agriculture news in Marathi she runs farmers producers company Maharashtra | Agrowon

अडीच कोटी उलाढाल करणाऱ्या शेतकरी कंपनीची सूत्रे ‘तिच्या’ हाती 

चंद्रकांत जाधव
सोमवार, 8 मार्च 2021

वर्षाला सुमारे अडीच कोटी रुपये एकूण उलाढाल असलेल्या चांगदेव (ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव) येथील संत चांगदेव तापी पूर्णा शेतकरी उत्पादक कंपनीची सूत्रे आरती राजेंद्र चौधरी या समर्थपणे राबवीत आहे.

जळगाव ः वर्षाला सुमारे अडीच कोटी रुपये एकूण उलाढाल असलेल्या चांगदेव (ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव) येथील संत चांगदेव तापी पूर्णा शेतकरी उत्पादक कंपनीची सूत्रे आरती राजेंद्र चौधरी या समर्थपणे राबवीत आहे. कंपनीने प्रक्रिया, बीजोत्पादन, कृषी निविष्ठा यासंबंधीच्या कामात उभारीदेखील घेतली आहे. 

आरती या कलाशाखेतील पदवीधर आहेत. वडील वकील. सासरी पतीदेखील वकील. सासरी ८५ एकर जमीन आहे. या शेतीसाठी पती राजेंद्र यांनी वकिली सोडली. शेतीचे व्यवस्थापन ते सांभाळू लागले. आपल्या कुटुंबात शेतीचे धडे मिळाल्याने आरतीताईदेखील शेतीचे व्यवस्थापन सांभाळू लागल्या. त्यात महिला मजुरांचे व्यवस्थापन, मजुरीच्या निधीचा ताळेबंद ठेवणे आदी कामे त्या करू लागल्या. केळी, कापूस, हळद, पपई आदी पिके शेतात घेतली जातात.

शेतीची गोडी लागल्याने आपणही छोटा प्रक्रिया उद्योग सुरू करावा, अशी कल्पना आरतीताईंना सुचली. पुणे, मुंबईत त्यांचे नातेवाईक असतात. त्यांच्याकडून दर्जेदार हळदीची मागणी असायची. ही बाब लक्षात घेता आपल्या शेतात पिकविलेल्या हळदीची पूडनिर्मिती सुरू केली. पुढे तापी पूर्णा महिला बचत गट स्थापन केला. महिलांच्या कार्यक्रमात त्या सक्रिय झाल्या. महिलांचे एकत्रीकरण सुरू केले. 

हळद पूडनिर्मितीची यंत्रणा त्यांना अनुदानावर कृषी विभागाने दिली. दरवर्षी दीड क्विंटल हळद पूडनिर्मिती व विक्री करतात. पुणे येथील मैत्रीण अनिता पाटील व मुंबई येथे कन्या अमरिता पाटील यांच्याकडे पूड पाठवितात. पुढे या दोघी हळद विक्रीचे व्यवस्थापन सांभाळतात. हळदीला गेली दोन वर्षे सरासरी २०० रुपये प्रतिकिलोचा दर मिळाला आहे. मुलगा अंकुश हा अभियांत्रिकी व व्यवस्थापन शाखेतील पदवीधर आहे. त्यालाही शेतीचे व्यवस्थापन सांभाळण्यासंबंधी आरतीताईंनी तयार केले आहे. हा प्रवास पुढे सुरूच राहिला.

अशातून गावात २३६ शेतकरी सभासद असलेल्या संत चांगदेव तापी पूर्णा शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना २०१५ मध्ये झाली. या कंपनीचे अध्यक्षपदही आरतीताईंकडे संचालक मंडळाने सोपविले. ११ संचालक या कंपनीत आहेत. ही कंपनी मका ड्रायर, गोदाम, हरभरा बीजोत्पादन, कृषी निविष्ठा विक्री आदी उपक्रम, कार्यक्रम राबविते. 

समर्थपणे उचलली जबाबदारी 
सुरुवातीला उलाढाल कमी होती. गेल्या तीन वर्षांत उलाढाल दोन कोटींवर पोचली. गेल्या वर्षी दोन कोटी ६१ लाखांची उलाढाल झाली. या कंपनीचे कामही आरतीताई समर्थपणे पाहत आहे. पती राजेंद्र यांची समर्थ साथ आहे. हळद प्रक्रिया उद्योग पुढे आणखी वाढवायचा त्यांचा मनोदय आहे. महिलांचा सहभाग वाढवून शेतीसाठी नवोपक्रम राबविण्याची तयारी करीत आहे. 


इतर अॅग्रो विशेष
विदर्भात उद्यापासून वादळी पावसाचा इशारा पुणे : विदर्भासह संपूर्ण राज्यात उन्हाचा चटका...
गटशेतीच्या पायावर ‘एफपीसी’चा कळस पुणे : राज्यात अल्प व अत्यल्प भूधारक शेतक-यांना...
तोडणीला परवडेना टोमॅटो औरंगाबाद : जिल्ह्यातील गंगापूर, कन्नड तालुक्यातील...
महाराष्ट्राला साखर वाहतूक अनुदान...कोल्हापूर : महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना...
संत्रा प्रक्रियेतून शेतकरी कंपनीची...वरुड (जि. अमरावती) येथील श्रमजीवी नागपुरी संत्रा...
तीन पूरक व्यवसायांचा शेतीला भक्कम आधारखरपुडी (ता.. जि.जालना ) येथील अल्पभूधारक शेतकरी...
कांदा काढणीच्या खर्चात २५ टक्क्यांवर...नाशिक : चालूवर्षी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मागील...
उपाशी पोटाला लॉकडाउन करता येत न्हाय...! रोपळे बुद्रुक, जि. सोलापूर : कोरोनाच लय भ्या...
कर्ज परतफेडीला मुदतवाढ मिळावी गोंदिया ः गेल्या हंगामात देण्यात आलेल्या...
परभणी, हिंगोलीत २० हजार क्विंटल हरभरा...परभणी ः किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...
लासलगावला कांदा लिलावात सहभागी होण्यास...नाशिक : सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या...
विदर्भात मेघगर्जनेसह पूर्वमोसमी पावसाची...पुणे : झारखंड ते उत्तर कर्नाटक, छत्तीसगड आणि...
हापूसचा दराचा गोडवा टिकून रत्नागिरी ः वातावरणातील अनियमितेचा परिणाम यंदा...
राज्यात अद्याप वीस लाख टन ऊस शिल्लक कोल्हापूर : राज्यातील ऊस उत्पादक पट्यातील साखर...
बाजार समित्या बंद ठेवू नका पुणे ः कोरोना टाळेबंदीत शेतीमाल वितरण सुरळीत...
राज्यात चिकन, अंड्यांच्या दरात सुधारणा नगर ः कोरोना व्हायरस संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर...
साखर वाहतुकीसाठी क्विंटलला १०० रुपये...कोल्हापूर : पूर्वेकडील राज्यांनी वाहतूक खर्चात...
कमाल तापमान वाढण्यास सुरुवात पुणे : राज्याच्या अनेक भागांत आकाश कोरडे झाले आहे...
पीक बदलातून शेती झाली किफायतशीरनांदोस (ता.मालवण,जि.सिंधुदुर्ग) गावातील...
देशात यंदा सर्वसाधारण पाऊस;...पुणे : देशभरात यंदा मॉन्सूनचा सर्वसाधारण पाऊस...