पशुपालकांना संस्थांनी मदत करावी ः शरद पवार

ज्येष्ठ नेते शरद पवार
ज्येष्ठ नेते शरद पवार

निमगाव केतकी, जि. पुणे   ः सध्याच्या भीषण दुष्काळात सर्वत्र पिण्याच्या पाण्याची व जनावरांच्या चारा पाण्याची मोठी मागणी आहे. छावणी व टॅंकरसाठी सरकारची मदत होईल. मात्र, आपल्याकडे असलेले साखर कारखाने, दूधसंस्था, बाजार समित्या अशा स्थानिक संस्थांनी थोडा फार हातभार लावला तर लोकांची दुष्काळातून सुटका होईल, असा विश्‍वास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला.

पवार यांनी रविवारी माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार दत्तात्रेय भरणे यांना बरोबर घेऊन कौठळी (ता. इंदापूर) या दुष्काळी गावाला भेट दिली. या वेळी ग्रामस्थांनी टॅंकरच्या खेपा वाढवाव्यात, त्वरित छावणी सुरू करावी, सरसकट रेशनमधून धान्य मिळावे, पीक विम्याची रक्कम मिळावी, खडकवासला कालव्यातून पूर्वीप्रमाणे नियमित पाणी मिळावे, उजनीत हक्काचे पाणी राहावे अशा मागण्या केल्या.

श्री. पवार म्हणाले, की नगर, सोलापूरचा दौरा केल्यानंतर आपण मुख्यमंत्र्यांना काही निर्णय घ्यायला लावले. यामध्ये टॅंकर मंजूर करण्याचे अधिकारी खाली देण्यात आले. शेळ्यामेंढ्यांना मदत देण्याबाबत सरकारशी आणखी एकदा बोलू. छावणीसाठी तालुक्‍यातील छत्रपती, कर्मयोगी कारखाना, सोनाई उद्योग समूह व कृषी उत्पन्न बाजार समिती या संस्था जबाबदारी घेत आहेत ही बाब समाधानाची आहे.

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार दत्तात्रेय भरणे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्‍वासराव देवकाते, बांधकाम व आरोग्य सभापती प्रवीण माने, संजय सोनवणे यांनी दुष्काळाबाबत मते मांडली.

या वेळी तहसीलदार सोनाली मेटकरी, गटविकास अधिकारी माणिकराव बिचकुले, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, तालुकाध्यक्ष महारुद्र पाटील, अप्पासाहेब जगदाळे, ज्येष्ठ नेते ज. मा. मोरे, मयूरसिंह पाटील, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष ॲड. कृष्णाजी यादव, उपसभापती देवराज जाधव, राष्ट्रवादीच्या महिला तालुकाध्यक्षा छाया पडसळकर, जिल्हा उपाध्यक्षा रहेना मुलाणी, लालासाहेब पवार, अमोल भिसे, शुभम निंबाळकर, सचिन सपकळ, दशरथ डोंगर, तात्यासाहेब वडापुरे, मोहन दुधाळ, सरपंच गुणवंत मारकड उपस्थित होते. हमा पाटील यांनी आभार मानले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com