पशुवैद्यकीय महाविद्यालयामध्ये उद्या मेंढीपालन कार्यशाळा

पशुवैद्यकीय महाविद्यालयामध्ये उद्या मेंढीपालन कार्यशाळा
पशुवैद्यकीय महाविद्यालयामध्ये उद्या मेंढीपालन कार्यशाळा

परभणी ः राज्यामध्ये प्रथमच परभणी येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयामध्ये शनिवारी (ता. २) सकाळी १० ते सांयकाळी ५ या वेळेत मेंढीपालन कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेमध्ये दुष्काळी स्थितीत तांत्रितदृष्ट्या योग्य पद्धतीने मेंढीपालन करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे. मेंढीपालकांना सक्षम आणि उपयुक्त उपाययोजनांची माहिती दिली जाणार आहे. या निमित्त मेंढ्यांचा ‘फॅशन शो’ आयोजित करण्यात आला आहे. या संदर्भात पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य तथा सहयोगी अधिष्ठता डाॅ. नितीन मार्कंडेय यांनी दिली.

परभणी येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रारंगणात आयोजित या कार्यशाळेस महाराष्ट्र पशू आणि मत्स्यविज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. आशिष पातुरकर अध्यक्षस्थानी राहणार आहेत. आमदार डाॅ. राहुल पाटील यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्‍घाटन होणार आहे. 

यावेळी विद्यापीठ कार्यकारणी सदस्य डाॅ. भगवानराव सटाले उपस्थित राहणार आहेत. समारोप कार्यक्रमास औरंगाबाद येथील पशुसंवर्धन सहआयुक्त डाॅ. सुनील राऊतमारे, विस्तार शिक्षण संचालक डाॅ. प्रवीण जाधव, पुण्यश्लोक अहल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डाॅ. महेश बनसोडे उपस्थित राहणार आहेत. 

या कार्यशाळेत केंद्र शासनाच्या मेंढपाळ विमा योजना, स्वरूप, फायदे याबाबत या बाबत माहिती दिली जाणार आहे. या कार्यशाळेत एकत्रित आलेल्या मेंढीपालकामधील दख्खनी जातीच्या मेंढीपालकांची संघटना स्थापन करण्याची गरज आणि कार्यवाही याबाबत जागृती केली जाणार आहे.

या वेळी मेंढ्याचा ‘फॅशन शो’ हा नावीण्यपूर्ण उपक्रम घेण्यात येणार आहे. या कार्यशाळेस मेंढीपालकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन प्राचार्य डाॅ. नितीन मार्कंडेय, समन्वयक डाॅ. माणिक धुमाळ यांनी केले आहे.

विविध स्टॅाल उभारण्यात येणार राज्यात गायी, म्हैस, शेळी या पशुधनावर नियमित चर्चासत्रांचे आयोजन केले जाते. परंतु मेंढी हे पशुधन मात्र दुलर्क्षित आहे. या कार्यशाळेत मेंढीवर्गीय पशुधनाचा ताण कमी करणाऱ्या वनस्पतिजन्य औषधी उत्पादनाचे विविध स्टॅाल उभारण्यात येणार आहेत. पशुवैद्यकीय यंत्रणेकडील शिफारशी, सुविधा, सोयी याबाबत तांत्रिक माहिती पुस्तिका वितरित करण्यात येणार आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com