शेखर गायकवाड यांच्याकडे साखर आयुक्तलयाचा अतिरिक्त पदभार

शेखर गायकवाड यांच्याकडे साखर आयुक्तलयाचा अतिरिक्त पदभार
शेखर गायकवाड यांच्याकडे साखर आयुक्तलयाचा अतिरिक्त पदभार

पुणे : भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे संचालक शेखर गायकवाड यांनी साखर आयुक्तलयाचा अतिरिक्त पदभार स्वीकारण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव स. री. बांदेकर-देशमुख यांनी शनिवारी (ता. १) दिले आहेत. साखर आयुक्तलयाचा पदभार यापूर्वी संभाजी कडू पाटील यांच्याकडे होता. शुक्रवारी (ता. ३०) ते सेवानिवृत्त झाल्यानंतर पदभार कोणाकडे दिला जाणार याची चर्चा सुरू होती. मात्र, प्रशासन विभागाने साखर आयुक्तलयाचा अतिरिक्त पदभार श्री. गायकवाड यांनी स्वीकारण्याचे परिपत्रक काढून सुरू असलेल्या चर्चेला तात्पुरता पूर्णविराम दिला आहे. सध्या श्री. गायकवाड हे भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे संचालक म्हणून पूर्णवेळ म्हणून काम पाहत आहे. याशिवाय महाराष्ट्र शिक्षण व संशोधन परिषदेच्या महासंचालकपदाचा अतिरिक्त पदभार ऑक्टोबर महिन्यात देण्यात आला आहे. त्यानंतर पुन्हा शनिवारी काढलेल्या आदेशात रिक्त पदाचा कार्यभार पुढील आदेश होईपर्यंत साखर आयुक्तलयाचा अतिरिक्त कार्यभार श्री. गायकवाड यांच्याकडे सोपविण्यात येत आहे. तरी या पदाचा अतिरिक्त कार्यभार त्वरित धारण करावा, असे आदेशात म्हटले आहे. त्यामुळे त्यामुळे श्री. गायकवाड यांना तीन विभागांचा कार्यभार पाहावा लागणार आहे. दरम्यान, सध्या विधानसभा निवडणुकीसाठी निरीक्षक म्हणून गायकवाड हे राजस्थान येथे असून १५ डिसेंबरला ते पुण्यात येणार आहेत. त्यानंतर ते साखर आयुक्तपदाचा पदभार स्वीकारतील, असे आयुक्तालयातील सूत्रांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com