पीक विमा भरण्यासाठी सामायिक सुविधा केंद्र

पीक विमा भरण्यासाठी सामायिक सुविधा केंद्र
पीक विमा भरण्यासाठी सामायिक सुविधा केंद्र

परभणी : प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम २०१९-२० अंतर्गत शेतकऱ्यांना अर्ज भरण्यासाठी बँकांमध्ये होणारी गर्दी टाळता यावी, अर्ज सुलभतेने भरता यावेत, यासाठी सामायिक सुविधा केंद्र(सीएससी)मार्फत मोफत ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करता येतील. शेतकऱ्यांनी २४ जुलैपर्यंत अर्ज सादर करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी केले.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत जिल्ह्यातील भात, खरीप ज्वारी, बाजरी, मूग, उडीद, तूर, सोयाबीन, कापूस आणि सूर्यफूल या पिकाचा विमा शेतकऱ्यांना भरता येईल. ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी कॉमन सर्व्हिस सेंटरला कुठलेही शुल्क देण्याची गरज नाही. विमा हप्त्याव्यतिरिक्त शुल्क मागितल्यास संबंधित सीएससी चालकांची तक्रार पोलिस स्टेशन, तालुका कृषी अधिकारी, जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाचा नियंत्रण कक्ष- दूरध्वनी क्र.०२४५२२२६४०० या क्रमांकावर करावी. 

जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक विमा योजनेत सहभागी होता यावे, याकरिता अर्ज दाखल करण्याची सुविधा राष्ट्रीयकृत बँक, व्यापारी बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, सामायिक सुविधा केंद्र येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे.

विमा भरण्यासाठी विहीत नमुन्यातील अर्ज, आधारकार्ड, सातबारा उतारा, अधिसूचित पिकाची पेरणी केलेले स्वयंघोषणापत्र, बँक पासबुकची प्रत, भाडेपट्टा करार असलेल्या शेतकऱ्यांना करारनामा किंवा सहमती पत्र आदी कागदपत्रे आवश्यक आहेत.  अधिक माहितीसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, संबंधित तालुका कृषी अधिकारी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, राष्ट्रीयकृत बँकांशी संपर्क साधावा, असे जिल्हाधिकारी शिवाशंकर यांनी सांगितले. 

पीकनिहाय प्रति हेक्टरी हप्ता (रुपये)

भात ८७०
ज्वारी ४९०
बाजरी ४०० 
सोयाबीन ८६० 
सूर्यफूल ४६२
मूग ३८०
उडीद ३८०
तूर ६३०
कापूस २१५० 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com