ. संजय रायमूलकर, आमदार आकाश फुंडकर, बुलडाणा अर्बन बॅंकेचे अध्यक्ष राधेश्‍याम चांडक, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, जिल्हा परिषद अध्यक्षा उमाताई तायडे यांच्यासह विविध पदाधिकारी व बोंद्रे परिवारातील सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते. या वेळी श्री. पवार म्हणाले की, जलसिंचन, शिक्षण आणि उद्योग क्षेत्रामध्ये बोंद्रे यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज येथे उपस्थित असलेली जनता हे त्यांचे समाजकार्याबद्दलच्या प्रामाणिकतेचे प्रतीक आहे. केंद्र सरकारवर टीका करताना सीबीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये सुरू असलेले वाद हे सरकारचे अशा स्वतंत्र तपास यंत्रणांमधील हस्तक्षेप दाखवून देते, असेही ते म्हणाले. खासदार दानवे यांनी पश्‍चिम महाराष्ट्राप्रमाणे विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये सिंचनाच्या पाण्यासाठी चळवळ उभी राहत नाही, अशी खंत व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केले. भेदभाव करु नका राज्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे, तरी सरकार मात्र दुष्काळसदृश परिस्थिती असल्याचे जाहीर करते, असा शब्दच्छल करून जनतेच्या दुःखावर डागण्या देण्याचे काम करू नये. जिल्ह्यातील दुष्काळाबाबत जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार बुलडाणा, चिखली आणि मेहकर हे तालुके दुष्काळाच्या प्राथमिक यादीमध्ये समाविष्ट नाहीत, त्यामुळे असा भेदभाव न करता जिल्ह्यातील भीषण दुष्काळस्थिती पाहता संपूर्ण जिल्ह्याला दुष्काळाचे लाभ तातडीने सुरू करण्याची गरज आहे, असेही श्री. पवार म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com