agriculture news in marathi, sharad pawar speaks about government formation, nagpur, maharashtra | Page 3 ||| Agrowon

शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचेच सरकार येणार : शरद पवार

टीम अॅग्रोवन
शनिवार, 16 नोव्हेंबर 2019

नागपूर  ः राज्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकारच स्थापन होणार असून हे सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ देखील पूर्ण करेल, असा विश्‍वास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्‍त केला. 

येथील प्रेस क्‍लबमध्ये शुक्रवारी (ता.१५) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. श्री. पवार म्हणाले, की राज्यात कोणत्याही प्रकारची राजकीय अस्थिरता नाही. राज्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार येणार आहे. या सरकारचा कारभार पाच वर्षे सुरळीत चालेल. या काळात राज्याच्या सर्वांगीण विकासावर लक्ष्य केंद्रित केले जाणार आहे. 

नागपूर  ः राज्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकारच स्थापन होणार असून हे सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ देखील पूर्ण करेल, असा विश्‍वास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्‍त केला. 

येथील प्रेस क्‍लबमध्ये शुक्रवारी (ता.१५) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. श्री. पवार म्हणाले, की राज्यात कोणत्याही प्रकारची राजकीय अस्थिरता नाही. राज्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार येणार आहे. या सरकारचा कारभार पाच वर्षे सुरळीत चालेल. या काळात राज्याच्या सर्वांगीण विकासावर लक्ष्य केंद्रित केले जाणार आहे. 

राष्ट्रवादीचे आमदार फोडण्याचा दावा भाजपकडून केला जात आहे. या संदर्भाने विचारलेल्या प्रश्‍नावर ‘‘मला या संदर्भाने माहिती नाही, तुम्हाला काही माहिती असेल तर सांगा’’, असे श्री. पवार म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांना मी चांगला ओळखतो. त्यांनी ‘मी पुन्हा येणार’ असे तीन वेळा म्हटले होते. मात्र ते ज्योतिषी असल्याची माहिती मात्र मला नव्हती, असे श्री. पवार म्हणाले.

राज्यासह विदर्भात कापूस, सोयाबीन, तूर तसेच संत्र्याची मॉन्सूनोत्तर पावसामुळे मोठी हानी झाली. कापसाची बोंड भिजली, स्टेपल लेंथदेखील कमी मिळणार आहे. कापसाचा दर्जा खालावल्याने त्याला योग्य दर मिळणार नाही. संत्र्याची गळ झाली, संत्रा पिकात बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढला. त्यामुळे संत्रा उत्पादकांच्या अडचणीतदेखील भर पडली आहे. शेतीसंदर्भातील प्रश्‍न सोडवण्यासाठी येत्या आठवड्यात केंद्रीय कृषी मंत्रालयस्तरावर चर्चा केली जाईल. शेतकऱ्यांशी निगडित आर्थिक प्रश्‍नांसदर्भाने अर्थ मंत्रालयाशी देखील संवाद साधला जाईल. सोमवारपासून संसदेचे अधिवेशन सुरू होणार आहे. त्यानंतरच्या काळात काही निवडक शेतकरी प्रतिनिधींना सोबत घेऊन ही चर्चा होईल, असे श्री. पवार यांनी सांगितले.  


इतर ताज्या घडामोडी
`गोकुळ'चे पाणी, वीज तोडण्याचे आदेश कोल्हापूर ः तृत्तीय व चतुर्थ संवर्गातील...
माण तालुक्यातील गावांची जलसंपन्नतेकडे...गोंदवले, जि. सातारा : नेहमीचाच दुष्काळ... त्याला...
सातारा जिल्ह्यात २६ लाख क्विंटल साखरेचे...सातारा ः जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांचे ऊस गाळप...
मराठवाड्यात २१ लाख हेक्‍टरवर रब्बीउस्मानाबाद : खरीप हातचा गेलेल्या मराठवाड्यात आजवर...
पुणे जिल्ह्यात शिवभोजनालयाला २६...पुणे ः सरकारने सत्तेवर येण्याअगोदर गरीब व गरजूंना...
रत्नागिरी जिल्ह्यात ‘जलयुक्त’मधील ९९...रत्नागिरी : भाजप सरकारच्या कालावधीत सुरू झालेले...
महाबीजचे सहा जिल्ह्यांत ४ हजार हेक्टरवर...परभणी : महाबीजच्या परभणी विभागातील सहा...
पुणे जिल्ह्यात रब्बीत १९१० पीककापणी...पुणे ः पिकांची उत्पादकता आणि पीकविमा नुकसानभरपाई...
पुणे बाजार समितीची आरक्षण सोडत जाहीरपुणे ः विविध कारणांनी सातत्याने पुणे बाजार...
विधान परिषदेच्या दोन जागांसाठी आघाडी...मुंबई ः विधान परिषदेचे दोन सदस्य विधानसभेवर...
परभणी : सोयाबीनची उत्पादकता हेक्टरी १०...परभणी : सन २०१९-२० च्या खरीप हंगामात परभणी...
शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची...औरंगाबाद : शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची...
शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी : राजू...बुलडाणा ः महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेली दोन...
संक्रांतीला कृषी संस्कृतीचे महत्त्व...नाशिक : नवीन वर्षाच्या सुरुवातीला संक्रांतीचा सण...
सांगलीत गूळ ३२०० ते ४०४५ रुपये...सांगली : येथील बाजार समितीत मंगळवारी (ता. १४...
वन जमिनीवरील अतिक्रमणे काढणार ः...पुणे ः वन विभागाच्या हद्दीत करण्यात आलेली...
वन्यप्राण्यांपासून संरक्षणासाठी पिकाला...यवतमाळ ः जिल्ह्यात वन्यप्राण्यांमुळे पिकांच्या...
जत तालुक्यात करडईच्या क्षेत्रात घटसांगली : जत तालुक्यात कोरडवाहू पीक म्हणून करडईचे...
खानदेशातील किमान तापमानात वाढजळगाव : खानदेशात यंदा हुडहुडी भरविणारी थंडी दोन-...
नांदेड जिल्ह्यात रब्बीचे ८ टक्केच पीक...नांदेड : ‘‘जिल्ह्यात यंदा रब्बी हंगामात बुधवार (...