कांद्यावर ‘तिने’ मिळवली पीएचडी

कांद्यावर ‘तिने’ मिळवली पीएचडी
कांद्यावर ‘तिने’ मिळवली पीएचडी

नाशिक: देशाला कांदा पुरविणारा जिल्हा म्हणून नाशिकची ओळख आहे. या पिकाचे अर्थकारणावर देशाचे राजकारणही चालते. कांद्याचे ‘उत्पादन ते विपणन’ या दरम्यान दरातील चढउतारामुळे कांद्याचा प्रश्न गाजत असतो, अशा महत्त्वपूर्ण कांदा विषयावर उत्तर प्रदेशातील अलाहाबादच्या कुमुद शुक्ला यांनी संशोधन करून पीएचडी मिळविली आहे.  कुमुद यांनी अलाहाबाद येथील सॅम हिगिनबॉटम कृषी, तंत्रज्ञान आणि विज्ञान विद्यापीठात संशोधन करण्यासाठी २०१६ मध्ये नोंदणी करून २०१९ मध्ये प्रबंध सादर केला. कृषी व्यवसाय व्यवस्थापन विद्याशाखेतून ‘ॲन इकॉनॉमिक अनलिसिस ऑफ प्रॉडक्शन, मार्केटिंग अँड एक्स्पोर्ट पोटेन्शल इन ओनिअन नाशिक डिस्ट्रिक्ट ऑफ महाराष्ट्र’ हा त्यांच्या संशोधनाचा विषय होता.  नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादन, मागणी, पुरवठा, दरातील चढउतार व विपणन समस्या या प्रमुख मुद्द्यांवर त्यांनी अभ्यास केला. यासाठी जिल्ह्यात दोन वेळेस दौरा करून जिल्ह्यातील कांदा उत्पादक पट्ट्यातील १३ गावांना भेटी देत माहिती संकलित केली. यात खरीप व रब्बी अशा दोन हंगामातील कामकाज समजून घेतले. यासाठी लासलगाव, पिंपळगाव बसवंत यांसह गुलटेकडी (पुणे) या कांदा बाजारातील निष्कर्ष नोंदविले होते. कांद्याच्या मुद्द्यावर संशोधन करताना नैताळे (ता. निफाड) येथील कांदा उत्पादक संजय साठे यांच्या संपर्कात होत्या.  कुमुद म्हणाल्या, की ‘‘नाशिक जिल्ह्यातील कांद्याची ओळख जगभर आहे. विशिष्ट रंग, आकार व चव असल्याने मागणी असते. मात्र, या पिकाच्या उत्पादन ते विक्री दरम्यान अनेक घडामोडी राजकारण, समाजकारण व अर्थकारणावर परिणाम करतात. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com