शरद पवार यांनी ऊसतोड कामगारांची कोंडी फोडावी

ऊसतोडणी कामगारांच्या तोडणी दरात वाढ करावी यासह इतर मागण्यांसाठी ऊसतोडणी कामगार संघटनांनी यंदा संप पुकारला आहे. ऊसतोडणी कामगारांच्या मागण्याबाबत शरद पवार यांनी लक्ष घालून तोडगा काढावा, अशी एकमुखी मागणी संघटनांच्या प्रतिनिधींनी केली आहे.
Sharad Pawar should break the deadlock of sugarcane workers
Sharad Pawar should break the deadlock of sugarcane workers

नगर ः ऊसतोडणी कामगारांच्या तोडणी दरात वाढ करावी यासह इतर मागण्यांसाठी ऊसतोडणी कामगार संघटनांनी यंदा संप पुकारला आहे. तोडणी कामगार व साखर संघाच्या अध्यक्षांची याबाबत बैठक झाली. ऊसतोडणी कामगारांच्या मागण्याबाबत शरद पवार यांनी लक्ष घालून तोडगा काढावा, अशी एकमुखी मागणी संघटनांच्या प्रतिनिधींनी केली आहे.

मागण्यांवर बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. आता आठ दिवसांत दुसरी बैठक होणार आहे. त्यामुळे ऊसतोडणी कामगारांच्या संपाला अधिक तीव्रता येण्याआधीच तोडगा निघण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्यातील ऊसतोडणी मजुरांच्या तोडणी दर करार संपला असल्याने नव्याने करार करून प्रती टन किमान पाचशे रुपये दर मिळावा, मुकादमांच्या कमीशनमध्ये वाढ करावी यासह इतर मागण्यांसाठी यंदा मजुरांच्या संघटनांनी संप पुकारला आहे.

याबाबत नुकतीच साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांच्या उपस्थित बैठक झाली. माजी मंत्री पंकजा पालवे, महाराष्ट्र राज्य ऊसतोडणी कामगार युनियनचे अध्यक्ष गहिनीनाथ पाटील थोरे, महाराष्ट्र श्रमिक ऊसतोडणी व वाहतूक कामगार संघटनेचे अध्यक्ष जीवन राठोड, प्रा. सुशिला मोराळे, प्रदीप भांगे, मोहन जाधव, सुभाष जाधव, दत्तोबा भांगे, श्रीमंत जायभाये, माजी आमदार केशव आंधळे यांच्यासह ऊसतोडणी कामगार संघटनांचे प्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते.

हार्वेस्टरला पाचशे देता मग मजुरांना का नाही मजुरांना प्रती टनाला पहिल्या किलोमीटरला किमान पाचशे रुपये मिळावेत या मागणीवर सगळ्याच संघटना ठाम आहेत. हार्वेस्टरला पाचशे रुपये देता, मग मजुरांना का नाही असा प्रश्न महाराष्ट्र राज्य ऊसतोडणी कामगार युनियनचे अध्यक्ष गहिनीनाथ पाटील थोरे यांच्यासह इतर संघटनांच्या प्रतिनिधींनी यावेळी उपस्थित केला.

ऊसतोडणी कामगार, मुकादमांच्या मागण्यांबाबत यंदा संप पुकारला आहे. याविषयी नुकतीच साखर संघ व कामगार संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. त्यात सकारात्मक चर्चा झाली. शरद पवार यांनी याबाबत लक्ष घालून तोडगा काढावा आणि योग्य दरवाढ द्यावी, अशी मागणी संघटनांनी केली आहे. मजुरांना योग्य तो न्याय मिळेपर्यंत संप सुरूच राहणार आहे. - जीवन राठोड, अध्यक्ष, महाराष्ट्र श्रमिक ऊसतोडणी व वाहतूक कामगार संघटना

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com