agriculture news in Marathi, Sharad Pawar says, work for drought genuinely, Maharashtra | Page 2 ||| Agrowon

राजकारण बाजूला ठेवून दुष्काळी स्थितीत काम करा : शरद पवार

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 26 ऑक्टोबर 2018

चिखली, जि. बुलडाणा ः राज्यातील शेतकऱ्यांवर निसर्गाचा कोप झाल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परीस्थितीमध्ये सर्वसामान्यांच्या हितासाठी राजकारण बाजूला ठेवून काम करावे, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी शासनकर्त्यांना दिला. 

चिखली, जि. बुलडाणा ः राज्यातील शेतकऱ्यांवर निसर्गाचा कोप झाल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परीस्थितीमध्ये सर्वसामान्यांच्या हितासाठी राजकारण बाजूला ठेवून काम करावे, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी शासनकर्त्यांना दिला. 

चिखली येथे गुरुवारी (ता. २५) आयोजित माजी मंत्री भारत बोंद्रे यांच्या अमृतमहोत्सवी कृतज्ञता सोहळ्यात श्री. पवार बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे होते. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, खासदार प्रतापराव जाधव, आमदार सतीश चव्हाण, अमरसिंग पंडित, डॉ. संजय रायमूलकर, आमदार आकाश फुंडकर, बुलडाणा अर्बन बॅंकेचे अध्यक्ष राधेश्‍याम चांडक, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, जिल्हा परिषद अध्यक्षा उमाताई तायडे यांच्यासह विविध पदाधिकारी व बोंद्रे परिवारातील सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते.

या वेळी श्री. पवार म्हणाले की, जलसिंचन, शिक्षण आणि उद्योग क्षेत्रामध्ये बोंद्रे यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज येथे उपस्थित असलेली जनता हे त्यांचे समाजकार्याबद्दलच्या प्रामाणिकतेचे प्रतीक आहे. केंद्र सरकारवर टीका करताना सीबीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये सुरू असलेले वाद हे सरकारचे अशा स्वतंत्र तपास यंत्रणांमधील हस्तक्षेप दाखवून देते, असेही ते म्हणाले. खासदार दानवे यांनी पश्‍चिम महाराष्ट्राप्रमाणे विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये सिंचनाच्या पाण्यासाठी चळवळ उभी राहत नाही, अशी खंत व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केले.

भेदभाव करु नका
राज्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे, तरी सरकार मात्र दुष्काळसदृश परिस्थिती असल्याचे जाहीर करते, असा शब्दच्छल करून जनतेच्या दुःखावर डागण्या देण्याचे काम करू नये. जिल्ह्यातील दुष्काळाबाबत जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार बुलडाणा, चिखली आणि मेहकर हे तालुके दुष्काळाच्या प्राथमिक यादीमध्ये समाविष्ट नाहीत, त्यामुळे असा भेदभाव न करता जिल्ह्यातील भीषण दुष्काळस्थिती पाहता संपूर्ण जिल्ह्याला दुष्काळाचे लाभ तातडीने सुरू करण्याची गरज आहे, असेही श्री. पवार म्हणाले.


इतर अॅग्रो विशेष
आपत्कालीन परिस्थितीत राज्य सरकारांसोबत...मुंबई : आपत्कालीन परिस्थितीत केंद्र सरकार राज्य...
कीडनाशकांवर बंदीबाबत अभ्यासच झालेला नाहीपुणे: कृषी रसायन क्षेत्रात काही कीडनाशकांवर...
जालन्यात रेशीम कोषांची उलाढाल ६६...जालना: येथील रेशीम कोष खरेदी बाजारपेठेची यंदाच्या...
कलिंगड, भातशेतीसोबत ब्रॉयलर पक्षांची...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पेंडूर कनकवाडी येथील दीपक...
दूध आंदोलनाची पुढील दिशा आज ठरणारनगर ः दुधाला प्रतिलिटर तीस रुपये दर मिळावा आणि...
पॉवर टीलर आयातीवर निर्बंधपुणे: भारत-चीन वादाचा फटका आता पॉवर टीलर...
नगर जिल्ह्यात तेलकट डागांमुळे डाळिंब...नगर ः नगर जिल्ह्यात यंदा छोटी तसेच तोडणीला...
शेळीपालन, श्‍वान, देशी कोंबडीपालनातून...शेळीपालन, मग श्‍वानपालन व आता देशी कोंबडीपालन अशी...
राज्यात ठिकठिकाणी पावसाच्या हलक्या सरीपुणे ः  कोकण, मध्य महाराष्ट्र, खानदेश,...
लक्ष वळविण्याची राजकीय खेळी!एखाद्या महासंकटाचा राजकीय लाभ कसा उठवायचा हे...
जो पारदर्शी तोच टिकेलकेंद्र सरकारने ‘एक देश एक बाजार’ योजनेची घोषणा...
आदिवासी महामंडळातर्फे ४९ लाख क्विंटल...नाशिक : कोरोनाच्या संकट काळात आदिवासी विकास...
संशोधनासाठी मोसंबी वाणांचे जतन फायदेशीर...बदनापूर, जि. जालना : मोसंबी फळपिकांच्या विविध...
परभणी जिल्ह्यात कापसाची ३६ लाख क्विंटल...परभणी ः कोरोना साथीमुळे लांबत गेलेला परभणी...
अल्पभुधारक शेतकऱ्यांच्या सबलीकरणावर भर नवी दिल्ली: शेती क्षेत्राला चालना देण्यासाठी...
रानभाज्या विक्रीतून रोजगार निर्मितीचा...नाशिक: राज्यातील आदिवासी भागात नैसर्गिक पद्धतीने...
कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा शिडकावा पुणे ः पावसाचा जोर कमी झाल्याने कोकण, मध्य...
चीनकडून बियाणे दहशतवादाचा धोका पुणेः देशातील बियाणे वारसा आणि बीजोत्पादन उद्योग...
बेकायदा ‘एचटीबीटी’मुळे तीनशे कोटींचा...पुणे : बेकायदेशीर तणनाशक सहणशील (एचटीबीटी) कापूस...
कोल्हापुरात पावसाचा जोर ओसरला कोल्हापूर: जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला आहे....