agriculture news in Marathi sharad pawar visit to cyclone affected area Maharashtra | Agrowon

नुकसानीची शरद पवारांकडून पाहणी

टीम अॅग्रोवन
बुधवार, 10 जून 2020

निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाचा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून आढावा घेतला जात असून या पाहणीसाठी ते मंगळवारपासून (ता.९) कोकण दौऱ्यावर आहेत.

मुंबई: निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाचा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून आढावा घेतला जात असून या पाहणीसाठी ते मंगळवारपासून (ता.९) कोकण दौऱ्यावर आहेत. शरद पवार यांनी सुरुवातीला रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे पोहोचून परिस्थितीची माहिती घेतली. या वेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे आणि पालकमंत्री अदिती तटकरे उपस्थित होत्या. या वेळी स्थानिक ग्रामस्थांशी चर्चा करून शरद पवारांनी परिस्थिती जाणून घेतली.

शरद पवार दोन दिवसांच्या कोकण दौऱ्यावर आहेत. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील भागाची पाहणी करून शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन संपूर्ण माहिती जाणून घेत आहेत. आज (ता.१०) जून रोजी रत्नागिरी जिल्हा दौरा असून सुरुवातीला दापोली येथील नुकसानीची पाहणी करणार आहेत. निसर्ग या चक्रीवादळाचा सर्वाधिक तडाखा रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना बसला आहे. अनेक शेतकऱ्यांचे, आंबा उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे.

दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही कोकण दौरा केला. तसेच १०० कोटींची तातडीची मदत त्यांनी जाहीर केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जेव्हा रायगड दौरा केला तेव्हा त्यानंतर लगेचच त्यांच्यात आणि शरद पवारांमध्ये एक तातडीची बैठक झाली होती. कोकणातल्या नुकसानग्रस्तांना पुन्हा कसे उभे करायचे यावर चर्चा झाली.

रायगड, रत्नागिरी, पुणे आणि इतर जिल्ह्यांतील शेतीचे झालेले नुकसान कसे भरून काढायचे, तसेच कोकणातल्या फळबागांना विशेष मदत देऊन या फळबागा उभ्या करण्याबाबत त्यांच्यात चर्चा झाल्याचे समजले होते. आता या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या कोकण दौऱ्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांसोबत बैठक
शरद पवार यांनी माणगाव, म्हसळा, दिवेआगार, श्रीवर्धन येथील दौरा करून निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसनीची पाहणी केली. त्यानंतर ४ वाजता श्रीवर्धन येथे आमदार, खासदार आणि अधिकारी यांच्यासमवेत बैठक झाली. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता हरिहरेश्वर आणि नंतर ६ वाजता बागमांडला मार्गे दापोली येथे. दापोली येथे शरद पवार यांनी मुक्काम केला.


इतर अॅग्रो विशेष
राज्यात हलक्या पावसाची शक्यता पुणे : राज्यात पावसाचा जोर ओसरला आहे. आज (ता. १६...
सोयाबीनचा उच्चांकी दर मिळतोय अत्यल्प...अकोला ः सध्या बाजारात सोयाबीनला कुठे दहा हजार,...
...तर ‘त्या’ नेत्यास एकरभर जमीन बक्षीस...कोल्हापूर : केंद्र व राज्य सरकारकडून एकरकमी...
पाणलोट चळवळीचे आधारवड फादर हर्मन बाखर...नगर ः महाराष्ट्रातील दुष्काळी भागासाठी आयुष्‍य...
रब्बी हंगामात होणार ८४८३ शेतीशाळा पुणे ः रब्बी हंगामात राज्यातील शेतकऱ्यांना...
सोयाबीन उत्पादकांनी टार्गेट ठेवूनच...पुणे : मध्य प्रदेशात सोयाबीनची आवक हळूहळू वाढत...
खानदेशात केळी दर स्थिरजळगाव : खानदेशात कांदेबाग केळीची आवक दिवसागणिक...
घोटभर पाणी बेतले मायलेकीच्या जिवावरउंडवडी, जि. पुणे :  पिण्यासाठी पाणी काढताना...
हरभरा पीक करणार यंदाही रब्बीचे नेतृत्व पुणे ः राज्यात खरीप हंगामात मुख्य पीक म्हणून...
मोसंबी, शेडनेटसह सेंद्रिय पद्धतीने...पारंपरिक मोसंबी बागेतील लागवड अंतर व वाणातील बदल...
‘कोरोना’नंतर आकार घेतेय फुलांची...गेल्या दोन वर्षांपासून कोरोना संकटामुळे पुणे...
‘मामा’ तलाव रुतले गाळात साकोली, जि. भंडारा : भंडारा, गोंदिया जिल्ह्यांतील...
‘इंडो- इस्राईल तंत्रज्ञानातून संत्रा...नागपुरी संत्र्याची हेक्टरी उत्पादकता वाढण्यासाठी...
राज्यात उद्यापासून पावसाची उघडीप शक्यपुणे : राज्यात सुरू असलेला पाऊस उद्यापासून (ता....
कीडनाशके साठ्यांच्या होणार संगणकीय नोंदीपुणे ः देशातील कीडनाशके विक्री करणाऱ्या दुकानात...
ई-पीक पाहणी ॲपमध्ये आंतरपीक नोंदणीला ‘...पथ्रोट, जि. अमरावती : शासनाच्या ई-पीक पाहणी...
मानवाधिकार आयोगाची शेतकरी आंदोलनावरून...नवी दिल्ली ः राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (...
ई-पीक पाहणीबाबत काही भागांतून तक्रारीपुणे ः आपल्या शेतातील पिकाची नोंद स्वतः...
पालघर, नाशिकमध्ये मुसळधारपुणे : पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात अनेक...
कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधारेचा इशारापुणे : पोषक हवामानामुळे राज्यात सर्वदूर पावसाचा...