agriculture news in marathi, sharad pawar target to government on several issue, nagar, maharashtra | Page 2 ||| Agrowon

शेतकरी, जनतेच्या प्रश्नांची उत्तरे मुख्यमंत्र्यांनी द्यावीत ः शरद पवार
टीम अॅग्रोवन
रविवार, 20 ऑक्टोबर 2019

नगर  : राज्यात पाच वर्षांत १६ हजार शेतकरी आत्महत्या झाल्या. शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी उपाययोजना करण्याची जबाबदारी सरकारची आहे. उपाययोजना करण्याबाबत सरकार अपयशी ठरले. त्यामुळे लोक प्रश्न विचारत आहेत आणि त्याची उत्तरे देण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची आहे; पण कामेच केली नसल्याने ते उत्तरे देऊ शकत नाहीत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. 

नगर  : राज्यात पाच वर्षांत १६ हजार शेतकरी आत्महत्या झाल्या. शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी उपाययोजना करण्याची जबाबदारी सरकारची आहे. उपाययोजना करण्याबाबत सरकार अपयशी ठरले. त्यामुळे लोक प्रश्न विचारत आहेत आणि त्याची उत्तरे देण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची आहे; पण कामेच केली नसल्याने ते उत्तरे देऊ शकत नाहीत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. 

कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस व आघाडीचे उमेदवार रोहित पवार यांच्या प्रचारार्थ कर्जत येथे शनिवारी (ता.१९) श्री. पवार यांची सभा झाली. या वेळी त्यांनी सरकारच्या भूमिकेवर टीका केली.  श्री. पवार म्हणाले, की सरकारला कोणतीही जबाबदारी झटकून चालणार नाही. शेतकरी आत्महत्या ही बाब गंभीर आहे. देश आणि राज्यात सध्या परिस्थिती वाईट आहे. अनेक कारखाने बंद पडले आहेत. त्यामुळे बेरोजगारांना काम नाही. अनेक कुटुंबे रस्त्यावर आली आहेत. शेतीमालाला हमीभाव नाही, शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी उपाययोजना करण्याची जबाबदारी सरकारची आहे. मात्र काहीही उपाययोजना केल्या नाहीत. सरकारने शेतकरी आर्थिकदृष्ट्या कमकुवत केले आहेत म्हणून शेतकरी आत्महत्या होत आहेत. त्यामुळे लोक प्रश्न विचारत आहेत आणि त्याची उत्तरे देण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची आहे. पण कामेच केली नसल्याने ते उत्तरे देऊ शकत नाहीत. राज्यातील युवकांनी निवडणूक हातात घेतली आहे. त्यामुळे परिवर्तन होणारच आहे.

पालकमंत्री राम शिंदे यांच्यातच राम राहिला नाही. येथील जनता आता असा इतिहास घडवेल की देशात तो इतिहास चर्चिला जाईल. बारामतीची अवस्था अशीच होती. मी आमदार झाल्यावर बदल केला. येत्या पाच वर्षांत कर्जत-जामखेडमध्ये असाच बदल होईल, असे श्री. पवार म्हणाले.

इतर ताज्या घडामोडी
राज्यातील ३४ जिल्हा परिषद अध्यक्षपदाची...मुंबई ः राज्यातील ३४ जिल्हा परिषद अध्यक्षपदाची...
भारत 'या' देशाला देणार कापूस...नागपूर ः मुस्लिम बहूल असलेल्या अझरबैजान देशातील...
कांदा घेऊन जाणाऱ्या ट्रक ड्रायव्हरची...नाशिक : परराज्यांत होणाऱ्या कांद्याच्या...
हमीभाव खरेदी केंद्रावर आली वजनकाटे...अकोला ः शासनाने या हंगामात सुरु केलेल्या आधारभूत...
मराठवाड्यात रब्बी पेरणीला मिळेना गती लातूर : मराठवाड्यातील रब्बी पेरणीची गती...
परभणी जिल्ह्यात कापूस वेचणीसाठी...परभणी : जिल्ह्यात यंदाच्या हंगामात सद्य:स्थितीत...
अरुणा प्रकल्पग्रस्तांनी मांडले...सिंधुदुर्ग : आयुक्त कार्यालयावर ‘दे धडक बेधडक’...
पाण्याच्या निचऱ्यासाठी गादीवाफ्यावर धान...भंडारा ः‘पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा...
अस्मानीमुळे नुकसान सोसवेना, चालविली...नाशिक : अगदी प्रतिकूल परिस्थितीत भांडवल जमा करून...
अचूक सांख्यिकीमुळे शेती उत्पन्न वाढविणे...नवी दिल्ली: बदलत्या हवामानाच्या आव्हानावर...
पुणे जिल्हा परिषदेत येणार ‘महिला राज’पुणे  : जिल्हा परिषदेच्या नवीन अध्यक्ष...
पुणे बाजार समितीत रताळ्यांची २० टन आवक...पुणे  ःकार्तिकी एकादशीनिमित्ताने पुणे बाजार...
कशामुळे घटले साताऱ्यातील स्ट्राॅबेरीचे...सातारा  ः जिल्ह्यात अतिपावसाचा फटका...
साताऱ्यात पुढील वर्षी सहकारी संस्थांची...सातारा  : आगामी वर्ष हे सहकारातील विविध...
नगर जिल्हा परिषदेतही वाहताहेत...नगर ः राज्यात एकीकडे भाजपला सत्तेपासून दूर...
थकीत पीकविम्यासाठी किसान सभेचा पुण्यात...पुणे  ः बीडमधील शेतकऱ्यांना थकीत पीकविम्याची...
किसान सभेचे सोमवारपासून राज्यभर आंदोलन...पुणे  ः अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झाले. या...
महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचे केंद्र...मुंबई  : भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यावर...
भारतीय मक्याचे पुढे काय होते ? जाणून...मका हे एक महत्त्वाचे तृणधान्य आहे. जगातील चार...
शाश्‍वत शेतीसाठी तण व्यवस्थापन आवश्यकतणांकडे आजवर आपण सर्वांनी एखाद्या शत्रूसारखे...