सह्याद्री कंपनी विदर्भातून संत्रा, केळीसह मूग, सोयाबीन खरेदी करणार

विदर्भाचे मुख्य फळपीक असलेल्या संत्र्यासह इतर शेतमालाच्या खरेदीचा प्रस्ताव आहे. त्याकरिता सर्वेक्षणाचे काम सुरू केले आहे. शेतकऱ्यांचे शेतमाल दराच्या माध्यमातून मूल्यवर्धन करण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे. - विलास शिंदे, अध्यक्ष, सह्याद्री ॲग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी, नाशिक
सह्याद्री कंपनी विदर्भातून संत्रा, केळीसह मूग, सोयाबीन खरेदी करणार
सह्याद्री कंपनी विदर्भातून संत्रा, केळीसह मूग, सोयाबीन खरेदी करणार

नागपूर : विदर्भाच्या सातपुडा पर्वतरांगांसह विविध जिल्ह्यांत उत्पादित शेतमालाची खरेदी करण्यासाठी नाशिकच्या सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनीने पुढाकार घेतला आहे. पहिल्या टप्प्यात अचलपूर तालुक्‍यात कलिंगड खरेदी करून त्याची थेट निर्यात काठमांडू(नेपाल)मध्ये करण्यात आली आहे. दुसऱ्या टप्प्यात संत्रा, केळीसह मूग, उडीद, सोयाबीनचीदेखील कंपनी खरेदी करणार आहे.   संत्रा हे विदर्भाचे मुख्य पीक. त्यातच आंबिया आणि मृग असे दोन व्यावसायिक बहार घेता येणारे नागपुरी संत्र्यांचे जागतिक स्तरावरील एकमेव वाण. चवीच्या बाबतीतही नागपुरी संत्र्याने आपले वेगळेपण जपले आहे. परंतू सत्ताकेंद्र विदर्भात असताना अपेक्षित राजाश्रय न मिळाल्याने या फळपिकाची जागतिक स्तरावर पीछेहाट झाली. राज्य सरकारकडून निर्यातीसाठी अनुदान मिळाले त्या त्या वेळी काही किलो, टनांची निर्यात झाली.  परंतू नंतर वैयक्‍तिक व सांघिक स्तरावर निर्यातीचे विशेष प्रयत्न झाले नाही. विदर्भातील नेत्यांकडून संत्रा उपेक्षित राहिला असतानाच आता या फळपिकाला दर आणि निर्यातीच्या बाबतीत बुस्ट देण्याकरिता थेट उत्तर महाराष्ट्रातील नाशिक येथील सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनीने पुढाकार घेतला आहे.  आंबिया बहारातील फळांची कंपनीकडून खरेदी करून लगतच्या देशांमध्ये निर्यातीचा प्रयत्न ही कंपनी करणार आहे. त्याकरिता कंपनीने सर्वेक्षणाचे काम विदर्भात सुुरू केले आहे. चांगल्या प्रतीच्या संत्र्यांची खरेदी करून चांगले दर शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न याद्वारे होईल.  बाजारात अपेक्षेपक्षा चांगले दर मिळाल्यास फरकाची रक्‍कम बोनस म्हणून संत्रा बागायतदारांच्या खात्यात जमा करण्याचे प्रस्तावीत आहे.संत्र्यासोबतच कंपनी त्यापुढील काळात उडीद, मूग, ज्वारी, सोयाबीनसह विदर्भात उत्पादित इतर शेतमाल खरेदी करणार आहे. सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या बाजारातील या हस्तक्षेपामुळे विदर्भात उत्पादीत शेतमालाच्या भावात तेजी येत येथील शेतकऱ्यांना याचा फायदा होईल, अशी अपेक्षा व्यक्‍त होत आहे.  कलिंगडाची केली काठमांडूला निर्यात सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनीचा हा प्रयोग पथदर्शी म्हणून पाहिला जात आहे. कंपनीने पहिल्या टप्प्यात या हंगामात कलिंगड (टरबूज) खरेदी केले. अचलपूर (जि. अमरावती) भागात खरेदी करण्यात आलेल्या कलिंगडाला दर्जा पाहून प्रति किलो साडेनऊ रुपयांचा दर देण्यात आला. काठमांडू (नेपाळ) येथून थेट माल पाठविण्यात आला. सचिन लांडगे यांना कंपनीने त्या कामी या भागात पाठविले होते. ५० टनांपेक्षा अधिक टरबुजाची खरेदी या माध्यमातून केली गेली.  विदर्भाचे मुख्य फळपीक असलेल्या संत्र्यासह इतर शेतमालाच्या खरेदीचा प्रस्ताव आहे. त्याकरिता सर्वेक्षणाचे काम सुरू केले आहे. शेतकऱ्यांचे शेतमाल दराच्या माध्यमातून मूल्यवर्धन करण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे. - विलास शिंदे, अध्यक्ष, सह्याद्री ॲग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी, नाशिक

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com